Advertisements
Advertisements
प्रश्न
ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये, AB = 4 सेमी, BC = 5 सेमी, AC = 6 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 2:3 असल्यास ΔPBQ काढा.
Advertisements
उत्तर
विश्लेषण:
कच्ची आकृती
आकृतीत दाखवल्याप्रमाणे,
समजा, B – A – P व B – C – Q.
ΔABC ∼ ΔPBQ ..............[पक्ष]
∴ ∠ABC ≅ ∠PBQ ..........[सामाईक कोन]
`"AB"/"PB" = "BC"/"BQ" = "AC"/"PQ"` .............. [समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]
∴ `"AB"/"PB" = "BC"/"BQ" = "AC"/"PQ" = 2/3`
∴ ΔPBQ च्या बाजू ΔABC च्या संगत बाजूंपेक्षा मोठ्या आहेत.
∴ जर रेख BC चे 2 समान भाग केले, तर त्यांतील एका भागाच्या 3 पट रेख BQ असेल.
म्हणून, जर ΔPBQ काढला, तर बिंदू C हा किरण BC वर B पासून 2 भाग अंतरावर असेल व बिंदू Q हा किरण BC वर B पासून 3 भाग अंतरावर असेल. आता, बिंदू Q मधून AC ला समांतर काढलेली रेषा व किरण BA यांचा छेदनबिंदू P हा आहे.
ΔPBQ हा ΔABC शी समरूप असणारा इष्ट त्रिकोण आहे.

रचनेच्या पायऱ्या:
- दिलेल्या मापाचा ΔABC काढा. बाजू BC शी लघुकोन करणारा किरण BX काढा.
- कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन B1, B2 व B3 हे 3 बिंदू असे घ्या, की BB1 = B1B2 = B2B3
- B2C जोडा. B3 मधून B2C ला समांतर रेषा काढा. ही रेषा किरण BC ला Q बिंदूत छेदते.
- बिंदू Q मधून AC ला समांतर रेषा काढा. ही रेषा व किरण BA यांच्या छेदनबिंदूला P नाव द्या.
ΔPBQ हा ΔABC शी समरूप असणारा इष्ट त्रिकोण आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50°, AT = 5.6 सेमी आणि `"AM"/"AH" = 7/5` तर ΔAHE काढा.
जर ΔABC ∼ ΔPQR, `"AB"/"PQ" = 7/5` तर ______
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
ΔLMN ∼ ΔHIJ व `"LM"/"HI" = 2/3`, तर ______
∠PQR हा 115° काढा. त्याचे दोन एकरूप कोनांत विभाजन करा.
ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP व ΔNED काढा.
ΔABC ∼ ΔLMN, ΔABC मध्ये, AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 5.5 सेमी, MN = 4.8 सेमी, तर ΔABC व ΔLMN काढा.
ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP काढा.
ΔABC ~ ΔPBR, BC = 8 सेमी, AC = 10 सेमी , ∠B = 90°, `"BC"/"BR" = 5/4`, तर ΔPBR काढा.
ΔPQR ∼ ΔSTU, ΔPQR मध्ये PQ = 5.2 सेमी, QR = 3.6 सेमी, PR = 7.2 सेमी, `"PQ"/"ST" = 4/5`, तर ΔPQR व ΔSTU काढा.
ΔABC मध्ये, BC = 6 सेमी, ∠B = 45°, ∠A = 100°. ΔABC ∼ ΔPBQ. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:4 असल्यास ΔABC व ΔPBQ काढा.
