हिंदी

खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा. मक्तेदारीयुक्त स्पर्धेची अनेक वैशिष्ट्ये आहेत.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.

मक्तेदारीयुक्त स्पर्धेची अनेक वैशिष्ट्ये आहेत.

सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

या विधानाशी मी सहमत आहे.

कारणे:

मक्तेदारीयुक्त स्पर्धेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  1. अनेक विक्रेत: मक्तेदारीयुक्त स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या खूप मोठी असते. तरीही, ही संख्या पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्यांच्या तुलनेत कमी असते. विक्रेत्यांची संख्या अधिक असल्याने प्रत्येक विक्रेत्याचे बाजारपेठेतील पुरवठ्यावर अल्प नियंत्रण असते. मात्र, प्रत्येक विक्रेत्याचे स्वतःच्या ब्रॅण्डवर (छापवर) पूर्ण नियंत्रण असते. परिणामी, प्रत्येक उत्पादकाची स्वतःच्या उत्पादनाबाबत मक्तेदारी असते, तरीही त्यांना जवळचा पर्याय असलेल्या इतर विक्रेत्यांशी स्पर्धा करावी लागते.
  2. असंख्य ग्राहक: मक्तेदारीयुक्त बाजारपेठेत ग्राहकांची संख्या खूप मोठी असते. यामुळे, कोणताही एक ग्राहक स्वतःची मागणी बदलून वस्तूच्या किमतीत बदल घडवून आणू शकत नाही.
  3. वस्तूभेद: वस्तूभेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या बाजारपेठेत अनेक कंपन्या विशिष्ट प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन करतात. या बाजारातील प्रत्येक कंपनीचे उत्पादन दुसऱ्या कंपनीच्या उत्पादनापेक्षा कोणत्या ना कोणत्या बाबतीत वेगळे असते.हा वस्तुभेद ब्रॅण्ड (छाप), व्यापारी चिन्ह (ट्रेडमार्क), वस्तूची आकर्षक बांधणी, दर्जा, नक्षीकाम, रंग, वेष्टन, आकार इत्यादींच्या आधारे केला जातो. याचा अर्थ असा की, प्रत्येक कंपनीच्या वस्तूला बाजारात जवळचे पर्याय उपलब्ध असतात आणि उत्पादनांच्या मागणीची 'छेदक लवचिकता' खूप जास्त असते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×