मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50°, AT = 5.6 सेमी आणि AMAH=75 तर ΔAHE काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50°, AT = 5.6 सेमी आणि `"AM"/"AH" = 7/5` तर ΔAHE काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

विश्लेषण:

आकृतीत दाखवल्याप्रमाणे,

समजा, A – H – M व A – E – T.

ΔAMT ~ ΔAHE ......[पक्ष]

∴ ∠TAM ≅ ∠EAH ....[समरूप त्रिकोणांचे संगत कोन]

`"AM"/"AH" = "MT"/"HE" = "AT"/"AE"` .....(i) [समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]

परंतु, `"AM"/"AH" = 7/5`  .....(ii) [पक्ष]

∴ `"AM"/"AH" = "MT"/"HE" = "AT"/"AE" = 7/5`  .....[(i) आणि (ii) वरून]

∴ ΔAMT च्या बाजू या ΔAHE च्या संगत बाजूंपेक्षा अधिक लांबीच्या आहेत.

∴ बाजू AH ची लांबी ही बाजू AM च्या लांबीच्या 7 समान भागांपैकी 5 भाग एवढी असेल. त्यामुळे, जर आपण त्यामुळे काढला, तर बिंदू H हा बाजू AM वर असून तो बिंदू A पासून 5 भाग एवढ्या अंतरावर असेल.
आता, बिंदू E हा किरण AT चा छेदनबिंदू असून H बिंदूतून जाणारी रेषा MT ला समांतर आहे.
ΔAHE हा ΔAMT चा इष्ट समरूप त्रिकोण आहे.

रचनेच्या पायऱ्या:

i. दिलेल्या मापाचा ΔAMT काढा. बाजू AM शी लघुकोन करणारा किरण AB काढा.

ii. कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन किरण AB वर A1, A2, A3, A4, A5, A6 व A7 हे सात बिंदू असे दाखवा, की AA1 = A1A2 = A2A3 = A3A4 = A4A5 = A5A6 = A6A7.

iii. A7M जोडा. बिंदू A5 मधून A7M ला समांतर रेषा काढा. ही रेषा रेख AM ला बिंदू H मध्ये छेदते.

iv. H बिंदूतून बाजू TM ला समांतर रेषा काढा. ही रेषा व रेख AT यांच्या छेदनबिंदूला E नाव द्या. ΔAHE हा ΔAMT शी समरूप असणारा इष्ट त्रिकोण आहे. 

 

shaalaa.com
समरूप त्रिकोणाची रचना
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: भौमितिक रचना - सरावसंच 4.1 [पृष्ठ ९६]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 4 भौमितिक रचना
सरावसंच 4.1 | Q 4. | पृष्ठ ९६

संबंधित प्रश्‍न

ΔRST ~ ΔXYZ, ΔRST मध्ये RS = 4.5 सेमी, ∠RST = 40°, ST = 5.7 सेमी आणि `"RS"/"XY" = 3/5` तर ΔRST व ΔXYZ काढा.


ΔPYQ असा काढा की, PY = 6.3 सेमी, YQ = 7.2 सेमी, PQ = 5.8 सेमी. ΔXYZ हा ΔPYQ शी समरूप त्रिकोण असा काढा की, `"YZ"/"YQ" = 6/5`.


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

आकृतीमध्ये ΔABC ∼ ΔADE आहे, तर त्यांच्या संगत बाजूचे गुणोत्तर ______ आहे. 


रेख AB = 9.7 सेमी लांबीचा काढा. त्यावर बिंदू P असा घ्या, की AP = 3.5 सेमी, A – P – B. बिंदू P मधून रेख AB ला लंब काढा. 


ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये , AB = 3 सेमी, ∠B = 90°, BC = 4 सेमी व त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:4 असल्यास ΔPBQ काढा.


ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP व ΔNED काढा.


ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये, AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50°, AT = 5.6 सेमी, `"AM"/"AH" = 7/5`, तर ΔAHE काढा. 


ΔABC मध्ये, BC = 6 सेमी, ∠B = 45°, ∠A = 100°. ΔABC ∼ ΔPBQ. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:4 असल्यास ΔABC व ΔPBQ काढा. 


ΔPQR ∼ ΔAQB, ΔPQR मध्ये, PQ = 3 सेमी, ∠Q = 90°, QR = 4 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:5 असल्यास ΔAQB काढा. 


ΔPQR मध्ये, ∠P = 40°, PQ ≅ PR, QR = 7 सेमी. ΔXYZ ∼ ΔPQR, XY:PQ = 3:2 असल्यास ΔXYZ काढा. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×