Advertisements
Advertisements
Question
खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे दया:
|
भारत सरकार आणि सरकारच्या विविध संस्था आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचे निरीक्षण आणि गणना विविध पद्धतीने करतात जसे एकूण उत्पादन पद्धत, उत्पन्न आणि एकूण खर्च पद्धत, इ. मुळे आपल्याला भारताच्या आर्थिक कामगिरीचे सर्वसमावेशक चित्र समजते. सन २००१ ते २०२१ च्या कालावधीत भारताचे स्थूल देशांतर्गत उत्पादन सरासरी वार्षिक ६ ते ७% नी वाढले. भारतात प्रामुख्याने शेतीप्रधान अर्थव्यवस्थेत अधिक वैविध्यपूर्ण झालेला बदल भारताने पाहिला आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या रचनेमध्ये सेवा आणि औदयोगिक क्षेत्र प्रमुख भूमिका बजावत आहेत. तथापि हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की आपल्या अर्थव्य्थेत बरेच चढउतार व आव्हाने होती. २००८ मधील जागतिक आर्थिक संकट आणि २०२० मधील कोविड-१९ साथीच्या रोगामुळे उत्पन्न वाढीच्या प्रवृत्तीत तात्पुरता व्यत्यय आला. अलीकडच्या वर्षात भारताने शाश्वत आर्थिक विकासाच्या ध्येयपूर्तीसाठी माहिती आणि तंत्रज्ञान विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. अर्थव्यस्थेला चालना देण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’ या सारखे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आर्थिक क्रिया आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्याचा राष्ट्रीय उत्पन्नावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. |
प्रश्न:
- २००१ ते २०२१ या कालावधीसाठी भारताचा सरासरी वार्षिक विकास दर किती आहे? (१)
- भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीच्या प्रवृत्तीमध्ये कोणत्या घटकांनी व्यत्यय आणला? (१)
- दिलेल्या उताऱ्यावर स्वमत लिहा. (२)
Advertisements
Solution
- ६ ते ७ टक्के
- २००८ मधील जागतिक आर्थिक संकट आणि २०२० मधील कोविड-१९ हा साथीचा रोग या घटकांनी भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीच्या प्रवृत्तीमध्ये व्यत्यय आणला.
- सन २००१ पासून भारताचे स्थूल देशांतर्गत उत्पादन सरासरी वार्षिक ६ ते ७ टक्क्यांनी वाढत आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’ यांसारख्या उपक्रमांमुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
