Advertisements
Advertisements
प्रश्न
मागणीच्या नियमाची गृहीतके स्पष्ट करा.
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
मागणीच्या नियमाची गृहीतके पुढीलप्रमाणे आहेत:
- स्थिर उत्पन्नपातळी: मागणीचा नियम जर अनुभवायचा असेल तर उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर असावे. जर उत्पन्न पातळीत वाढ झाली तर उपभोक्त्यांकडून किमतीत वाढ होऊनही मागणीत वाढ केली जाईल.
- लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही: देशातील लोकसंख्येचा आकारमान आणि रचना वस्तूंची एकूण मागणी प्रभावित करते. त्यामुळे असे गृहीत धरले जाते की, लोकसंख्येचेआकारमान स्थिर आहे.
- पर्यायी वस्तूंच्या स्थिर किमती: पर्यायी वस्तूंच्या किमतीत बदल होत नाही, असे गृहीत धरले आहे. कारण पर्यायी वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूंच्या मागणीवर होतो.
- पूरक वस्तूंच्या स्थिर किमती: पूरक वस्तूंच्या किमतीत बदल होत नाही, असे गृहीत धरले आहे. कारण पूरक वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होतो.
- भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही: उपभोक्त्यांची भविष्यात किंमतविषयक बदल घडून येण्याची कोणतीही अपेक्षा नाही, असे गृहीत धरले आहे. जर भविष्यात वस्तूची किंमत वाढण्याचा अंदाज असेल तर उपभोक्ते सध्या किंमत वाढत असतानाही जास्त मागणी करू शकतात.
- आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन्स इत्यादींमध्ये बदल होत नाही: उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन इत्यादींमध्ये बदल होत नाही, असे गृहीत धरले आहे. यामध्ये बदल झाल्यास मागणीमध्ये बदल होतो.
- करविषयक धोरणात बदल नाही: प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांबाबतच्या सरकारी धोरणांचा विविध वस्तू व सेवांच्या मागणीवर मोठा प्रभाव पडतो. सरकारने जाहीर केलेल्या करविषयक सरकारी धोरणांमध्ये कोणताही बदल होत नाही, असे गृहीत धरले आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
