HSC Arts (Marathi Medium)
HSC Commerce (Marathi Medium)
Academic Year: 2023-2024
Date & Time: 1st August 2024, 11:00 am
Duration: 3h
Advertisements
सूचना:
- सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.
- आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके/आकृत्या काढा.
- उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे गुण दर्शवतात.
- सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहा.
सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत.
(अ) राशी पद्धत
(ब) समग्र पद्धत
(क) विभाजन पद्धत
(ड) सर्वसमावेशक पद्धत
अ, ब, क आणि ड
ब, क आणि ड
फक्त क
फक्त ड
Chapter:
राष्ट्रीय उत्पन्न ही एक ______ संकल्पना आहे.
(अ) साठा
(ब) अंतिम
(क) मध्य
(ड) प्रवाह
अ आणि ब
फक्त ड
ब आणि क
अ, ब आणि क
Chapter:
भारताच्या पेट्रोलिअम आयातीचा स्रोत.
(अ) कुवेत
(ब) सौदी अरेबिया
(क) चीन
(ड) सिंगापूर
अ आणि ब
क आणि ड
अ, ब आणि क
ब, क आणि ड
Chapter:
सरकारच्या अनिवार्य/सक्तीच्या कार्यांमध्ये पुढीलपैकी या कार्याचा समावेश होतो.
(अ) रोजगारनिर्मिती
(ब) अंतर्गत कायदा व सुव्यवस्था
(क) कल्याणकारी उपाययोजना
(ड) वस्तू व सेवांची निर्यात
अ आणि ब
क आणि ड
अ, ब आणि क
फक्त ब
Chapter:
वित्तीय व्यवस्थेत व्यापारी बँका मध्यस्थ म्हणून काम करतात; कारण ______.
(अ) नफा कमवणे
(ब) देशाच्या आर्थिक वृद्धीचा वेग वाढवणे
(क) बचती गतिमान करणे आणि उत्पादक गुंतवणुकीसाठी वाटप करणे
(ड) पतनियंत्रण करणे
फक्त अ
अ आणि ब
ब आणि क
अ, ब, क आणि ड
Chapter:
सहसंबंध पूर्ण करा:
नाणे बाजार : अल्पकालीन निधी : : ______ : दीर्घकालीन निधी
Chapter:
सहसंबंध पूर्ण करा:
टेबल-खुर्ची : रूप उपयोगिता : : संगणकाची माहिती : ______
Chapter:
सहसंबंध पूर्ण करा:
______ : कापड : : अप्रत्यक्ष मागणी : कामगार
Chapter:
सहसंबंध पूर्ण करा:
तात्त्विक अडचण : हस्तांतरित देणी : : ______ : मालाच्या साठ्याचे मूल्यांकन
Chapter:
सहसंबंध पूर्ण करा:
सरकारी खर्च > सरकारी प्राप्ती : तुटीचे अंदाजपत्रक : : सरकारी खर्च = सरकारी प्राप्ती : ______
Chapter:
विसंगत शब्द ओळखा:
जीवनावश्यक वस्तू:
अन्नधान्य, औषधे, कार, पुस्तके.
Chapter:
विसंगत शब्द ओळखा:
निर्देशांकांचे प्रकार:
भारान्वित निर्देशांक, किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक.
Chapter:
विसंगत शब्द ओळखा:
पायाभूत सुविधा:
वाहतूक, संचार, पाणीपुरवठा, अनुदान.
Chapter:
विसंगत शब्द ओळखा:
बँक खात्यांचे प्रकार:
बचत खाते, डीमॅट खाते, आवर्त ठेव खाते, चालू खाते.
Chapter:
विसंगत शब्द ओळखा:
उत्पादन घटकांच्या किमतींचे तत्त्व:
नफा, व्याज, बेकारी भत्ता, खंड.
Chapter:
जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते, तेव्हा एकूण उपयोगिता ______.
वाढते
स्थिर असते
घटते
शून्य असते
Chapter:
Advertisements
मागणी व किंमत यांचा फलनसंबंध पुढील सूत्राने दर्शवू शकतो ______.
Dx = f (Px)
Dx = f (P2)
Dx = f (Y)
Dx = f (Tx)
Chapter:
भारताच्या विदेशी व्यापाराच्या निर्यात कलातील घटक ______.
पेट्रोलिअम
अभियांत्रिकी वस्तू
सोने
खते
Chapter:
‘य’ अक्षास समांतर असलेला किंमत लवचीकतेचा मागणी वक्र ______.
संपूर्ण लवचीक मागणी
संपूर्ण अलवचीक मागणी
जास्त लवचीक मागणी
कमी लवचीक मागणी
Chapter:
एक अधिक नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे ______.
एकूण प्राप्ती
सरासरी प्राप्ती
सीमांत खर्च
सीमांत प्राप्ती
Chapter:
पुढील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा:
सफरचंदाची किंमत १०% नी कमी झाली असता विनयने सफरचंदाच्या मागणीत १०% नी वाढ केली.
Chapter:
पुढील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा:
रमाकांतने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ₹ ८०,००० उत्पन्न कर भरला.
Chapter:
पुढील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा:
माधुरीने ₹ १ लाखाची एकरकमी रक्कम ५ वर्षांकरिता बँकेत ठेवली.
Chapter:
पुढील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा:
सुनिताला राज्यसरकारकडून दरमहा ₹ ३०,००० निवृत्तिवेतन मिळते.
Chapter:
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
भारताने इराणकडून पेट्रोल खरेदी केले.
Chapter:
फरक स्पष्ट करा.
अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार
Chapter:
फरक स्पष्ट करा.
किंमत निर्देशांक व संख्यात्मक निर्देशांक
Chapter: [6] निर्देशांक
फरक स्पष्ट करा.
नाणे बाजार व भांडवल बाजार
Chapter: [9] भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार
स्थूल अर्थशास्त्राची कोणतीही चार वैशिष्ट्ये लिहा.
Chapter: [1] सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय
मागणीचे कोणतेही चार प्रकार स्पष्ट करा.
Chapter: [3.1] मागणीचे विश्लेषण
Advertisements
पुरवठ्याचे कोणतेही चार निर्धारक घटक स्पष्ट करा.
Chapter:
निर्देशांकाच्या कोणत्याही चार मर्यादा स्पष्ट करा.
Chapter:
पुढील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.
असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते हे पूर्ण स्पर्धेचे एकमेव वैशिष्ट्य आहे.
Chapter:
पुढील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.
भारतात नाणे बाजाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
Chapter:
पुढील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.
‘आर्थिक कल्याणाचे सिद्धांत’ याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो.
Chapter:
पुढील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.
पुरवठ्याचा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो.
Chapter:
पुढील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.
निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो.
Chapter:
पुढील तक्ता अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:
| पावती नं. - ०५ दिनांक: १४.८.२०१८ टेबल क्र. - ०१ वेळ: १०.३० a.m. कर्मचारी - अमित |
||||
| अनु.क्र. | तपशील | संख्या | दर | रक्कम |
| (१) | रजिस्टर वही | ०२ | ४२.०० | ८४.०० |
| (२) | पेन | १० | ०८.०० | ८०.०० |
| (३) | पेन्सिल | १० | ०४.४० | ४४.०० |
| (४) | रबर | १० | ०४.४० | ४४.०० |
| (५) | स्केल (पट्टी) | ०३ | ०८.०० | २४.०० |
| एकूण = २७६.०० SGST ६% = १६.५६ CGST ६% = १६.५६ एकूण = ३०९.१२ |
||||
| GST. NO. 27AAXPN3502E128 ग्राहकाची सही |
||||
| अधिकृत विक्रेता | ||||
प्रश्न:
- वस्तू व सेवा करांचे (tax) संक्षिप्त नाव लिहा. (१)
- वरील बिलात SGST आणि CGST किती टक्के (%) लावला आहे? (१)
- वरील बिलात पेनचा मूळ दर किती आहे? (१)
- विक्रेत्याचा GST NO. काय आहे? (१)
Chapter:
पुढील आकृती अभ्यासून आकृतीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा:

प्रश्न:
- वरील आकृतीत ‘क्ष’ अक्षावर काय दर्शवले आहे? (१)
- कोणत्या किमतीला मागणी व पुरवठ्याचा समतोल साधला आहे? (१)
- वरील आकृतीत ‘य’ अक्षावर काय दर्शवले आहे? (१)
- वरील आकृतीत मागणी व पुरवठ्याचा समतोल कोणत्या बिंदूने दर्शवला आहे? (१)
Chapter:
पुढील उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:
|
मागणीनुसार अर्थव्यवस्था (ऑन डिमांड इकॉनॉमी) मागणीनुसार अर्थव्यवस्था म्हणजे डिजिटल मार्केट आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी वस्तू आणि सेवांचे तत्काळ वितरण करून ग्राहकांची मागणी त्यांच्या इच्छेनुसार पूर्ण करण्यासाठी तयार केलेली आर्थिक क्रिया होय. मागणीनुसार अर्थव्यवस्थेला कधी-कधी ‘ऍक्सेस इकॉनॉमी’ असे संबोधले जाते. कारण येथील कंपन्या बाजारात असणाऱ्या त्यांच्या साखळी दुकानांना आणि घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांना तसेच ग्राहकांना त्यांच्या सोईनुसार वस्तू व सेवा पुरवठ्याचे मार्ग निर्माण करतात. ग्राहकांच्या सुविधेनुसार आणि या वस्तू व सेवांचा उत्तमप्रकारे सहज अनुभव मिळावा यासाठी सोयी, वेग आणि साधेपणा यांसारख्या वैशिष्ट्यांना या कंपन्या प्राधान्यक्रम देतात. तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार व आवडीनिवडीनुसार या कंपन्या वस्तू व सेवांचा पुरवठा करणे, त्या परत घेणे आणि वस्तू व सेवा लवकरात लवकर उपलब्ध करून देणे यांसारखी विविध सुविधात्मक कामे करतात. त्यामुळेच आज मागणीनुसार अर्थव्यवस्था अतुलनीय वेगाने वाढत आहे. आजकाल लोकांद्वारे सर्रासपणे उपयोगात आणलेल्या अनेक लोकप्रिय सेवा ऑन-डिमांड अर्थव्यवस्थेची उदाहरणे आहेत. राईड शेअरिंग प्लॅटफॉर्म उबर आणि ओला, तसेच घरपोच किराणा पोहोचवणारे बिग बास्केट, डुन्झो, रिलायंस जिओ मार्ट हे अशा सेवा पुरवणाऱ्या अर्थव्यवस्थेची थोडी उदाहरणे आहेत. |
प्रश्न:
- मागणीनुसार अर्थव्यवस्थेला काय म्हणतात? (१)
- मागणीनुसार अर्थव्यवस्थेची कोणतीही दोन उदाहरणे लिहा. (१)
- वरील उताऱ्याविषयी आपले मत लिहा. (२)
Chapter:
राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या कोणत्याही दोन पद्धती स्पष्ट करा.
Chapter:
घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहीतके स्पष्ट करा.
Chapter:
मागणीच्या किंमत लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करा.
Chapter: [3.2] मागणीची लवचिकता
मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा.
Chapter: [3.2] मागणीची लवचिकता
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Economics [अर्थशास्त्र] with solutions 2023 - 2024
Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2024 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Economics [अर्थशास्त्र], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].
How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Economics [अर्थशास्त्र] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
