English

ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये, AB = 4 सेमी, BC = 5 सेमी, AC = 6 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 2:3 असल्यास ΔPBQ काढा.

Advertisements
Advertisements

Question

ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये, AB = 4 सेमी, BC = 5 सेमी, AC = 6 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 2:3 असल्यास ΔPBQ काढा.

Sum
Advertisements

Solution

विश्लेषण: 

 

कच्ची आकृती

आकृतीत दाखवल्याप्रमाणे,

समजा, B – A – P व B – C – Q.

ΔABC ∼ ΔPBQ ..............[पक्ष]

∴ ∠ABC ≅ ∠PBQ ..........[सामाईक कोन]

`"AB"/"PB" = "BC"/"BQ" = "AC"/"PQ"` .............. [समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]

∴ `"AB"/"PB" = "BC"/"BQ" = "AC"/"PQ" = 2/3` 

∴ ΔPBQ च्या बाजू ΔABC च्या संगत बाजूंपेक्षा मोठ्या आहेत.

∴ जर रेख BC चे 2 समान भाग केले, तर त्यांतील एका भागाच्या 3 पट रेख BQ असेल.

म्हणून, जर ΔPBQ काढला, तर बिंदू C हा किरण BC वर B पासून 2 भाग अंतरावर असेल व बिंदू Q हा किरण BC वर B पासून 3 भाग अंतरावर असेल. आता, बिंदू Q मधून AC ला समांतर काढलेली रेषा व किरण BA यांचा छेदनबिंदू P हा आहे.

ΔPBQ हा ΔABC शी समरूप असणारा इष्ट त्रिकोण आहे.

रचनेच्या पायऱ्या: 

  1. दिलेल्या मापाचा ΔABC काढा. बाजू BC शी लघुकोन करणारा किरण BX काढा.
  2. कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन B1, B2 व B3 हे 3 बिंदू असे घ्या, की BB1 = B1B2 = B2B
  3. B2C जोडा. B3 मधून B2C ला समांतर रेषा काढा. ही रेषा किरण BC ला Q बिंदूत छेदते.
  4. बिंदू Q मधून AC ला समांतर रेषा काढा. ही रेषा व किरण BA यांच्या छेदनबिंदूला P नाव द्या.

ΔPBQ हा ΔABC शी समरूप असणारा इष्ट त्रिकोण आहे. 

shaalaa.com
समरूप त्रिकोणाची रचना
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: भौमितिक रचना - Q ३ (ब)

APPEARS IN

SCERT Maharashtra Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC
Chapter 4 भौमितिक रचना
Q ३ (ब) | Q ५)

RELATED QUESTIONS

ΔABC ∼ ΔLMN, ΔABC असा काढा, की AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 4.5 सेमी आणि `"BC"/"MN" = 5/4` तर ΔABC व ΔLMN काढा.


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

ΔLMN ∼ ΔHIJ व `"LM"/"HI" = 2/3`, तर ______ 


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

आकृतीमध्ये ΔABC ∼ ΔADE आहे, तर त्यांच्या संगत बाजूचे गुणोत्तर ______ आहे. 


ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये , AB = 3 सेमी, ∠B = 90°, BC = 4 सेमी व त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:4 असल्यास ΔPBQ काढा.


ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP काढा.


ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये, AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50°, AT = 5.6 सेमी, `"AM"/"AH" = 7/5`, तर ΔAHE काढा. 


ΔRST ∼ ΔUAY, ΔRST मध्ये, RS = 6 सेमी, ∠S = 50°, ST = 7.5 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 5.4 असल्यास ΔUAY काढा. 


ΔSHR ∼ ΔSVU, ΔSHR मध्ये SH = 4.5 सेमी, HR = 5.2 सेमी, SR = 5.8 सेमी, `"HS"/"SV" = 3/5`, तर ΔSVU काढा.


ΔPQR मध्ये, ∠P = 40°, PQ ≅ PR, QR = 7 सेमी. ΔXYZ ∼ ΔPQR, XY:PQ = 3:2 असल्यास ΔXYZ काढा. 


चौरसाचा कर्ण `sqrt50` सेमी असून असे वर्तुळ काढा, की जे चौरसाच्या सर्व बाजूंना स्पर्श करेल. वर्तुळाची त्रिज्या मोजून लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×