English

मागणीच्या नियमाची गृहीतके स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

Question

मागणीच्या नियमाची गृहीतके स्पष्ट करा.

Explain
Advertisements

Solution

मागणीच्या नियमाची गृहीतके पुढीलप्रमाणे आहेत:

  1. स्थिर उत्पन्नपातळी: मागणीचा नियम जर अनुभवायचा असेल तर उपभोक्‍त्‍याचे उत्‍पन्न स्‍थिर असावे. जर उत्‍पन्न पातळीत वाढ झाली तर उपभोक्‍त्यांकडून किमतीत वाढ होऊनही मागणीत वाढ केली जाईल.
  2. लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही: देशातील लोकसंख्येचा आकारमान आणि रचना वस्‍तूंची एकूण मागणी प्रभावित करते. त्‍यामुळे असे गृहीत धरले जाते की, लोकसंख्येचेआकारमान स्‍थिर आहे.
  3. पर्यायी वस्‍तूंच्या स्‍थिर किमती: पर्यायी वस्‍तूंच्या किमतीत बदल होत नाही, असे गृहीत धरले आहे. कारण पर्यायी वस्‍तूंच्या किमतीत बदल झाला तर त्‍याचा परिणाम वस्‍तूंच्या मागणीवर होतो.
  4. पूरक वस्‍तूंच्या स्‍थिर किमती: पूरक वस्‍तूंच्या किमतीत बदल होत नाही, असे गृहीत धरले आहे. कारण पूरक वस्‍तूंच्या किमतीत बदल झाला तर त्‍याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होतो.
  5. भविष्‍यात किंमत बदलाची अपेक्षा नाही: उपभोक्‍त्‍यांची भविष्‍यात किंमतविषयक बदल घडून येण्याची कोणतीही अपेक्षा नाही, असे गृहीत धरले आहे. जर भविष्‍यात वस्‍तूची किंमत वाढण्याचा अंदाज असेल तर उपभोक्‍ते सध्या किंमत वाढत असतानाही जास्‍त मागणी करू शकतात.
  6. आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन्स इत्‍यादींमध्ये बदल होत नाही: उपभोक्‍त्यांच्या आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन इत्‍यादींमध्ये बदल होत नाही, असे गृहीत धरले आहे. यामध्ये बदल झाल्‍यास मागणीमध्ये बदल होतो.
  7. करविषयक धोरणात बदल नाही: प्रत्‍यक्ष आणि अप्रत्‍यक्ष करांबाबतच्या सरकारी धोरणांचा विविध वस्‍तू व सेवांच्या मागणीवर मोठा प्रभाव पडतो. सरकारने जाहीर केलेल्‍या करविषयक सरकारी धोरणांमध्ये कोणताही बदल होत नाही, असे गृहीत धरले आहे.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×