Advertisements
Advertisements
प्रश्न
चौरसाचा कर्ण `sqrt50` सेमी असून असे वर्तुळ काढा, की जे चौरसाच्या सर्व बाजूंना स्पर्श करेल. वर्तुळाची त्रिज्या मोजून लिहा.
Advertisements
उत्तर

कच्ची आकृती
आकृतीत दर्शवल्याप्रमाणे, `square`ABCD हा चौरस आहे.
∴ ΔABC मध्ये, ∠B = 90° ........[चौरसाचा कोन]
AC = `sqrt50` सेमी ............[पक्ष]
समजा, AB = BC = a सेमी
∴ AC2 = AB2 + BC2 ...........[पायथागोरसचे प्रमेय]
∴ 50 = a2 + a2
∴ 2a2 = 50
∴ a2 = 25
∴ a = 5 सेमी
5 सेमी बाजू असलेला चौरस काढू.
वर्तुळाचे केंद्र मिळवण्यासाठी बाजू AB व BC वर अनुक्रमे बिंदू Q व P वर लंबदुभाजक काढू. हे लंबदुभाजक परस्परांना R बिंदूमध्ये छेदतात.
PR किंवा QR ही त्रिज्या घेऊन व R हे केंद्र घेऊन आपण अपेक्षित वर्तुळ काढू शकतो.

रचनेच्या पायऱ्या:
- 5 सेमी बाजू असलेला ABCD हा चौरस काढा.
- बाजू AB ला बिंदू Q वर छेदणारा लंबदुभाजक काढा. बाजू BC ला बिंदू P वर छेदणारा लंबदुभाजक काढा. ह्या लंबदुभाजकांच्या छेदनबिंदूला R नाव द्या.
- R हे केंद्र व RP ही त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
ΔPQR ~ ΔLTR, ΔPQR मध्ये PQ = 4.2 सेमी, QR = 5.4 सेमी, PR = 4.8 सेमी आणि `"PQ"/"LT"` = `3/4` तर ΔPQR व ΔLTR काढा.
ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50°, AT = 5.6 सेमी आणि `"AM"/"AH" = 7/5` तर ΔAHE काढा.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
ΔLMN ∼ ΔHIJ व `"LM"/"HI" = 2/3`, तर ______
रेख AB = 9.7 सेमी लांबीचा काढा. त्यावर बिंदू P असा घ्या, की AP = 3.5 सेमी, A – P – B. बिंदू P मधून रेख AB ला लंब काढा.
ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये, AB = 4 सेमी, BC = 5 सेमी, AC = 6 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 2:3 असल्यास ΔPBQ काढा.
5 सेमी बाजू असलेला समभुज ΔABC काढा. ΔABC ∼ ΔLMN. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 6:7 असल्यास ΔLMN काढा.
ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये AM = 6.3 सेमी, ∠MAT = 120°, AT = 4.9 सेमी, `"AM"/"HA" = 7/5` तर ΔAHE काढा.
ΔRST ∼ ΔUAY, ΔRST मध्ये, RS = 6 सेमी, ∠S = 50°, ST = 7.5 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 5.4 असल्यास ΔUAY काढा.
ΔPQR ∼ ΔAQB, ΔPQR मध्ये, PQ = 3 सेमी, ∠Q = 90°, QR = 4 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:5 असल्यास ΔAQB काढा.
ΔPQR मध्ये, ∠P = 40°, PQ ≅ PR, QR = 7 सेमी. ΔXYZ ∼ ΔPQR, XY:PQ = 3:2 असल्यास ΔXYZ काढा.
