Advertisements
Advertisements
प्रश्न
३ सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. चौरसाची प्रत्येक बाजू वर्तुळाला स्पर्श करेल असा चौरस काढा.
Advertisements
उत्तर

कच्ची आकृती

रचनेच्या पायऱ्या:
- केंद्र O व त्रिज्या 3 सेमी घेऊन एक वर्तुळ काढा.
- बिंदू O मधून जाणारी व वर्तुळाला बिंदू P व Q वर छेदणारी रेषा l काढा.
- बिंदू O मधून जाणारी व वर्तुळाला बिंदू R व S मध्ये छेदणारी रेषा m काढा.
- रेषा m ला बिंदू R व S वर लंब असणाऱ्या अनुक्रमे रेषा AB व CD काढा.
- रेषा l ला बिंदू P व Q वर लंब असणाऱ्या अनुक्रमे रेषा AD व BC काढा. `square`ABCD हा इष्ट चौरस आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या ______ असते.
| O केंद्र व त्रिज्या 3 सेमी असलेले वर्तुळ काढा. |
| ↓ |
| वर्तुळावर कोणताही एक बिंदू P घ्या. |
| ↓ |
| किरण OP काढा. |
| ↓ |
| किरण OP ला P मधून लंब रेषा काढा. |
O केंद्र व त्रिज्या 3.5 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील P बिंदूतून स्पर्शिका काढा.
रेख AB 6 सेमी व्यास असलेले वर्तुळ काढा. व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
C केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी घेऊन वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.2 सेमी अंतरावर बिंदू B घ्या. बिंदू B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.
| C केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी घेऊन वर्तुळ काढा. |
| ↓ |
| आरंभबिंदू C असणाऱ्या किरणावर 7.2 सेमी अंतरावर बिंदू B घ्या. |
| ↓ |
| रेख BC चा लंबदुभाजक काढून मध्यबिंदू P मिळवा. |
| ↓ |
| P केंद्र व त्रिज्या CP घेऊन वर्तुळ काढा. दोन्ही वर्तुळांच्या छेदनबिंदूस A व D नाव द्या. |
| ↓ |
| रेषा BA व रेषा BD काढा. |
| ↓ |
|
स्पर्शिकाखंड BA = ______ सेमी स्पर्शिकाखंड BD = ______ सेमी |
O केंद्र व 3.4 त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा. वर्तुळाला बिंदू M व बिंदू N मधून स्पर्शिका काढा.
O केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.2 सेमी अंतरावरील B या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
O केंद्र व 3 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रातून जाणाऱ्या छेदिकेवर वर्तुळकेंद्राच्या विरुद्ध बाजूस वर्तुळकेंद्रापासून 7 सेमी अंतरावर बिंदू P व बिंदू P घ्या. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
रेख AB = 7.5 सेमी लांबीचा काढा. केंद्र A असलेले वर्तुळ असे काढा, की वर्तुळाला बिंदू B मधून काढलेल्या स्पर्शिकाखंडाची लांबी 6 सेमी असेल.
बिंदू P हा रेषा AB पासून 6 सेमी अंतरावर आहे. बिंदू P मधून जाणारे 4 सेमी त्रिज्येचे असे वर्तुळ काढा, की रेषा AB ही वर्तुळाची स्पर्शिका असेल.
