Advertisements
Advertisements
प्रश्न
मागणीचा नियम स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
सन १८९० मध्ये प्रकाशित झालेल्या ‘अर्थशास्त्राची मूलतत्त्वे’ या ग्रंथात प्रा.आल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाची मांडणी केली आहे. या नियमाद्वारे किंमत व मागणी यातील परस्पर संबंध स्पष्ट केला आहे.
प्रा. आल्फ्रेड मार्शल यांच्या मते, ‘‘इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते.’’ दुसऱ्या शब्दांत,इतरपरिस्थिती कायम असताना, वस्तूच्या किमतीत वाढ होतेतेव्हा वस्तूच्या मागणीत घट होतेआणि जेव्हा वस्तूच्या किंमतीत घट होतेतेव्हा वस्तूच्या मागणीत वाढ होते. अशा प्रकारे किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपाचा म्हणजेच परस्परविरोधी असतो. मागणी व किंमत यांचा फलनसंबंध खालील प्रकारेस्पष्ट करता येतो.
Dx = f (Px)
येथे D = वस्तूची मागणी (Demand for the commodity)
x = वस्तू (Commodity)
f = फलन (Function of)
Px = वस्तूची किंमत (Price of the commodity)
| ‘क्ष’ वस्तूची किंमत (₹) |
‘क्ष’ वस्तूची मागणी |
