मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

बिंदू P हा रेषा AB पासून 6 सेमी अंतरावर आहे. बिंदू P मधून जाणारे 4 सेमी त्रिज्येचे असे वर्तुळ काढा, की रेषा AB ही वर्तुळाची स्पर्शिका असेल.

Advertisements
Advertisements

प्रश्न

बिंदू P हा रेषा AB पासून 6 सेमी अंतरावर आहे. बिंदू P मधून जाणारे 4 सेमी त्रिज्येचे असे वर्तुळ काढा, की रेषा AB ही वर्तुळाची स्पर्शिका असेल. 

बेरीज
Advertisements

उत्तर

कच्ची आकृती 

विश्लेषण:

आकृतीत दाखवल्याप्रमाणे, 4 सेमी त्रिज्येच्या वर्तुळाचे केंद्र O आहे.

P चे रेषा AB पासूनचे लंब अंतर = 6 सेमी.

∴ PY = 6 सेमी आणि ∠PYA = 90° .....…(i)

रेख OX बिंदू O वरून रेख PY ला बिंदू X वर लंब आहे.

रेषा AB ही वर्तुळाला बिंदू Z वर स्पर्शिका आहे.

∴ OZ ही वर्तुळाची त्रिज्या आहे.

`square`XOZY मध्ये,

∠X = 90° ….............[ΘOX ⊥ PY]

∠Y = 90° ..........[(i) वरून]

∠Z = 90°  ...............[स्पर्शिका-त्रिज्या प्रमेय]

∴ ∠O = 90° ................[`square`XOZY चा उर्वरित कोन]

∴ `square`XOZY हा आयत आहे.

∴ रेख ZY = रेख OX आणि रेख XO = रेख YZ ..................…[आयताच्या समोरासमोरील बाजू]

परंतु, OZ = 4 सेमी …..........[वर्तुळाची त्रिज्या]

∴ XY = 4 सेमी

रचनेच्या पायऱ्या:

रेषा AB काढा.

रेषा AB वरील कोणत्याही बिंदू Q वरून 6 सेमी लांबीचा लंब PQ काढा.

रेख PQ वर बिंदू X असा घ्या, की रेख XQ = 4 सेमी

वर्तुळाच्या अंतर्भागात किरण XY असा काढा, की ∠QXY = 90°

कंपासमध्ये 4 सेमी अंतर घेऊन, केंद्र P घेऊन किरण XY वर कंस काढा व त्या छेदनबिंदूला O नाव द्या.

केंद्र O व त्रिज्या 4 सेमी घेऊन वर्तुळ काढा. हे इष्ट वर्तुळ आहे.

shaalaa.com
दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे: वर्तुळ केंद्राचा उपयोग करून.
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: भौमितिक रचना - Q ५)

APPEARS IN

संबंधित प्रश्‍न

त्रिज्या 3 सेमी असलेल्या वर्तुळास त्यावरील P या बिंदूतून स्पर्शिका काढा.


व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खाली दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.  

O केंद्र व त्रिज्या 3 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळावर बिंदू A व B घेऊन व्यास AB काढा.
किरण OA काढा. किरण OB काढा.
किरण OA ला बिंदू A मधून लंब रेषा काढा.
किरण OB ला बिंदू B मधून लंब रेषा

3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूतून जाणारी स्पर्शिका काढा.  


रेख AB 6 सेमी व्यास असलेले वर्तुळ काढा. व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.


P केंद्र असलेले वर्तुळ काढा. कंस AB हा 100° काढा. A व B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खालील कृती करा. 

कोणतीही त्रिज्या व P केंद्र घेऊन वर्तुळ काढा.
वर्तुळावर कोणताही एक बिंदू A घ्या.
किरण PB असा काढा की ∠APB = 100° 
किरण PA ला A मधून लंब रेषा काढा.
किरण PB ला B मधून लंब रेषा काढा.

4 सेमी व 6 सेमी त्रिज्या असलेली व O केंद्र असलेली समकेंद्री वर्तुळे काढा. मोठ्या वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूतून लहान वर्तुळाला स्पर्शिका काढा. स्पर्शिकाखंडांची लांबी लिहा. 


4.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7 सेमी अंतरावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. 


३ सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. चौरसाची प्रत्येक बाजू वर्तुळाला स्पर्श करेल असा चौरस काढा.


O केंद्र व त्रिज्या 2.8 सेमी असलेल्या वर्तुळाला P या बाह्य बिंदूतून वर्तुळाला PA व PB या स्पर्शिका अशा काढा, की ∠APB = 70° 


∠ABC = 50°. बिंदू S हा ∠ABC च्या कोनदुभाजकावर कोणताही एक बिंदू घ्या. बिंदू S केंद्र असलेले असे एक वर्तुळ काढा, की ∠ABC च्या भुजांना स्पर्श करेल.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×