English

मागणीची लवचीकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

Question

मागणीची लवचीकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा.

Explain
Advertisements

Solution

मागणीच्या लवचीकतेचे निर्धारक पुढीलप्रमाणे आहेत:

  1. वस्तूचे स्वरूप: वस्‍तूंच्या स्‍वरूपानुसार जीवनावश्यक वस्‍तू, सुखसोईच्या वस्‍तू आणि चैनीच्या वस्‍तू असे वर्गीकरण केले जाते. जीवनावश्यक वस्‍तू, उदा., अन्नधान्य, औषधे, पुस्‍तके इत्‍यादींची मागणी अलवचीक असते. सुखसोई आणि चैनीच्या वस्‍तू उदा., कार, अत्‍तर (सुगंधी द्रव्ये), फर्निचर इत्‍यादींची मागणी लवचीक असते.
  2. पर्यायी वस्तूंची उपलब्धता: जेव्हा वस्‍तूला बाजारात अनेक पर्याय उपलब्‍ध असतात अशा वस्‍तूंची मागणी सर्वसाधारणपणे लवचीक असते. उदा., लिंबू सरबत, उसाचा रस इत्‍यादी. पण वस्‍तूला बाजारात जवळचा पर्याय उपलब्‍ध नसेल. उदा., मीठ; तर अशा वस्‍तूंची मागणी अलवचीक असते.
  3. वस्‍तूचे अनेक उपयोग: एकाच उपयोगासाठी असणाऱ्या वस्‍तूची लवचिकता कमी लवचीक असते. विविधोपयोगी वस्‍तूंची मागणी जास्‍त लवचीक असते. उदा., कोळसा, वीज इत्‍यादी.
  4. व्यसनाच्या वस्‍तू: सवयीच्या वस्‍तूंची मागणी अलवचीक असते. उदा., व्यसन, अमली पदार्थ इत्‍यादी.
  5. टिकाऊपणा: टिकाऊ वस्‍तूची मागणी जास्‍त लवचीक असते. उदा., फर्निचर, धुलाईयंत्र इत्‍यादी. तर नाशवंत वस्‍तूंची मागणी अलवचीक असते.उदा., दूध, भाजीपाला इत्‍यादी.
  6. पूरक वस्तू: एक गरज पूर्ण करण्यासाठी अनेक वस्‍तूंना मागणी केली जाते. अशा पूरक वस्‍तूंची मागणी अलवचीक असते. उदा., मोबाइलची किंमत कमी झाली तर सिमकार्डची मागणी वाढू शकते.
  7. उपभोक्‍त्‍यांचे उत्‍पन: उपभोक्‍त्‍यांची उत्‍पन्न पातळी उच्च असेल तर मागणी अलवचीक असते. उच्चभ्रू व्यक्‍ती आणि गरीब व्यक्‍तींच्या मागणीवर किंमत बदलाचा परिणाम क्‍वचितच होतो.
  8. गरजेची तीव्रता: ज्‍या वस्‍तूची गरज अधिक तीव्र असते. त्‍या वस्‍तूची मागणी कमी लवचीक असते.उदा., औषधे. ज्‍या वस्‍तूची गरज कमी तीव्र असते. त्‍या वस्‍तूची मागणी जास्‍त लवचीक असते. उदा., मोटारगाडी.
  9. कालावधी: सामान्यपणेअसे सांगता येईल की, कालावधी जेवढा अधिक तेवढी मागणीची किंमत लवचिकता अधिक असते आणि कालावधी जेवढा कमी तेवढी मागणीची किंमत लवचिकता कमी असते. कारण उपभोक्‍त्‍याच्या उपभोगप्रवृत्‍ती दीर्घ कालावधीत स्‍वस्‍त व पर्यायी वस्‍तूंच्या बाजूने बदलू शकतात.
  10. उत्‍पन्नातील खर्चाचे प्रमाण: वस्‍तूवरील खर्चाचेएकूण उत्‍पन्नातील प्रमाण कमी असेल तर मागणी अलवचीक असते. उदा., वर्तमानपत्रे. जेव्हा वस्‍तूवरील खर्चाचेप्रमाण जास्‍त असेल तर मागणी जास्‍त लवचीक असते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×