English

पुढील उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा: (१) मागणीनुसार अर्थव्यवस्थेला काय म्हणतात? मागणीनुसार (२) अर्थव्यवस्थेची कोणतीही दोन उदाहरणे लिहा. (३) वरील उताऱ्याविषयी आपले मत लिहा. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:

मागणीनुसार अर्थव्यवस्था (ऑन डिमांड इकॉनॉमी)

मागणीनुसार अर्थव्यवस्था म्हणजे डिजिटल मार्केट आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी वस्तू आणि सेवांचे तत्काळ वितरण करून ग्राहकांची मागणी त्यांच्या इच्छेनुसार पूर्ण करण्यासाठी तयार केलेली आर्थिक क्रिया होय. मागणीनुसार अर्थव्यवस्थेला कधी-कधी ‘ऍक्सेस इकॉनॉमी’ असे संबोधले जाते. कारण येथील कंपन्या बाजारात असणाऱ्या त्यांच्या साखळी दुकानांना आणि घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांना तसेच ग्राहकांना त्यांच्या सोईनुसार वस्तू व सेवा पुरवठ्याचे मार्ग निर्माण करतात.

ग्राहकांच्या सुविधेनुसार आणि या वस्तू व सेवांचा उत्तमप्रकारे सहज अनुभव मिळावा यासाठी सोयी, वेग आणि साधेपणा यांसारख्या वैशिष्ट्यांना या कंपन्या प्राधान्यक्रम देतात. तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार व आवडीनिवडीनुसार या कंपन्या वस्तू व सेवांचा पुरवठा करणे, त्या परत घेणे आणि वस्तू व सेवा लवकरात लवकर उपलब्ध करून देणे यांसारखी विविध सुविधात्मक कामे करतात. त्यामुळेच आज मागणीनुसार अर्थव्यवस्था अतुलनीय वेगाने वाढत आहे.

आजकाल लोकांद्वारे सर्रासपणे उपयोगात आणलेल्या अनेक लोकप्रिय सेवा ऑन-डिमांड अर्थव्यवस्थेची उदाहरणे आहेत. राईड शेअरिंग प्लॅटफॉर्म उबर आणि ओला, तसेच घरपोच किराणा पोहोचवणारे बिग बास्केट, डुन्झो, रिलायंस जिओ मार्ट हे अशा सेवा पुरवणाऱ्या अर्थव्यवस्थेची थोडी उदाहरणे आहेत.

प्रश्न:

  1. मागणीनुसार अर्थव्यवस्थेला काय म्हणतात? (१)
  2. मागणीनुसार अर्थव्यवस्थेची कोणतीही दोन उदाहरणे लिहा. (१)
  3. वरील उताऱ्याविषयी आपले मत लिहा. (२)
Short Answer
Advertisements

Solution

  1. मागणीनुसार अर्थव्यवस्थेला ‘ऍक्सेस इकॉनॉमी’ म्हणतात.
  2. मागणीनुसार अर्थव्यवस्थेची दोन उदाहरणे म्हणजे
    • उबर
    • रिलायन्स जिओ मार्केट
  3. मागणीनुसार अर्थव्यवस्थेमुळे वस्तू आणि सेवा सहजपणे उपलब्ध होतात आणि म्हणूनच सध्याच्या काळात घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि ग्राहक मोठ्या प्रमाणावर याचा वापर करतात. भारतात मागणीनुसार अर्थव्यवस्था अभूतपूर्व वेगाने वाढत आहे.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×