Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.
निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत.
सत्य या असत्य
Advertisements
उत्तर
या विधानाशी मी सहमत नाही.
कारणे:
निर्देशांकांच्या पुढील काही मर्यादा आहेत:
- नमुन्यावर आधारित: निर्देशांक हे सर्वसाधारणपणे नमुन्यावर आधारित असतात. निर्देशांक तयार करताना आपण सर्व घटक समाविष्ट करू शकत नाही. परिणामी, नमुना त्रुटींचा निर्देशांकावर परिणाम होतो.
- आकडेवारीवर आधारित: निर्देशांक विविध प्रकारच्या माहितीवर आधारित असतात, जी अपूर्ण असू शकते. गोळा केलेल्या आकडेवारीमध्ये पक्षपातीपणा असू शकतो. याचा नकारात्मक परिणाम निर्देशांकांवर पडतो.
- सूत्राची उणीव: निर्देशांक तयार करण्यासाठी कोणतेही परिपूर्ण सूत्र नाही. हे केवळ एक सरासरी आहे, त्यामुळे सरासरीच्या सर्व मर्यादा निर्देशांकाला लागू होतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
