मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

O केंद्र व त्रिज्या 2.8 सेमी असलेल्या वर्तुळाला P या बाह्य बिंदूतून वर्तुळाला PA व PB या स्पर्शिका अशा काढा, की ∠APB = 70°

Advertisements
Advertisements

प्रश्न

O केंद्र व त्रिज्या 2.8 सेमी असलेल्या वर्तुळाला P या बाह्य बिंदूतून वर्तुळाला PA व PB या स्पर्शिका अशा काढा, की ∠APB = 70° 

बेरीज
Advertisements

उत्तर

कच्ची आकृती 

विश्लेषण:

आकृतीत दर्शवल्याप्रमाणे,

`square`AOBP मध्ये,

∠A = ∠B = 90° ............[स्पर्शिका - त्रिज्या प्रमेय]

∠P = 70° ............[पक्ष]

∴ ∠O = 110° ........[`square`AOBC चा उर्वरित कोन]

रचनेच्या पायऱ्या: 

  1. केंद्र O असलेले 2.8 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा.
  2. त्यावर कोणताही बिंदू A घ्या आणि किरण OA काढा.
  3. बिंदू A मधून किरण OA ला लंब असणारी रेषा l काढा.
  4. किरण OB असा काढा, की ∠AOB = 110°. बिंदू B वर्तुळावर असणे आवश्यक.
  5. किरण OB ला बिंदू B वर लंब असणारी रेषा m काढा.
    रेषा l आणि m या वर्तुळाच्या अपेक्षित स्पर्शिका आहेत. 
shaalaa.com
दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे: वर्तुळ केंद्राचा उपयोग करून.
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: भौमितिक रचना - Q ५)

संबंधित प्रश्‍न

वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या ______ असते. 


9 सेमी लांबीचा रेख AB काढा. त्याचे 3:2 प्रमाणात विभाजन करा. 


O केंद्र व त्रिज्या 3 सेमी असलेले वर्तुळ काढा.
वर्तुळावर कोणताही एक बिंदू P घ्या.
किरण OP काढा.
किरण OP ला P मधून लंब रेषा काढा.

P केंद्र असलेले वर्तुळ काढा. कंस AB हा 100° काढा. A व B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खालील कृती करा. 

कोणतीही त्रिज्या व P केंद्र घेऊन वर्तुळ काढा.
वर्तुळावर कोणताही एक बिंदू A घ्या.
किरण PB असा काढा की ∠APB = 100° 
किरण PA ला A मधून लंब रेषा काढा.
किरण PB ला B मधून लंब रेषा काढा.

4 सेमी व 6 सेमी त्रिज्या असलेली व O केंद्र असलेली समकेंद्री वर्तुळे काढा. मोठ्या वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूतून लहान वर्तुळाला स्पर्शिका काढा. स्पर्शिकाखंडांची लांबी लिहा. 


C केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी घेऊन वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.2 सेमी अंतरावर बिंदू B घ्या. बिंदू B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.  

C केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी घेऊन वर्तुळ काढा.
आरंभबिंदू C असणाऱ्या किरणावर 7.2 सेमी अंतरावर बिंदू B घ्या.
रेख BC चा लंबदुभाजक काढून मध्यबिंदू P मिळवा.
P केंद्र व त्रिज्या CP घेऊन वर्तुळ काढा. दोन्ही वर्तुळांच्या छेदनबिंदूस A व D नाव द्या.
रेषा BA व रेषा BD काढा.

स्पर्शिकाखंड BA = ______ सेमी

स्पर्शिकाखंड BD = ______ सेमी


C केंद्र व त्रिज्या 3.2 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.5 सेमी अंतरावरील P बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. 


AB = 6 सेमी, ∠BAQ = 50°. A व B मधून जाणारे वर्तुळ असे काढा, की AQ ही वर्तुळाची स्पर्शिका असेल.


∠ABC = 50°. बिंदू S हा ∠ABC च्या कोनदुभाजकावर कोणताही एक बिंदू घ्या. बिंदू S केंद्र असलेले असे एक वर्तुळ काढा, की ∠ABC च्या भुजांना स्पर्श करेल.


रेख AB = 7.5 सेमी लांबीचा काढा. केंद्र A असलेले वर्तुळ असे काढा, की वर्तुळाला बिंदू B मधून काढलेल्या स्पर्शिकाखंडाची लांबी 6 सेमी असेल.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×