HSC Arts (Marathi Medium)
HSC Commerce (Marathi Medium)
Academic Year: 2024-2025
Date & Time: 9th July 2025, 11:00 am
Duration: 3h
Advertisements
सूचनाः
- सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
- आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके/आकृत्या काढा.
- उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
- सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत.
सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत.
(अ) राशी पद्धत
(ब) समग्र पद्धत
(क) विभाजन पद्धत
(ड) सर्वसमावेशक पद्धत
अ, क आणि ड
अ, ब आणि ड
फक्त क
फक्त अ
Chapter:
पूर्ण स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका पुढील प्रकारची असते.
(अ) किंमतकर्ता
(ब) किंमत स्वीकारणारा
(क) किंमतभेद करणारा
(ड) यांपैकी नाही
अ, ब आणि क
फक्त ब
फक्त क
अ आणि क
Chapter:
किंमत निर्देशांकाच्या संबंधात असलेली विधाने शोधा.
(अ) निर्देशांक एक भौगोलिक साधन आहे.
(ब) निर्देशांकात हवेच्या दाबाचे मोजमाप केले जाते.
(क) निर्देशांकात आर्थिक चलातील सापेक्ष बदलाचे मोजमाप केले जाते.
(ड) निदेशाक हा विशिष्ट सरासरमध्ये असतो.
क आणि ड
अ आणि ब
ब आणि क
अ आणि ड
Chapter:
सरकारच्या सक्तीच्या कार्यांमध्ये पुढीलपैकी या कार्यांचा समावेश होतो.
(अ) परकीय आक्रमणांपासून संरक्षण
(ब) अंतर्गत कायदा व सुव्यवस्था
(क) कल्याणकारी उपाययोजना
(ड) वस्तू व सेवांची निर्यात
क आणि ड
अ आणि ब
फक्त ब
अ, क आणि ड
Chapter:
विदेशी व्यापाराचे प्रकार खालीलप्रकारे आहेत.
(अ) आयात व्यापार
(ब) निर्यात व्यापार
(क) पुनर्निर्यात व्यापार
(ड) अंतर्गत व्यापार
अ, आणि ब
अ, ब आणि क
अ, ब, क आणि ड
यांपैकी नाही
Chapter:
अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा:
अशी इच्छा, जिला खरेदीशक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते.
Chapter:
एका जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर खर्चात झालेली निव्वळ वाढ.
Chapter: [4] पुरवठा विश्लेषण
अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा:
बाजाराचा असा प्रकार ज्यात काही विक्रेते असतात.
Chapter:
अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा:
एका वर्षांच्या कालावधीत देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य.
Chapter:
अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा:
राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी-विक्री.
Chapter:
सूक्ष्म अर्थशास्त्राला ______ म्हणूनही ओळखले जाते.
किंमत सिद्धांत
उत्पन सिद्धांत
वृद्धीचे सिद्धांत
विकासाचे सिद्धांत
Chapter:
जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमान्त उपयोगिता ______.
धन असते
ऋण असते
शून्य असते
एक असते
Chapter:
‘क्ष’ अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र ______.
संपूर्ण लवचीक मागणी
संपूर्ण अलवचीक मागणी
जास्त लवचीक मागणी
कमी लवचीक मागणी
Chapter:
भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी केंद्रीय सांख्यिकीय संघटनेद्वारे वापरली जाणारी पद्धत ______.
उत्पादन पद्धती
उत्पन्न पद्धती
खर्च पद्धती
उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती यांचे एकत्रीकरण
Chapter:
अल्पमुदती कर्ज देणारा व घेणारा वित्तीय बाजार ______.
नाणे बाजार
भांडवल बाजार
श्रम बाजार
वस्तू बाजार
Chapter:
Advertisements
विसंगत शब्द ओळखा:
उपयोगितेचे प्रकार:
रूप उपयोगिता, स्थल उपयोगिता, सीमान्त उपयोगिता, सेवा उपयोगिता
Chapter:
विसंगत शब्द ओळखा:
मागणीचे निर्धारक घटक:
किंमत, उत्पन्न, पर्यायी वस्तूंच्या किंमती, गिफेनचा विरोधाभास
Chapter:
विसंगत शब्द ओळखा:
मागणीच्या किंमत लवचीकता मोजण्याच्या पद्धती:
उत्पन्न पद्धती, शेकडेवारी पद्धती, एकूण खर्च पद्धती, बिंदू पद्धती/भूमिती पद्धती
Chapter:
विसंगत शब्द ओळखा:
पुरवठा नियमाचे अपवाद:
श्रमाचा पुरवठा, कृषी उत्पादने, प्रतिष्ठेच्या वस्तू, नाशवंत वस्तू
Chapter:
विसंगत शब्द ओळखा:
करेतर उत्पन्नाचे स्रोत:
शुल्क, सीमा शुल्क, विशेष अधिभार, दंड व दंडात्मक रकमा
Chapter:
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
राजूने भारतीय अर्थव्यवस्थेतील एकूण उपभोग, एकूण बचत आणि एकूण गुंतवणूक यांची माहिती गोळा केली.
Chapter:
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
x वस्तूच्या किंमतीत २०% ने वाढ झाली असता x वस्तूच्या मागणीत २०% ने घट होते.
Chapter:
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
स्वराला महाराष्ट्र राज्य सरकारकडून दरमहा ₹ ८००० निवृत्तीवेतन मिळते.
Chapter:
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
तुषारने ₹ १,००,००० एक रकमी रक्कम तीन वर्षांकरिता बँकेत जमा केली.
Chapter:
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
कागदाच्या किंमती स्थिर असून सुद्धा कागद बनविण्याच्या कारखान्यातील तांत्रिक अडचणी मुळे शरदला कमी कागदाचा पुरवठा करावा लागला.
Chapter:
फरक स्पष्ट करा.
विभाजन पद्धत व राशी पद्धत
Chapter: [1] सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय
फरक स्पष्ट करा.
मागणीतील वृद्धी आणि मागणीचा विस्तार
Chapter:
फरक स्पष्ट करा.
साठा व पुरवठा
Chapter: [4] पुरवठा विश्लेषण
फरक स्पष्ट करा.
साधा निर्देशांक व भारान्वित निर्देशांक
Chapter: [6] निर्देशांक
फरक स्पष्ट करा.
सार्वजनिक वित्त व्यवहार व खाजगी वित्त व्यवहार
Chapter: [8] भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार
Advertisements
सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
Chapter:
पूर्ण स्पर्धेची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
Chapter:
राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्रीय प्रतिमान स्पष्ट करा.
Chapter:
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.
घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला कोणतेही खरे अपवाद नाहीत.
Chapter:
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.
मक्तेदारीयुक्त स्पर्धेची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
Chapter:
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.
निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत.
Chapter:
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.
भारतातील नाणे बाजार महत्त्वाची भूमिका बजावतो.
Chapter:
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.
व्यवहारतोल आणि व्यापारतोल ह्या दोन संकल्पनांमध्ये फरक नाही.
Chapter:
खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा:
| वस्तूचे नग | एकूण उपयोगिता (TU) |
सीमांत उपयोगिता (MU) |
| १ | १० | `square` |
| २ | १८ | ८ |
| ३ | `square` | ६ |
| ४ | २८ | ४ |
| ५ | ३० | `square` |
| ६ | ३० | ० |
| ७ | `square` | -२ |
प्रश्न:
- वरील तक्ता पूर्ण करा. (२)
- जेव्हा एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते तेव्हा सीमांत उपयोगिता ______. (१)
- वस्तूचे सहा नग उपभोगल्यावर सीमांत उपयोगिता ______ उपयोगिता होते. (१)
Chapter:
खालौल आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा:
आकृती ‘अ’

आकृती ‘ब’

प्रश्न:
- आकृती ‘अ’ पुरवठ्यातील ______ दर्शवते. (१)
- आकृती ‘ब’ पुरबठ्यातील ______ दर्शवते. (१)
- आकृती ‘अ’ मध्ये पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या ______ बाजूस सरकतो. (१)
- आकृती ‘ब’ मध्ये पुरवठा वक्त मूळ पुरवठा वक्राच्या ______ बाजूस सरकतो. (१)
Chapter:
खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे दया:
|
भारत सरकार आणि सरकारच्या विविध संस्था आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचे निरीक्षण आणि गणना विविध पद्धतीने करतात जसे एकूण उत्पादन पद्धत, उत्पन्न आणि एकूण खर्च पद्धत, इ. मुळे आपल्याला भारताच्या आर्थिक कामगिरीचे सर्वसमावेशक चित्र समजते. सन २००१ ते २०२१ च्या कालावधीत भारताचे स्थूल देशांतर्गत उत्पादन सरासरी वार्षिक ६ ते ७% नी वाढले. भारतात प्रामुख्याने शेतीप्रधान अर्थव्यवस्थेत अधिक वैविध्यपूर्ण झालेला बदल भारताने पाहिला आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या रचनेमध्ये सेवा आणि औदयोगिक क्षेत्र प्रमुख भूमिका बजावत आहेत. तथापि हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की आपल्या अर्थव्य्थेत बरेच चढउतार व आव्हाने होती. २००८ मधील जागतिक आर्थिक संकट आणि २०२० मधील कोविड-१९ साथीच्या रोगामुळे उत्पन्न वाढीच्या प्रवृत्तीत तात्पुरता व्यत्यय आला. अलीकडच्या वर्षात भारताने शाश्वत आर्थिक विकासाच्या ध्येयपूर्तीसाठी माहिती आणि तंत्रज्ञान विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. अर्थव्यस्थेला चालना देण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’ या सारखे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आर्थिक क्रिया आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्याचा राष्ट्रीय उत्पन्नावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. |
प्रश्न:
- २००१ ते २०२१ या कालावधीसाठी भारताचा सरासरी वार्षिक विकास दर किती आहे? (१)
- भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीच्या प्रवृत्तीमध्ये कोणत्या घटकांनी व्यत्यय आणला? (१)
- दिलेल्या उताऱ्यावर स्वमत लिहा. (२)
Chapter:
मागणीचा नियम स्पष्ट करून मागणीच्या नियमाची गृहीतके स्पष्ट करा.
Chapter:
मागणीची लवचीकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा.
Chapter:
सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कोणतीही चार कारणे स्पष्ट करा.
Chapter: [8] भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Economics [अर्थशास्त्र] with solutions 2024 - 2025
Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Economics [अर्थशास्त्र], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].
How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Economics [अर्थशास्त्र] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
