हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

ΔPQR ~ ΔLTR, ΔPQR मध्ये PQ = 4.2 सेमी, QR = 5.4 सेमी, PR = 4.8 सेमी आणि PQLT = 34 तर ΔPQR व ΔLTR काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

ΔPQR ~ ΔLTR, ΔPQR मध्ये PQ = 4.2 सेमी, QR = 5.4 सेमी, PR = 4.8 सेमी आणि `"PQ"/"LT"` = `3/4` तर ΔPQR व ΔLTR काढा.

योग
Advertisements

उत्तर

कच्ची आकृती

विश्लेषण:

आकृतीत दाखवल्याप्रमाणे,

समजा, R - P - L व R - Q - T.

ΔPQR ~ ΔLTR  .......[पक्ष]

∴ ∠PRQ ≅ ∠LRT  .....[समरूप त्रिकोणांचे संगत कोन]

`"PQ"/"LT" = "QR"/"TR" = "PR"/"LR"` ...(i) [समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]

परंतु, `"PQ"/"LT" = 3/4`  ...(ii) [पक्ष]

∴ `"PQ"/"LT" = "QR"/"TR" = "PR"/"LR" = 3/4` ....[(i) व (ii) वरून]

∴ ΔLTR च्या बाजू ΔPQR च्या संगत बाजूंपेक्षा मोठ्या आहेत.

∴ जर रेख QR चे 3 समान भाग केले, तर त्यांतील एका भागाच्या 4 पट रेख TR असेल. म्हणून, जर ΔPQR काढला, तर बिंदू T हा बाजू RQ वर R पासून चार भाग अंतरावर असेल. आता, बिंदू T मधून PQ ला समांतर काढलेली रेषा व किरण RP यांचा छेदनबिंदू L हा आहे.

ΔLTR  हा ΔPQR शी समरूप असणारा इष्ट त्रिकोण आहे.

रचनेच्या पायऱ्या:

i. दिलेल्या मापाचा ΔPQR काढा. बाजू RQ शी लघुकोन करणारा किरण RS काढा.

ii. कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन R1, R2, R3 व R4, हे 4 बिंदू असे घ्या, की RR1 = R1R2 = R2R3 = R3R4

iii R3Q जोडा. R4 मधून R3Q ला समांतर रेषा काढा. ही रेषा किरण RQ ला T बिंदूत छेदते.

iv. बिंदू T मधून PQ ला समांतर रेषा काढा. ही रेषा व किरण RP यांच्या छेदनबिंदूला L नाव द्या. 

ΔLTR हा ΔPQR शी समरूप असणारा इष्ट त्रिकोण आहे.

shaalaa.com
समरूप त्रिकोणाची रचना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: भौमितिक रचना - Q ३ (ब)

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 4 भौमितिक रचना
सरावसंच 4.1 | Q 2. | पृष्ठ ९६

संबंधित प्रश्न

ΔABC ∼ ΔLMN, ΔABC असा काढा, की AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 4.5 सेमी आणि `"BC"/"MN" = 5/4` तर ΔABC व ΔLMN काढा.


ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50°, AT = 5.6 सेमी आणि `"AM"/"AH" = 7/5` तर ΔAHE काढा.


जर ΔABC ∼ ΔPQR, `"AB"/"PQ" = 7/5` तर ______ 


जर ΔABC ~ ΔLBN, ΔABC मध्ये AB= 5.1 सेमी, ∠B = 40°, BC = 4.8 सेमी, `"AC"/"LN" = 4/7` तर ΔABC व ΔLBN काढा.


ΔPYQ असा काढा की, PY = 6.3 सेमी, YQ = 7.2 सेमी, PQ = 5.8 सेमी. ΔXYZ हा ΔPYQ शी समरूप त्रिकोण असा काढा की, `"YZ"/"YQ" = 6/5`.


ΔPQR ∼ ΔABC, ΔPQR मध्ये PQ = 3.6 सेमी, QR = 4 सेमी, PR = 4.2 सेमी आहे. त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर 3:2 असल्यास ΔABC काढा. 


ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP काढा.


ΔPQR ∼ ΔSTU, ΔPQR मध्ये PQ = 5.2 सेमी, QR = 3.6 सेमी, PR = 7.2 सेमी, `"PQ"/"ST" = 4/5`, तर ΔPQR व ΔSTU काढा.


ΔPQR ∼ ΔAQB, ΔPQR मध्ये, PQ = 3 सेमी, ∠Q = 90°, QR = 4 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:5 असल्यास ΔAQB काढा. 


एक समद्विभुज त्रिकोण असा काढा, की त्याचा पाया 5 सेमी व उंची 4 सेमी आहे. त्या त्रिकोणाला समरूप त्रिकोण असा काढा, की त्याच्या बाजू मूळ त्रिकोणाच्या संगत बाजूंच्या `2/3` पट आहेत.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×