Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार
Distinguish Between
Advertisements
Solution
| अ. क्र. | फरकाचा आधार | अंतर्गत व्यापार | आंतरराष्ट्रीय व्यापार |
| १. | अर्थ | अंतर्गत व्यापार म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत केली जाणारी वस्तूंची खरेदी आणि विक्री होय. | आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या पलीकडे (दोन किंवा अधिक देशांत) केली जाणारी वस्तूंची खरेदी आणि विक्री होय. |
| २. | देशांचा सहभाग | यात केवळ एकाच देशाचा समावेश असतो. | यात किमान दोन किंवा अधिक देशांचा समावेश असतो. |
| ३. | चलन | सर्व व्यवहार केवळ स्वदेशी चलनातच केले जातात. | व्यवहार परस्पर संमतीने ठरवलेल्या परकीय चलनात केले जातात. |
| ४. | जोखीम | यात जोखमीचे प्रमाण कमी असते. | यात जोखमीचे प्रमाण जास्त असते. उदा. वाहतुकीतील जोखीम, परकीय चलनातील चढ-उतार, मागणीतील बदल इत्यादी |
| ५. | सरकारी निर्बंध | काही मोजक्या वस्तू वगळता, या व्यापारावर जास्त सरकारी निर्बंध नसतात. | या व्यापारावर सरकारचे कडक नियंत्रण असते आणि व्यवहारापूर्वी सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक असते. |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
