Advertisements
Advertisements
प्रश्न
O केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.2 सेमी अंतरावरील B या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
Advertisements
उत्तर
विश्लेषण:

कच्ची आकृती
आकृतीत दाखवल्याप्रमाणे, B हा वर्तुळाच्या बाह्यभागात वर्तुळकेंद्रापासून 7.2 सेमी अंतरावर असणारा बिंदू आहे, असे मानू.
समजा, BR ही बिंदू R वर वर्तुळाला स्पर्श करणारी स्पर्शिका आहे.
∴ रेख OR ⊥ स्पर्शिका BR .......[स्पर्शिका त्रिज्येला लंब असते.]
∴ ∠ORB = 90°
∴ बिंदू R हा OB व्यास असणाऱ्या वर्तुळावर आहे. .......[अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन काटकोन असतो.]
OB व्यास असणारे वर्तुळ काढल्यास, ते केंद्र O असणाऱ्या वर्तुळाला ज्या बिंदूत छेदेल तो बिंदू R असेल.

रचनेच्या पायऱ्या:
- O केंद्र असलेले, 3.6 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा.
- B हा बिंदू असा घ्या, की OB = 7.2 सेमी.
- रेख OB चा लंबदुभाजक काढा. तो रेख OB ला बिंदू M मध्ये छेदतो.
- बिंदू M हे केंद्र मानून आणि त्रिज्या OM घेऊन वर्तुळाला R बिंदूत छेदणारा कंस काढा.
- किरण BR काढा.
किरण BR ही दिलेल्या वर्तुळाची अपेक्षित स्पर्शिका आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा.
वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त ______ स्पर्शिका काढता येतात.
9 सेमी लांबीचा रेख AB काढा. त्याचे 3:2 प्रमाणात विभाजन करा.
| O केंद्र व त्रिज्या 3 सेमी असलेले वर्तुळ काढा. |
| ↓ |
| वर्तुळावर कोणताही एक बिंदू P घ्या. |
| ↓ |
| किरण OP काढा. |
| ↓ |
| किरण OP ला P मधून लंब रेषा काढा. |
केंद्र M व त्रिज्या 3.4 सेमी असलेल्या वर्तुळास त्यावरील P बिंदूतून स्पर्शिका काढा.
P केंद्र असलेले वर्तुळ काढा. कंस AB हा 100° काढा. A व B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खालील कृती करा.
| कोणतीही त्रिज्या व P केंद्र घेऊन वर्तुळ काढा. |
| ↓ |
| वर्तुळावर कोणताही एक बिंदू A घ्या. |
| ↓ |
| किरण PB असा काढा की ∠APB = 100° |
| ↓ |
| किरण PA ला A मधून लंब रेषा काढा. |
| ↓ |
| किरण PB ला B मधून लंब रेषा काढा. |
4 सेमी व 6 सेमी त्रिज्या असलेली व O केंद्र असलेली समकेंद्री वर्तुळे काढा. मोठ्या वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूतून लहान वर्तुळाला स्पर्शिका काढा. स्पर्शिकाखंडांची लांबी लिहा.
C केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी घेऊन वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.2 सेमी अंतरावर बिंदू B घ्या. बिंदू B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.
| C केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी घेऊन वर्तुळ काढा. |
| ↓ |
| आरंभबिंदू C असणाऱ्या किरणावर 7.2 सेमी अंतरावर बिंदू B घ्या. |
| ↓ |
| रेख BC चा लंबदुभाजक काढून मध्यबिंदू P मिळवा. |
| ↓ |
| P केंद्र व त्रिज्या CP घेऊन वर्तुळ काढा. दोन्ही वर्तुळांच्या छेदनबिंदूस A व D नाव द्या. |
| ↓ |
| रेषा BA व रेषा BD काढा. |
| ↓ |
|
स्पर्शिकाखंड BA = ______ सेमी स्पर्शिकाखंड BD = ______ सेमी |
4.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7 सेमी अंतरावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
2.5 सेमी त्रिज्येच्या वर्तुळात 5 सेमी लांबीची जीवा AB काढा. वर्तुळावर बिंदू C असा घ्या, की BC = 3 सेमी. ΔABC काढा. A, B व C बिंदूंतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
