Advertisements
Advertisements
प्रश्न
ΔPQR ~ ΔLTR, ΔPQR मध्ये PQ = 4.2 सेमी, QR = 5.4 सेमी, PR = 4.8 सेमी आणि `"PQ"/"LT"` = `3/4` तर ΔPQR व ΔLTR काढा.
Advertisements
उत्तर

कच्ची आकृती
विश्लेषण:
आकृतीत दाखवल्याप्रमाणे,
समजा, R - P - L व R - Q - T.
ΔPQR ~ ΔLTR .......[पक्ष]
∴ ∠PRQ ≅ ∠LRT .....[समरूप त्रिकोणांचे संगत कोन]
`"PQ"/"LT" = "QR"/"TR" = "PR"/"LR"` ...(i) [समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]
परंतु, `"PQ"/"LT" = 3/4` ...(ii) [पक्ष]
∴ `"PQ"/"LT" = "QR"/"TR" = "PR"/"LR" = 3/4` ....[(i) व (ii) वरून]
∴ ΔLTR च्या बाजू ΔPQR च्या संगत बाजूंपेक्षा मोठ्या आहेत.
∴ जर रेख QR चे 3 समान भाग केले, तर त्यांतील एका भागाच्या 4 पट रेख TR असेल. म्हणून, जर ΔPQR काढला, तर बिंदू T हा बाजू RQ वर R पासून चार भाग अंतरावर असेल. आता, बिंदू T मधून PQ ला समांतर काढलेली रेषा व किरण RP यांचा छेदनबिंदू L हा आहे.
ΔLTR हा ΔPQR शी समरूप असणारा इष्ट त्रिकोण आहे.
रचनेच्या पायऱ्या:
i. दिलेल्या मापाचा ΔPQR काढा. बाजू RQ शी लघुकोन करणारा किरण RS काढा.
ii. कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन R1, R2, R3 व R4, हे 4 बिंदू असे घ्या, की RR1 = R1R2 = R2R3 = R3R4.
iii R3Q जोडा. R4 मधून R3Q ला समांतर रेषा काढा. ही रेषा किरण RQ ला T बिंदूत छेदते.
iv. बिंदू T मधून PQ ला समांतर रेषा काढा. ही रेषा व किरण RP यांच्या छेदनबिंदूला L नाव द्या.
ΔLTR हा ΔPQR शी समरूप असणारा इष्ट त्रिकोण आहे.

संबंधित प्रश्न
ΔRST ~ ΔXYZ, ΔRST मध्ये RS = 4.5 सेमी, ∠RST = 40°, ST = 5.7 सेमी आणि `"RS"/"XY" = 3/5` तर ΔRST व ΔXYZ काढा.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

आकृतीमध्ये ΔABC ∼ ΔADE आहे, तर त्यांच्या संगत बाजूचे गुणोत्तर ______ आहे.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
ΔPQR ∼ ΔABC, `"PR"/"AC" = 5/7` तर ______
ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये , AB = 3 सेमी, ∠B = 90°, BC = 4 सेमी व त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:4 असल्यास ΔPBQ काढा.
ΔPQR ∼ ΔABC, ΔPQR मध्ये PQ = 3.6 सेमी, QR = 4 सेमी, PR = 4.2 सेमी आहे. त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर 3:2 असल्यास ΔABC काढा.
ΔABC ~ ΔPBR, BC = 8 सेमी, AC = 10 सेमी , ∠B = 90°, `"BC"/"BR" = 5/4`, तर ΔPBR काढा.
ΔPQR ∼ ΔSTU, ΔPQR मध्ये PQ = 5.2 सेमी, QR = 3.6 सेमी, PR = 7.2 सेमी, `"PQ"/"ST" = 4/5`, तर ΔPQR व ΔSTU काढा.
ΔSHR ∼ ΔSVU, ΔSHR मध्ये SH = 4.5 सेमी, HR = 5.2 सेमी, SR = 5.8 सेमी, `"HS"/"SV" = 3/5`, तर ΔSVU काढा.
ΔXYZ ∼ ΔPYR. ΔXYZ मध्ये, XY = 4.5 सेमी, ∠Y = 60°, YZ = 5.1 सेमी व `"XY"/"PY" = 4/7,` तर ΔXYZ व ΔPYR काढा.
ΔPQR मध्ये, ∠P = 40°, PQ ≅ PR, QR = 7 सेमी. ΔXYZ ∼ ΔPQR, XY:PQ = 3:2 असल्यास ΔXYZ काढा.
