हिंदी

खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा. भारतातील नाणे बाजार महत्त्वाची भूमिका बजावतो. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.

भारतातील नाणे बाजार महत्त्वाची भूमिका बजावतो.

सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

या विधानाशी मी सहमत आहे.

कारणे: भारतातील नाणे बाजाराची भूमिका पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते:

  1. कर्जदाराची अल्पमुदतीच्या गरजेची पूर्तता: नाणे बाजार कर्जदारांना त्यांच्या कमी कालावधीच्या पैशांच्या गरजा योग्य आणि वास्तव व्याजदरात पूर्ण करण्यास मदत करतो.
  2. तरलता व्यवस्थापन: नाणे बाजारामुळे अर्थव्यवस्थेत पैशाचा प्रवाह वाढतो. सरकारच्या मौद्रिक धोरणामुळे बाजारात रोखता (तरलता) येते, ज्यामुळे पैशाचे नियोजन अधिक प्रभावी होते आणि देशाला आर्थिक स्थैर्य व प्रगती मिळते.
  3. गुंतवणूक पत्रक व्यवस्थापन: नाणे बाजार गुंतवणूकदारांना विविध अल्पमुदतीची साधने उपलब्ध करून देतो. यामुळे गुंतवणुकीचे नियोजन करणे सोपे होते, पैशाला गती मिळते आणि देशाच्या एकूण आर्थिक विकासाला हातभार लागतो.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×