मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

4 सेमी व 6 सेमी त्रिज्या असलेली व O केंद्र असलेली समकेंद्री वर्तुळे काढा. मोठ्या वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूतून लहान वर्तुळाला स्पर्शिका काढा. स्पर्शिकाखंडांची लांबी लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

4 सेमी व 6 सेमी त्रिज्या असलेली व O केंद्र असलेली समकेंद्री वर्तुळे काढा. मोठ्या वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूतून लहान वर्तुळाला स्पर्शिका काढा. स्पर्शिकाखंडांची लांबी लिहा. 

बेरीज
Advertisements

उत्तर

कच्ची आकृती

दिलेल्या आकृतीत,

रेख RP ही लहान वर्तुळाची स्पर्शिका आहे.

∴ रेख OR ⊥ रेख RP …......[स्पर्शिका-त्रिज्या प्रमेय]

∴ ΔPQR मध्ये, ∠R = 90° 

OP = 6 सेमी व OR = 4 सेमी ….....[वर्तुळांच्या त्रिज्या]

∴ RP2 + OR2 = OP2 …...[पायथागोरसचे प्रमेय] 

∴ RP2 + 42 = 62

∴ RP2 = 36 – 16

∴ RP = `sqrt20`

∴ RP = `2sqrt5` सेमी

रचनेच्या पायऱ्या: 

  1. 4 सेमी व 6 सेमी त्रिज्या असणारी समकेंद्री वर्तुळे काढा.
  2. मोठ्या वर्तुळावर कोणताही बिंदू P घ्या व रेख OP काढा.
  3. रेख OP चा लंबदुभाजक काढा. हा OP ला बिंदू S मध्ये छेदेल.
  4. S केंद्र व OS ही त्रिज्या घेऊन लहान वर्तुळाला बिंदू R मध्ये छेदणारा कंस काढा.
  5. किरण PR काढा. किरण PR ही अपेक्षित स्पर्शिका आहे. 
shaalaa.com
दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे: वर्तुळ केंद्राचा उपयोग करून.
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: भौमितिक रचना - Q ५)

संबंधित प्रश्‍न

केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा.


वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या ______ असते. 


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

वर्तुळकेंद्राचा वापर करून वर्तुळाला वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रमेयाचा उपयोग होतो ?


O केंद्र व त्रिज्या 3.5 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील P बिंदूतून स्पर्शिका काढा. 


रेख AB 6 सेमी व्यास असलेले वर्तुळ काढा. व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.


रेख AB = 6.8 सेमी काढा. रेख AB व्यास असलेले वर्तुळ काढा. वर्तुळावर A व B व्यतिरिक्त बिंदू C घ्या. रेख AC व रेख CB काढा. ∠CAB चे माप लिहा. 


4.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. 120° मापाचा एक कंस PQ काढा. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. 


O केंद्र व त्रिज्या 3 सेमी त्रिज्येच्या वर्तुळात वर्तुळाबाहेरील P बिंदूतून 4 सेमी लांबीचा रेख PA हा स्पर्शिकाखंड काढा.


O केंद्र व त्रिज्या 2.8 सेमी असलेल्या वर्तुळाला P या बाह्य बिंदूतून वर्तुळाला PA व PB या स्पर्शिका अशा काढा, की ∠APB = 70° 


बिंदू P हा रेषा AB पासून 6 सेमी अंतरावर आहे. बिंदू P मधून जाणारे 4 सेमी त्रिज्येचे असे वर्तुळ काढा, की रेषा AB ही वर्तुळाची स्पर्शिका असेल. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×