मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

फरक स्पष्ट करा. सार्वजनिक वित्त व्यवहार व खाजगी वित्त व्यवहार

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

सार्वजनिक वित्त व्यवहार व खाजगी वित्त व्यवहार

फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर १

अ. क्र. मुद्दे सार्वजनिक वित्त व्यवहार खाजगी वित्त व्यवहार
१. अर्थ सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे शासन किंवा सार्वजनिक संस्था यांच्या उत्पन्न आणि खर्चाशी संबंधित असलेल्या बाबींचा अभ्यास होय. खाजगी वित्त व्यवहार म्हणजे व्यक्ती, कुटुंबे आणि खाजगी संस्था यांच्या उत्पन्न आणि खर्चाचा अभ्यास होय.
२. समायोजन सरकार वेगवेगळ्या क्षेत्रांवरील खर्चाच्या आकारमानानुसार (प्रमाणानुसार) उत्पन्नात समायोजन करते. व्यक्ती आपापल्या उत्पन्नुसार आपला खर्च समायोजित करतात.
३. उद्दिष्टे सार्वजनिक वित्त व्यवहाराचे उद्दिष्ट समाजाला महत्तम लाभ मिळवून देणे असते. खाजगी वित्त व्यवहाराचे उद्दिष्ट स्वहिताची पूर्तता करणे असते.
४. अंदाजपत्रकाचे स्वरूप शासन प्रामुख्याने तुटीचे अंदाजपत्रक स्वीकारते. व्यक्ती साधारणपणे शिलकीचे अंदाजपत्रक स्वीकारते.
५. वित्तीय व्यवहार हे व्यवहार खुले आणि सर्वांना माहित असतात. हे व्यवहार गुप्त ठेवले जातात.
६. खर्चाचे निर्धारण शासन सर्वप्रथम आपल्या खर्चाची पातळी व खर्चाचे भिन्न मार्ग निश्चित करते. व्यक्ती प्रथम आपले वैयक्तिक उत्पन्न विचारात घेते आणि खर्चाचे मार्ग निश्चित करते.
७. चल छापण्याचा अधिकार भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत शासनाला नोटा छापण्याचा अधिकार असतो. खाजगी व्यक्तीला नोटा किंवा चलन छापण्याचा अधिकार नसतो.
८. अर्थव्यवस्थेवरील परिणाम सार्वजनिक वित्त व्यवहाराचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रभाव पडतो. खाजगी वित्त व्यवहाराचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर नगण्य परिणाम होतो.
९. वित्त व्यवहारातील लवचीकता सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचिक असतो, कारण शासन गरजेनुसार उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधू शकते. खाजगी वित्त व्यवहारात फारसे बदल करण्यास वाव नसतो.
१०. पत स्थिती शासनाची बाजारपेठेतील पत मोठ्या प्रमाणावर असते. खाजगी व्यक्तीची पत मर्यादित असते.
shaalaa.com

उत्तर २

अ. क्र. तुलनेतील आधार सार्वजनिक वित्त व्यवहार खाजगी वित्त व्यवहार
१. अर्थ सर्वसामान्य नागरिकांना महत्तम लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने शासनाने केलेले वित्त व्यवहार, म्हणजे ‘सार्वजनिक वित्त व्यवहार’ होत. स्वहिताची पूर्तता करण्याच्या उद्देशाने व्यक्‍तीने किंवा खाजगी संस्थेने केलेले वित्त व्यवहार, म्हणजे ‘खाजगी वित्त व्यवहार’ होत.
२. लवचीकता सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचीक असतात. सार्वजनिक वित्त व्यवहारांत बदल करण्यास वाव असतो. खाजगी वित्त व्यवहार कमी लवचीक असतात. खाजगी वित्त व्यवहारांत बदल करण्यास फारसा वाव नसतो.
shaalaa.com
सार्वजनिक वित्त व्यवहार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 8 भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार
फरक स्पष्ट करा. | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×