मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूतून जाणारी स्पर्शिका काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूतून जाणारी स्पर्शिका काढा.  

आकृती
Advertisements

उत्तर

विश्लेषण:

रेख OP ⊥ रेषा l .......[स्पर्शिका त्रिज्येला लंब असते.]

रेख OP ला बिंदू P वर लंब असणारी रेषा ही P बिंदूतून जाणारी वर्तुळाची अपेक्षित स्पर्शिका आहे. 

कच्ची आकृती

रचनेच्या पायऱ्या:

  1. केंद्र O असलेले 3 सेमी त्रिज्येचे एक वर्तुळ काढा.
  2. त्यावर कोणताही एक बिंदू P घ्या आणि किरण OP काढा.
  3. बिंदू P मधून किरण OP ला लंब असलेली रेषा l काढा.
    रेषा l ही वर्तुळाची बिंदू P मधून जाणारी अपेक्षित स्पर्शिका आहे. 
shaalaa.com
दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे: वर्तुळ केंद्राचा उपयोग करून.
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: भौमितिक रचना - Q २) (ब)

संबंधित प्रश्‍न

वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या ______ असते. 


वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त ______ स्पर्शिका काढता येतात. 


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला ______ स्पर्शिका काढता येतील. 


केंद्र M व त्रिज्या 3.4 सेमी असलेल्या वर्तुळास त्यावरील P बिंदूतून स्पर्शिका काढा. 


रेख AB 6 सेमी व्यास असलेले वर्तुळ काढा. व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.


रेख AB = 6.8 सेमी काढा. रेख AB व्यास असलेले वर्तुळ काढा. वर्तुळावर A व B व्यतिरिक्त बिंदू C घ्या. रेख AC व रेख CB काढा. ∠CAB चे माप लिहा. 


C केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी घेऊन वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.2 सेमी अंतरावर बिंदू B घ्या. बिंदू B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.  

C केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी घेऊन वर्तुळ काढा.
आरंभबिंदू C असणाऱ्या किरणावर 7.2 सेमी अंतरावर बिंदू B घ्या.
रेख BC चा लंबदुभाजक काढून मध्यबिंदू P मिळवा.
P केंद्र व त्रिज्या CP घेऊन वर्तुळ काढा. दोन्ही वर्तुळांच्या छेदनबिंदूस A व D नाव द्या.
रेषा BA व रेषा BD काढा.

स्पर्शिकाखंड BA = ______ सेमी

स्पर्शिकाखंड BD = ______ सेमी


O केंद्र व 3.4 त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा. वर्तुळाला बिंदू M व बिंदू N मधून स्पर्शिका काढा. 


4 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाला वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून दोन स्पर्शिका अशा काढा, की त्या स्पर्शिकांमधील कोन 60° असेल. 


बिंदू P हा रेषा AB पासून 6 सेमी अंतरावर आहे. बिंदू P मधून जाणारे 4 सेमी त्रिज्येचे असे वर्तुळ काढा, की रेषा AB ही वर्तुळाची स्पर्शिका असेल. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×