Advertisements
Advertisements
प्रश्न
2.7 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा.
Advertisements
उत्तर

कच्ची आकृती
विश्लेषण:
रेख OM ⊥ रेषा l ......[स्पर्शिका त्रिज्येला लंब असते.]
रेख OM ला बिंदू M वर लंब असणारी रेषा ही M बिंदूतून जाणारी वर्तुळाची अपेक्षित स्पर्शिका आहे.
रचनेच्या पायऱ्या:
i. केंद्र O असलेले 2.7 सेमी त्रिज्येचे एक वर्तुळ काढा.
ii. त्यावर कोणताही एक बिंदू M घ्या आणि किरण OM काढा.
iii. बिंदू M मधून किरण OM ला लंब असलेली रेषा l काढा.
रेषा l ही वर्तुळाची बिंदू M मधून जाणारी अपेक्षित स्पर्शिका आहे.

APPEARS IN
संबंधित प्रश्न
वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या ______ असते.
वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त ______ स्पर्शिका काढता येतात.
रेख AB 6 सेमी व्यास असलेले वर्तुळ काढा. व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
ΔABC असा काढा, की AB = 8 सेमी, BC = 6 सेमी, ∠B = 90°. रेख BD हा कर्ण AC ला लंब काढा. बिंदू B, D व A मधून जाणारे वर्तुळ काढा. तसेच रेषा BC ही वर्तुळाची स्पर्शिका आहे याचे स्पष्टीकरण द्या.
4 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाला वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून दोन स्पर्शिका अशा काढा, की त्या स्पर्शिकांमधील कोन 60° असेल.
O केंद्र व त्रिज्या 3 सेमी त्रिज्येच्या वर्तुळात वर्तुळाबाहेरील P बिंदूतून 4 सेमी लांबीचा रेख PA हा स्पर्शिकाखंड काढा.
O केंद्र व त्रिज्या 2.8 सेमी असलेल्या वर्तुळाला P या बाह्य बिंदूतून वर्तुळाला PA व PB या स्पर्शिका अशा काढा, की ∠APB = 70°
∠ABC = 50°. बिंदू S हा ∠ABC च्या कोनदुभाजकावर कोणताही एक बिंदू घ्या. बिंदू S केंद्र असलेले असे एक वर्तुळ काढा, की ∠ABC च्या भुजांना स्पर्श करेल.
3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळाला दोन स्पर्शिका अशा काढा, की त्या एकमेकींना लंब असतील.
∠ABC = 60°. ∠ABC चा दुभाजक काढा. कोनदुभाजकावर बिंदू Q असा घ्या, की d(B,Q) = 8 सेमी. Q केंद्र असलेले असे वर्तुळ काढा, की किरण BA व किरण BC ला स्पर्श करेल. वर्तुळाची त्रिज्या व स्पर्शिकाखंडाची लांबी लिहा.
