Advertisements
Advertisements
प्रश्न
ΔABC ~ ΔPBR, BC = 8 सेमी, AC = 10 सेमी , ∠B = 90°, `"BC"/"BR" = 5/4`, तर ΔPBR काढा.
Advertisements
उत्तर
विश्लेषण:

कच्ची आकृती
∆ABC मध्ये, ∠B = 90° ......[पक्ष]
∴ AC2 = AB2 + BC2 ......…[पायथागोरसच्या प्रमेयानुसार]
∴ 102 = AB2 + 82
∴ AB2 = 100 – 64
∴ AB2 = 36
∴ AB = 6 सेमी ............[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढून]
रचनेच्या पायऱ्या:
- 8 सेमी लांबीचा रेख BC काढा.
- ∠B = 90° घ्या आणि त्यावर 6 सेमीचा कंस काढा. त्या बिंदूला A नाव द्या.
- रेख AC जोडून ∆ABC मिळवा.
- ∠CBX हा लघुकोन मिळेल असा किरण BX काढा.
- किरण BX वर B1, B2, B3, B4, B5 हे बिंदू असे घ्या, की BB1 = B1B2 = B2B3 = B3B4 = B4B5.
- बिंदू C व B5 जोडा.
- बिंदू B4 मधून CB5 ला समांतर रेषा काढा. ही रेषा रेख BC ला बिंदू R मध्ये छेदते.
- R बिंदूतून बाजू AC ला समांतर रेषा काढा. ही रेषा व रेख AB यांच्या छेदनबिंदूला P नाव द्या.
∆PBR हा ∆ABC शी समरूप असणारा इष्ट त्रिकोण आहे.

संबंधित प्रश्न
ΔRST ~ ΔXYZ, ΔRST मध्ये RS = 4.5 सेमी, ∠RST = 40°, ST = 5.7 सेमी आणि `"RS"/"XY" = 3/5` तर ΔRST व ΔXYZ काढा.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका परस्परांना ______ असतात.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
ΔLMN ∼ ΔHIJ व `"LM"/"HI" = 2/3`, तर ______
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
ΔABC ∼ ΔAQR `"AB"/"AQ" = 7/5` असल्यास, खालीलपैकी कोणता पर्याय सत्य आहे?
5 सेमी बाजू असलेला समभुज ΔABC काढा. ΔABC ∼ ΔLMN. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 6:7 असल्यास ΔLMN काढा.
ΔABC ∼ ΔLMN, ΔABC मध्ये, AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 5.5 सेमी, MN = 4.8 सेमी, तर ΔABC व ΔLMN काढा.
ΔPQR ∼ ΔSTU, ΔPQR मध्ये PQ = 5.2 सेमी, QR = 3.6 सेमी, PR = 7.2 सेमी, `"PQ"/"ST" = 4/5`, तर ΔPQR व ΔSTU काढा.
ΔSHR ∼ ΔSVU, ΔSHR मध्ये SH = 4.5 सेमी, HR = 5.2 सेमी, SR = 5.8 सेमी, `"HS"/"SV" = 3/5`, तर ΔSVU काढा.
एक समद्विभुज त्रिकोण असा काढा, की त्याचा पाया 5 सेमी व उंची 4 सेमी आहे. त्या त्रिकोणाला समरूप त्रिकोण असा काढा, की त्याच्या बाजू मूळ त्रिकोणाच्या संगत बाजूंच्या `2/3` पट आहेत.
ΔPQR मध्ये, ∠P = 40°, PQ ≅ PR, QR = 7 सेमी. ΔXYZ ∼ ΔPQR, XY:PQ = 3:2 असल्यास ΔXYZ काढा.
