Advertisements
Advertisements
प्रश्न
ΔPYQ असा काढा की, PY = 6.3 सेमी, YQ = 7.2 सेमी, PQ = 5.8 सेमी. ΔXYZ हा ΔPYQ शी समरूप त्रिकोण असा काढा की, `"YZ"/"YQ" = 6/5`.
Advertisements
उत्तर
कच्ची आकृती
विश्लेषण:
आकृतीत दाखवल्याप्रमाणे,
समजा, Y - Q - Z व Y – P – X.
ΔXYZ ∼ ΔPYQ ....[पक्ष]
∴ ∠XYZ ≅ ∠PYQ ....[समरूप त्रिकोणांचे संगत कोन]
`"XY"/"PY" = "YZ"/"YQ" = "XZ"/"PQ"` .....(i) [समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]
परंतू, `"YZ"/"YQ" = 6/5` ....(ii) [पक्ष]
∴ `"XY"/"PY" = "YZ"/"YQ" = "XZ"/"PQ" = 6/5` ......[(i) व (ii) वरून]
∴ ΔXYZ च्या बाजू ΔPYQ च्या संगत बाजूंपेक्षा मोठ्या आहेत.
∴ जर रेख YQ चे 5 समान भाग केले, तर रेख YZ ही त्यातील एका भागाच्या 6 पट एवढ्या लांबीची असेल. म्हणूनच, जर ΔPYQ काढला, तर बिंदू Z हा बाजू YQ वर Y पासून 6 भाग अंतरावर असेल. आता, बिंदू Z मधून PQ ला समांतर काढलेली रेषा व किरण YP यांचा छेदनबिंदू X हा आहे. ΔXYZ हा ΔPYQ शी समरूप असलेला इष्ट त्रिकोण आहे.
रचनेच्या पायऱ्या:
i. दिलेल्या मापाचा ΔPYQ काढा. बाजू YQ शी लघुकोन करणारा किरण YT काढा.
ii. कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन किरण YT वर Y1, Y2, Y3, Y4, Y5 आणि Y6 हे 6 बिंदू असे घ्या, की YY1 = Y1Y2 = Y2Y3 = Y3Y4 = Y4Y5 = Y5Y6.
iii. Y5Q जोडा. Y6 मधून Y5Q ला समांतर रेषा काढा. ही रेषा किरण YQ ला बिंदू Z मध्ये छेदते.
iv. बिंदू Z मधून बाजू PQ ला समांतर रेषा काढा. ही रेषा व किरण YP यांच्या छेदनबिंदूला X नाव द्या.
ΔXYZ हा ΔPYQ चा इष्ट समरूप त्रिकोण आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
ΔPQR ~ ΔLTR, ΔPQR मध्ये PQ = 4.2 सेमी, QR = 5.4 सेमी, PR = 4.8 सेमी आणि `"PQ"/"LT"` = `3/4` तर ΔPQR व ΔLTR काढा.
जर ΔABC ∼ ΔPQR, `"AB"/"PQ" = 7/5` तर ______
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
ΔABC ∼ ΔAQR `"AB"/"AQ" = 7/5` असल्यास, खालीलपैकी कोणता पर्याय सत्य आहे?
रेख AB = 9.7 सेमी लांबीचा काढा. त्यावर बिंदू P असा घ्या, की AP = 3.5 सेमी, A – P – B. बिंदू P मधून रेख AB ला लंब काढा.
ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये, AB = 4 सेमी, BC = 5 सेमी, AC = 6 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 2:3 असल्यास ΔPBQ काढा.
ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP काढा.
ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये, AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50°, AT = 5.6 सेमी, `"AM"/"AH" = 7/5`, तर ΔAHE काढा.
ΔPQR ∼ ΔAQB, ΔPQR मध्ये, PQ = 3 सेमी, ∠Q = 90°, QR = 4 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:5 असल्यास ΔAQB काढा.
एक समद्विभुज त्रिकोण असा काढा, की त्याचा पाया 5 सेमी व उंची 4 सेमी आहे. त्या त्रिकोणाला समरूप त्रिकोण असा काढा, की त्याच्या बाजू मूळ त्रिकोणाच्या संगत बाजूंच्या `2/3` पट आहेत.
चौरसाचा कर्ण `sqrt50` सेमी असून असे वर्तुळ काढा, की जे चौरसाच्या सर्व बाजूंना स्पर्श करेल. वर्तुळाची त्रिज्या मोजून लिहा.
