Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये स्पष्ट करा.
भारतीय रिझर्व्ह बँकेची कोणतीही चार कार्ये स्पष्ट करा.
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये-
- चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक: रिझर्व्ह बँकेकडे एक रुपया व नाणी सोडून सर्व रूपयांच्या नोटा निर्माण करता येतात. १९५७ च्या ‘किमान राखीव प्रणालीनुसार’ रिझर्व्ह बँकेला किमान २०० कोटी रुपये ठेव ठेवावी लागते. यापैकी ११५ कोटी सोन्याच्या स्वरूपात आणि ८५ कोटी परकीय चलनाच्या स्वरूपात ठेवले जाते.
- सरकारची बँक: रिझर्व्ह बँक सरकारची बँक, सरकारची सल्लागार आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करते. ही केंद्र व राज्य सरकारच्या व्यवसायाचे व्यवहार करते, पैसे स्विकारते आणि सरकारच्या वतीने देणी देते. तसेच सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन देखील करते. ही सरकारला अनेक आर्थिक विषयांवर सल्ला देते.
- बँकांची बँक: रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांवर वैधानिक नियंत्रण ठेवते. सर्व अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकेकडे त्यांच्या मागणी व मुदत ठेवींनुसार किमान रोख निधी राखीव ठेवणे अनिवार्य असते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना त्यांच्या योग्य हुंड्या वटवून देऊन आर्थिक साहाय्य करते. तसेच मंजुरी दिलेल्या तारणाच्या बदल्यात बँकांना कर्ज उपलब्ध करून देते.
- परकीय चलनसाठ्याचा सांभाळ करणे: रिझर्व्ह बँक देशाच्या परकीय चलनसाठ्याचे संरक्षक म्हणून काम करते. त्यास रुपयाचे अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे, स्थिरता निश्चित करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांच्या चलनांची खरेदी व विक्री करण्याचे कार्य रिझर्व्ह बँक करते.
- पतपैशाचे नियंत्रण: देशातील सर्वोच्च बँक म्हणून रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या पतपुरवठ्याच्या आकारमानावर व वापरावर नियंत्रण ठेवते. संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करून पतनियंत्रण केले जाते. संख्यात्मक पतनियंत्रणामध्ये बँकदर, खुल्या बाजारातील रोखेव्यवहार आणि रोकड निधीचे बदलते गुणोत्तर जसे रोकड निधीचे गुणोत्तर (C.R.R.) व सांविधानिक रोखतेचे गुणोत्तर (S.L.R) इत्यादी साधनांचा समावेश होतो. तर गुणात्मक पतनियंत्रणामध्ये कर्ज व तारण यांमधील गाळ्याचे नियमन, कर्जाचे नियंत्रित वाटप, नैतिक मनधरणी इत्यादी साधनांचा समावेश होतो.
- आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्धीस देणे: रिझर्व्ह बँक बँकिंग आणि अर्थव्यवस्थेच्या इतर वित्तीय क्षेत्रांच्या संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून ती प्रसिद्ध करते.
- विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य: रिझर्व्ह बँक निमशहरी आणि ग्रामीण भागात बँकिंग सेवा वाढविणे, ठेवीदारांना संरक्षण देणे, कृषी पतपुरवठा आणि औद्योगिक पतपुरवठा यांच्यासाठी काही विकासात्मक कामे करते.
- इतर कार्ये: रिझर्व्ह बँक आपल्या सदस्य बँकांच्या खात्यामधील आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी निरसन केंद्र म्हणून काम करते. व्यापारी बँकांचा अंतिम ॠणदाता म्हणून आर्थिक संकटात असलेल्या बँकांना आर्थिक साहाय्य पुरवते.
shaalaa.com
Notes
Students should refer to the answer according to their question.
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Board Question Paper
