Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for भूमितीय रचनाएँ (गणित १) [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - भौमितिक रचना SCERT Maharashtra solutions for भूमितीय रचनाएँ (गणित १) [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - भौमितिक रचना - Shaalaa.com](/images/bhumiti-ganit-2-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 4: भौमितिक रचना
Below listed, you can find solutions for Chapter 4 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for भूमितीय रचनाएँ (गणित १) [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.
SCERT Maharashtra solutions for भूमितीय रचनाएँ (गणित १) [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 4 भौमितिक रचना Q १) (अ)
[प्रत्येकी १ गुण]
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला ______ स्पर्शिका काढता येतील.
3
2
1
0
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका परस्परांना ______ असतात.
लंब
समांतर
एकरूप
सांगता येत नाही.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
ΔLMN ∼ ΔHIJ व `"LM"/"HI" = 2/3`, तर ______
ΔLMN लहान त्रिकोण आहे.
ΔHIJ लहान त्रिकोण आहे.
दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत.
सांगता येत नाही.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त ______ स्पर्शिका काढता येतील.
2
1
एक आणि एकच
0
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

आकृतीमध्ये ΔABC ∼ ΔADE आहे, तर त्यांच्या संगत बाजूचे गुणोत्तर ______ आहे.
`3/1`
`1/3`
`3/4`
`4/3`
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
वर्तुळकेंद्राचा वापर करून वर्तुळाला वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रमेयाचा उपयोग होतो ?
स्पर्शिका – त्रिज्या प्रमेय
स्पर्शिका – त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास
पायथागोरसचे प्रमेय
पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
ΔPQR ∼ ΔABC, `"PR"/"AC" = 5/7` तर ______
ΔABC मोठा आहे.
ΔPQR मोठा आहे.
दोन्ही त्रिकोण समान आहेत.
निश्चित सांगता येत नाही.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
ΔABC ∼ ΔAQR `"AB"/"AQ" = 7/5` असल्यास, खालीलपैकी कोणता पर्याय सत्य आहे?
A-Q-B
A-B-Q
A-C-B
A-R-B
SCERT Maharashtra solutions for भूमितीय रचनाएँ (गणित १) [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 4 भौमितिक रचना Q १ (ब)
खालील उपप्रश्न सोडवा (प्रत्येकी १ गुण)
ΔABC हा 60° काढा व तो दुभागा.
∠PQR हा 115° काढा. त्याचे दोन एकरूप कोनांत विभाजन करा.
रेख AB = 9.7 सेमी लांबीचा काढा. त्यावर बिंदू P असा घ्या, की AP = 3.5 सेमी, A – P – B. बिंदू P मधून रेख AB ला लंब काढा.
4.5 सेमी लांबीचा रेख AB काढा. रेख AB चा लंबदुभाजक काढा.
9 सेमी लांबीचा रेख AB काढा. त्याचे 3:2 प्रमाणात विभाजन करा.
त्रिज्या 3 सेमी असलेल्या वर्तुळास त्यावरील P या बिंदूतून स्पर्शिका काढा.
SCERT Maharashtra solutions for भूमितीय रचनाएँ (गणित १) [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 4 भौमितिक रचना Q २) (अ)
खालील प्रत्येक उदाहरणांमध्ये दिलेल्या सूचनांनुसार कृती करा [प्रत्येकी २ गुण]
| वर्तुळावर P हा कोणताही एक बिंदू घ्या. किरण OP काढा. |
| ↓ |
| किरण OP ला किरण P मधून लंब रेषा काढा. |
| O केंद्र व त्रिज्या 3 सेमी असलेले वर्तुळ काढा. |
| ↓ |
| वर्तुळावर कोणताही एक बिंदू P घ्या. |
| ↓ |
| किरण OP काढा. |
| ↓ |
| किरण OP ला P मधून लंब रेषा काढा. |
व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खाली दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
| O केंद्र व त्रिज्या 3 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळावर बिंदू A व B घेऊन व्यास AB काढा. |
| ↓ |
| किरण OA काढा. किरण OB काढा. |
| ↓ |
| किरण OA ला बिंदू A मधून लंब रेषा काढा. |
| ↓ |
| किरण OB ला बिंदू B मधून लंब रेषा |
SCERT Maharashtra solutions for भूमितीय रचनाएँ (गणित १) [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 4 भौमितिक रचना Q २) (ब)
खालील उपप्रश्न सोडवा (प्रत्येकी २ गुण)
केंद्र M व त्रिज्या 3.4 सेमी असलेल्या वर्तुळास त्यावरील P बिंदूतून स्पर्शिका काढा.
O केंद्र व त्रिज्या 3.5 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील P बिंदूतून स्पर्शिका काढा.
3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूतून जाणारी स्पर्शिका काढा.
3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावर कोणताही एक बिंदू k घ्या. K मधून वर्तुळकेंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढा.
3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा. बिंदू M व बिंदू N मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्राचा वापर न करता वर्तुळाला त्यावरील P बिंदूतून स्पर्शिका काढा.
रेख AB 6 सेमी व्यास असलेले वर्तुळ काढा. व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
रेख AB = 6.8 सेमी काढा. रेख AB व्यास असलेले वर्तुळ काढा. वर्तुळावर A व B व्यतिरिक्त बिंदू C घ्या. रेख AC व रेख CB काढा. ∠CAB चे माप लिहा.
SCERT Maharashtra solutions for भूमितीय रचनाएँ (गणित १) [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 4 भौमितिक रचना Q ३) (अ)
खालील सूचनेनुसार कृती करा (प्रत्येकी ३ गुण)
| 3.3 सेमी त्रिज्येचे व O केंद्र असलेले वर्तुळ काढून त्यामध्ये 6.6 सेमी लांबीची जीवा PQ काढा. |
| ↓ |
| किरण OP व किरण OQ काढा. |
| ↓ |
| P मधून किरण OP ला लंब रेषा काढा. |
| ↓ |
| Q मधून किरण OQ ला लंब रेषा काढा. |
P केंद्र असलेले वर्तुळ काढा. कंस AB हा 100° काढा. A व B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खालील कृती करा.
| कोणतीही त्रिज्या व P केंद्र घेऊन वर्तुळ काढा. |
| ↓ |
| वर्तुळावर कोणताही एक बिंदू A घ्या. |
| ↓ |
| किरण PB असा काढा की ∠APB = 100° |
| ↓ |
| किरण PA ला A मधून लंब रेषा काढा. |
| ↓ |
| किरण PB ला B मधून लंब रेषा काढा. |
वर्तुळकेंद्राचा वापर न करता वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खाली दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
| एक वर्तुळ काढा व वर्तुळावर कोणताही एक बिंदू C घ्या. |
| ↓ |
| बिंदू C मधून जाणारी जीवा CB काढा. |
| ↓ |
| वर्तुळावर B व C सोडून A हा बिंदू घ्या. ∠BAC काढा. |
| ↓ |
| कंपासमध्ये सोयीस्कर त्रिज्या घेऊन बिंदू A केंद्र घेऊन ∠BAC च्या भुजांना बिंदू M व बिंदू N मध्ये छेदणारा कंस काढा. |
| ↓ |
| तीच त्रिज्या व C केंद्र घेऊन जीवा BC ला छेदणारा कंस काढा. छेदनबिंदूस R नाव द्या. |
| ↓ |
| कंपासमध्ये MN एवढी त्रिज्या घ्या. केंद्र R घेऊन आधी काढलेल्या कंसाला छेदणारा आणखी एक कंस काढा. छेदनबिंदूस D नाव द्या. |
| ↓ |
| D मधून जाणारी रेषा CD काढा. रेषा CD ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. |
C केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी घेऊन वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.2 सेमी अंतरावर बिंदू B घ्या. बिंदू B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.
| C केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी घेऊन वर्तुळ काढा. |
| ↓ |
| आरंभबिंदू C असणाऱ्या किरणावर 7.2 सेमी अंतरावर बिंदू B घ्या. |
| ↓ |
| रेख BC चा लंबदुभाजक काढून मध्यबिंदू P मिळवा. |
| ↓ |
| P केंद्र व त्रिज्या CP घेऊन वर्तुळ काढा. दोन्ही वर्तुळांच्या छेदनबिंदूस A व D नाव द्या. |
| ↓ |
| रेषा BA व रेषा BD काढा. |
| ↓ |
|
स्पर्शिकाखंड BA = ______ सेमी स्पर्शिकाखंड BD = ______ सेमी |
SCERT Maharashtra solutions for भूमितीय रचनाएँ (गणित १) [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 4 भौमितिक रचना Q ३ (ब)
खालील उपप्रश्न सोडवा (प्रत्येकी ३ गुण)
ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये , AB = 3 सेमी, ∠B = 90°, BC = 4 सेमी व त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:4 असल्यास ΔPBQ काढा.
ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP व ΔNED काढा.
ΔPQR ∼ ΔABC, ΔPQR मध्ये PQ = 3.6 सेमी, QR = 4 सेमी, PR = 4.2 सेमी आहे. त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर 3:2 असल्यास ΔABC काढा.
ΔPQR ~ ΔLTR, ΔPQR मध्ये PQ = 4.2 सेमी, QR = 5.4 सेमी, PR = 4.8 सेमी आणि `"PQ"/"LT"` = `3/4` तर ΔPQR व ΔLTR काढा.
ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये, AB = 4 सेमी, BC = 5 सेमी, AC = 6 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 2:3 असल्यास ΔPBQ काढा.
5 सेमी बाजू असलेला समभुज ΔABC काढा. ΔABC ∼ ΔLMN. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 6:7 असल्यास ΔLMN काढा.
O केंद्र व 3.4 त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा. वर्तुळाला बिंदू M व बिंदू N मधून स्पर्शिका काढा.
O केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.2 सेमी अंतरावरील B या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
C केंद्र व त्रिज्या 3.2 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.5 सेमी अंतरावरील P बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
3.5 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. वर्तुळावर कोठेही बिंदू K घ्या. K मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा (वर्तुळकेंद्राचा वापर न करता).
4.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. 120° मापाचा एक कंस PQ काढा. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
4.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7 सेमी अंतरावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
ΔABC ∼ ΔLMN, ΔABC मध्ये, AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 5.5 सेमी, MN = 4.8 सेमी, तर ΔABC व ΔLMN काढा.
3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढून त्याची रेख XY ही जीवा 5 सेमी लांबीची काढा. बिंदू X व बिंदू Y मधून जाणार्या वर्तुळाच्या स्पर्शिका काढा (वर्तुळकेंद्राचा वापर न करता).
SCERT Maharashtra solutions for भूमितीय रचनाएँ (गणित १) [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 4 भौमितिक रचना Q ४)
खालील उपप्रश्न सोडवा (प्रत्येकी ४ गुण)
ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये AM = 6.3 सेमी, ∠MAT = 120°, AT = 4.9 सेमी, `"AM"/"HA" = 7/5` तर ΔAHE काढा.
ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP काढा.
ΔABC ~ ΔPBR, BC = 8 सेमी, AC = 10 सेमी , ∠B = 90°, `"BC"/"BR" = 5/4`, तर ΔPBR काढा.
ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये, AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50°, AT = 5.6 सेमी, `"AM"/"AH" = 7/5`, तर ΔAHE काढा.
3.3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 6.6 सेमी लांबीची जीवा PQ काढा. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. स्पर्शिकांबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा.
ΔRST ∼ ΔUAY, ΔRST मध्ये, RS = 6 सेमी, ∠S = 50°, ST = 7.5 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 5.4 असल्यास ΔUAY काढा.
ΔPQR ∼ ΔSTU, ΔPQR मध्ये PQ = 5.2 सेमी, QR = 3.6 सेमी, PR = 7.2 सेमी, `"PQ"/"ST" = 4/5`, तर ΔPQR व ΔSTU काढा.
ΔSHR ∼ ΔSVU, ΔSHR मध्ये SH = 4.5 सेमी, HR = 5.2 सेमी, SR = 5.8 सेमी, `"HS"/"SV" = 3/5`, तर ΔSVU काढा.
ΔABC मध्ये, BC = 6 सेमी, ∠B = 45°, ∠A = 100°. ΔABC ∼ ΔPBQ. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:4 असल्यास ΔABC व ΔPBQ काढा.
ΔPQR ∼ ΔAQB, ΔPQR मध्ये, PQ = 3 सेमी, ∠Q = 90°, QR = 4 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:5 असल्यास ΔAQB काढा.
ΔXYZ ∼ ΔPYR. ΔXYZ मध्ये, XY = 4.5 सेमी, ∠Y = 60°, YZ = 5.1 सेमी व `"XY"/"PY" = 4/7,` तर ΔXYZ व ΔPYR काढा.
O केंद्र व 3 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रातून जाणाऱ्या छेदिकेवर वर्तुळकेंद्राच्या विरुद्ध बाजूस वर्तुळकेंद्रापासून 7 सेमी अंतरावर बिंदू P व बिंदू P घ्या. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
SCERT Maharashtra solutions for भूमितीय रचनाएँ (गणित १) [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 4 भौमितिक रचना Q ५)
खालील उपप्रश्न सोडवा (प्रत्येकी ३ गुण)
एक समद्विभुज त्रिकोण असा काढा, की त्याचा पाया 5 सेमी व उंची 4 सेमी आहे. त्या त्रिकोणाला समरूप त्रिकोण असा काढा, की त्याच्या बाजू मूळ त्रिकोणाच्या संगत बाजूंच्या `2/3` पट आहेत.
ΔABC असा काढा, की AB = 8 सेमी, BC = 6 सेमी, ∠B = 90°. रेख BD हा कर्ण AC ला लंब काढा. बिंदू B, D व A मधून जाणारे वर्तुळ काढा. तसेच रेषा BC ही वर्तुळाची स्पर्शिका आहे याचे स्पष्टीकरण द्या.
4 सेमी व 6 सेमी त्रिज्या असलेली व O केंद्र असलेली समकेंद्री वर्तुळे काढा. मोठ्या वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूतून लहान वर्तुळाला स्पर्शिका काढा. स्पर्शिकाखंडांची लांबी लिहा.
4 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाला वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून दोन स्पर्शिका अशा काढा, की त्या स्पर्शिकांमधील कोन 60° असेल.
AB = 6 सेमी, ∠BAQ = 50°. A व B मधून जाणारे वर्तुळ असे काढा, की AQ ही वर्तुळाची स्पर्शिका असेल.
३ सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. चौरसाची प्रत्येक बाजू वर्तुळाला स्पर्श करेल असा चौरस काढा.
बिंदू P व Q घ्या व त्यांमधून जाणारे वर्तुळ काढा. त्या वर्तुळाला AB ही स्पर्शिका काढा. (वर्तुळाच्या केंद्राचा वापर न करता)
1.8 सेमी पेक्षा जास्त व 3 सेमी पेक्षा कमी त्रिज्या घेऊन कोणतेही एक वर्तुळ काढा. या वर्तुळात 3.6 सेमी लांबीची जीवा AB काढा. वर्तुळकेंद्राचा वापर न करता A व B मधून जाणाऱ्या वर्तुळाच्या स्पर्शिका काढा.
O केंद्र व त्रिज्या 3 सेमी त्रिज्येच्या वर्तुळात वर्तुळाबाहेरील P बिंदूतून 4 सेमी लांबीचा रेख PA हा स्पर्शिकाखंड काढा.
O केंद्र व त्रिज्या 2.8 सेमी असलेल्या वर्तुळाला P या बाह्य बिंदूतून वर्तुळाला PA व PB या स्पर्शिका अशा काढा, की ∠APB = 70°
बिंदू P हा रेषा AB पासून 6 सेमी अंतरावर आहे. बिंदू P मधून जाणारे 4 सेमी त्रिज्येचे असे वर्तुळ काढा, की रेषा AB ही वर्तुळाची स्पर्शिका असेल.
∠ABC = 60°. ∠ABC चा दुभाजक काढा. कोनदुभाजकावर बिंदू Q असा घ्या, की d(B,Q) = 8 सेमी. Q केंद्र असलेले असे वर्तुळ काढा, की किरण BA व किरण BC ला स्पर्श करेल. वर्तुळाची त्रिज्या व स्पर्शिकाखंडाची लांबी लिहा.
2.5 सेमी त्रिज्येच्या वर्तुळात 5 सेमी लांबीची जीवा AB काढा. वर्तुळावर बिंदू C असा घ्या, की BC = 3 सेमी. ΔABC काढा. A, B व C बिंदूंतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
∠ABC = 50°. बिंदू S हा ∠ABC च्या कोनदुभाजकावर कोणताही एक बिंदू घ्या. बिंदू S केंद्र असलेले असे एक वर्तुळ काढा, की ∠ABC च्या भुजांना स्पर्श करेल.
चौरसाचा कर्ण `sqrt50` सेमी असून असे वर्तुळ काढा, की जे चौरसाच्या सर्व बाजूंना स्पर्श करेल. वर्तुळाची त्रिज्या मोजून लिहा.
ΔPQR मध्ये, ∠P = 40°, PQ ≅ PR, QR = 7 सेमी. ΔXYZ ∼ ΔPQR, XY:PQ = 3:2 असल्यास ΔXYZ काढा.
रेख AB = 7.5 सेमी लांबीचा काढा. केंद्र A असलेले वर्तुळ असे काढा, की वर्तुळाला बिंदू B मधून काढलेल्या स्पर्शिकाखंडाची लांबी 6 सेमी असेल.
3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळाला दोन स्पर्शिका अशा काढा, की त्या एकमेकींना लंब असतील.
Solutions for 4: भौमितिक रचना
![SCERT Maharashtra solutions for भूमितीय रचनाएँ (गणित १) [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - भौमितिक रचना SCERT Maharashtra solutions for भूमितीय रचनाएँ (गणित १) [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - भौमितिक रचना - Shaalaa.com](/images/bhumiti-ganit-2-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for भूमितीय रचनाएँ (गणित १) [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - भौमितिक रचना
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूमितीय रचनाएँ (गणित १) [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics भूमितीय रचनाएँ (गणित १) [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 4 (भौमितिक रचना) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in भूमितीय रचनाएँ (गणित १) [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 भौमितिक रचना are समरूप त्रिकोणाची रचना, दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे: वर्तुळ केंद्राचा उपयोग करून., दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे: वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता, दिलेल्या वर्तुळाला त्याबाहेरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढणे..
Using SCERT Maharashtra भूमितीय रचनाएँ (गणित १) [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions भौमितिक रचना exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूमितीय रचनाएँ (गणित १) [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 4, भौमितिक रचना भूमितीय रचनाएँ (गणित १) [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics भूमितीय रचनाएँ (गणित १) [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
