Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
सार्वजनिक वित्त व्यवहार व खाजगी वित्त व्यवहार
अंतर स्पष्ट करें
Advertisements
उत्तर १
| अ. क्र. | मुद्दे | सार्वजनिक वित्त व्यवहार | खाजगी वित्त व्यवहार |
| १. | अर्थ | सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे शासन किंवा सार्वजनिक संस्था यांच्या उत्पन्न आणि खर्चाशी संबंधित असलेल्या बाबींचा अभ्यास होय. | खाजगी वित्त व्यवहार म्हणजे व्यक्ती, कुटुंबे आणि खाजगी संस्था यांच्या उत्पन्न आणि खर्चाचा अभ्यास होय. |
| २. | समायोजन | सरकार वेगवेगळ्या क्षेत्रांवरील खर्चाच्या आकारमानानुसार (प्रमाणानुसार) उत्पन्नात समायोजन करते. | व्यक्ती आपापल्या उत्पन्नुसार आपला खर्च समायोजित करतात. |
| ३. | उद्दिष्टे | सार्वजनिक वित्त व्यवहाराचे उद्दिष्ट समाजाला महत्तम लाभ मिळवून देणे असते. | खाजगी वित्त व्यवहाराचे उद्दिष्ट स्वहिताची पूर्तता करणे असते. |
| ४. | अंदाजपत्रकाचे स्वरूप | शासन प्रामुख्याने तुटीचे अंदाजपत्रक स्वीकारते. | व्यक्ती साधारणपणे शिलकीचे अंदाजपत्रक स्वीकारते. |
| ५. | वित्तीय व्यवहार | हे व्यवहार खुले आणि सर्वांना माहित असतात. | हे व्यवहार गुप्त ठेवले जातात. |
| ६. | खर्चाचे निर्धारण | शासन सर्वप्रथम आपल्या खर्चाची पातळी व खर्चाचे भिन्न मार्ग निश्चित करते. | व्यक्ती प्रथम आपले वैयक्तिक उत्पन्न विचारात घेते आणि खर्चाचे मार्ग निश्चित करते. |
| ७. | चल छापण्याचा अधिकार | भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत शासनाला नोटा छापण्याचा अधिकार असतो. | खाजगी व्यक्तीला नोटा किंवा चलन छापण्याचा अधिकार नसतो. |
| ८. | अर्थव्यवस्थेवरील परिणाम | सार्वजनिक वित्त व्यवहाराचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रभाव पडतो. | खाजगी वित्त व्यवहाराचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर नगण्य परिणाम होतो. |
| ९. | वित्त व्यवहारातील लवचीकता | सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचिक असतो, कारण शासन गरजेनुसार उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधू शकते. | खाजगी वित्त व्यवहारात फारसे बदल करण्यास वाव नसतो. |
| १०. | पत स्थिती | शासनाची बाजारपेठेतील पत मोठ्या प्रमाणावर असते. | खाजगी व्यक्तीची पत मर्यादित असते. |
shaalaa.com
उत्तर २
| अ. क्र. | तुलनेतील आधार | सार्वजनिक वित्त व्यवहार | खाजगी वित्त व्यवहार |
| १. | अर्थ | सर्वसामान्य नागरिकांना महत्तम लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने शासनाने केलेले वित्त व्यवहार, म्हणजे ‘सार्वजनिक वित्त व्यवहार’ होत. | स्वहिताची पूर्तता करण्याच्या उद्देशाने व्यक्तीने किंवा खाजगी संस्थेने केलेले वित्त व्यवहार, म्हणजे ‘खाजगी वित्त व्यवहार’ होत. |
| २. | लवचीकता | सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचीक असतात. सार्वजनिक वित्त व्यवहारांत बदल करण्यास वाव असतो. | खाजगी वित्त व्यवहार कमी लवचीक असतात. खाजगी वित्त व्यवहारांत बदल करण्यास फारसा वाव नसतो. |
shaalaa.com
सार्वजनिक वित्त व्यवहार
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
