Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.
मक्तेदारीयुक्त स्पर्धेची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
चूक किंवा बरोबर
Advertisements
उत्तर
या विधानाशी मी सहमत आहे.
कारणे: मक्तेदारीयुक्त स्पर्धेची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
- अनेक विक्रेते: मक्तेदारीयुक्त स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या अल्पाधिकारापेक्षा जास्त पण पूर्ण स्पर्धेपेक्षा कमी असते. येथील उत्पादक आपल्या वेगळ्या (विभेदित) वस्तूचा मक्तेदार असला तरी, त्याला जवळचे पर्याय असलेल्या इतर विक्रेत्यांच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागते.
- असंख्य ग्राहक: या बाजारात ग्राहकांची संख्या खूप मोठी असते. एका ग्राहकाची मागणी ही एकूण बाजार मागणीचा अतिशय लहान भाग असल्याने, कोणताही एक ग्राहक वस्तूच्या किमतीवर नियंत्रण मिळवू शकत नाही.
- वस्तुभेद: वस्तुभेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. उत्पादकाची वस्तू चिन्ह, रंग, आकार किंवा दर्जा यानुसार इतरांपेक्षा थोडी वेगळी असते, ज्याला ‘वस्तुभेद’ म्हणतात. वस्तू काही प्रमाणात सारख्या व काही प्रमाणात वेगळ्या असल्याने येथे जवळचे पर्याय उपलब्ध असतात, परिणामी मागणीची छेदक लवचीकता अधिक असते. उदा. साबण, मोबाइल किंवा टूथपेस्ट.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
