English

मागणीचा नियम स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

Question

मागणीचा नियम स्पष्ट करा.

Explain
Law
Advertisements

Solution

सन १८९० मध्ये प्रकाशित झालेल्‍या ‘अर्थशास्‍त्राची मूलतत्‍त्‍वे’ या ग्रंथात प्रा.आल्‍फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाची मांडणी केली आहे. या नियमाद्वारे किंमत व मागणी यातील परस्‍पर संबंध स्‍पष्‍ट केला आहे.

प्रा. आल्‍फ्रेड मार्शल यांच्या मते, ‘‘इतर परिस्‍थिती स्‍थिर असताना वस्‍तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्‍तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते.’’ दुसऱ्या शब्‍दांत,इतरपरिस्‍थिती कायम असताना, वस्‍तूच्या किमतीत वाढ होतेतेव्हा वस्‍तूच्या मागणीत घट होतेआणि जेव्हा वस्‍तूच्या किंमतीत घट होतेतेव्हा वस्‍तूच्या मागणीत वाढ होते. अशा प्रकारे किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्‍त स्‍वरूपाचा म्‍हणजेच परस्‍परविरोधी असतो. मागणी व किंमत यांचा फलनसंबंध खालील प्रकारेस्‍पष्‍ट करता येतो.

Dx = f (Px)

येथे D = वस्‍तूची मागणी (Demand for the commodity)

x = वस्‍तू (Commodity)

f = फलन (Function of)

Px = वस्‍तूची किंमत (Price of the commodity)

‘क्ष’ वस्‍तूची किंमत
(₹)
‘क्ष’ वस्‍तूची मागणी
(किलो)
५०
४०
३०
२०
१०

तक्‍ता मध्ये दर्शविल्‍याप्रमाणे, जेव्हा ‘क्ष’ वस्‍तूची किंमत प्रतिकिलोस ५० ₹ असते, तेव्हा मागणी १ किलो आहे. परंतु जेव्हा किंमत ५० ₹ वरून ४० ₹ पर्यंत कमी होते, तेव्हा मागणी १ किलोवरून २ किलोपर्यंत वाढते. ज्‍या वेळेस वस्‍तूची किंमत ३० ₹ असते, तेव्हा मागणी ३ किलो होते. त्‍याचप्रमाणे किंमत २० ₹ प्रति किलो असताना ४ किलो मागणी केली जाते आणि किंमत १० ₹ पर्यंत घटते तेव्हा मागणी ५ किलोपर्यंत वाढते. यावरून असे स्‍पष्‍ट होते की, जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा मागणीत वाढ होते आणि वस्‍तूंची किंमत वाढते तेव्हा मागणीत घट होते. म्‍हणजेच किंमत व मागणी यांत व्यस्‍त स्‍वरूपाचा संबंध असतो.

आकृती मध्ये, ‘क्ष’ अक्षावर वस्‍तूची मागणी आणि ‘य’ अक्षावर किंमत दर्शविली आहे. ‘मम’ हा मागणी वक्र आहे. जो डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो. म्‍हणजे मागणी वक्राचा आकार ॠणात्‍मक असतो. कारण हा वक्र किंमत आणि मागणीचा व्यस्‍त संबंध दर्शवितो.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×