Advertisements
Advertisements
प्रश्न
रेख AB = 6.8 सेमी काढा. रेख AB व्यास असलेले वर्तुळ काढा. वर्तुळावर A व B व्यतिरिक्त बिंदू C घ्या. रेख AC व रेख CB काढा. ∠CAB चे माप लिहा.
Advertisements
उत्तर
विश्लेषण:
रेखा AB हा वर्तुळाचा व्यास आहे आणि रेख AB चा मध्यबिंदू हे वर्तुळाचे केंद्र आहे.
म्हणूनच वर्तुळाचे केंद्र काढण्यासाठी रेख AB चा लंबदुभाजक काढा.

कच्ची आकृती

रचनेच्या पायऱ्या:
- 6.8 सेमी लांबीचा रेख AB काढा.
- AB चा लंबदुभाजक काढा. तो AB ला बिंदू O वर छेदतो.
- O हे केंद्र आणि AO त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा.
- वर्तुळावर कोणताही बिंदू C घ्या व रेख AC आणि CB काढा.
- ∠ACB चे माप काढा.
m∠ACB = 90°
APPEARS IN
संबंधित प्रश्न
वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या ______ असते.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला ______ स्पर्शिका काढता येतील.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
वर्तुळकेंद्राचा वापर करून वर्तुळाला वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रमेयाचा उपयोग होतो ?
9 सेमी लांबीचा रेख AB काढा. त्याचे 3:2 प्रमाणात विभाजन करा.
3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूतून जाणारी स्पर्शिका काढा.
P केंद्र असलेले वर्तुळ काढा. कंस AB हा 100° काढा. A व B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खालील कृती करा.
| कोणतीही त्रिज्या व P केंद्र घेऊन वर्तुळ काढा. |
| ↓ |
| वर्तुळावर कोणताही एक बिंदू A घ्या. |
| ↓ |
| किरण PB असा काढा की ∠APB = 100° |
| ↓ |
| किरण PA ला A मधून लंब रेषा काढा. |
| ↓ |
| किरण PB ला B मधून लंब रेषा काढा. |
O केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.2 सेमी अंतरावरील B या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
4.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. 120° मापाचा एक कंस PQ काढा. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
AB = 6 सेमी, ∠BAQ = 50°. A व B मधून जाणारे वर्तुळ असे काढा, की AQ ही वर्तुळाची स्पर्शिका असेल.
∠ABC = 50°. बिंदू S हा ∠ABC च्या कोनदुभाजकावर कोणताही एक बिंदू घ्या. बिंदू S केंद्र असलेले असे एक वर्तुळ काढा, की ∠ABC च्या भुजांना स्पर्श करेल.
