मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

फरक स्पष्ट करा. अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार

फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

अ. क्र. फरकाचा आधार अंतर्गत व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार
१. अर्थ अंतर्गत व्यापार म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत केली जाणारी वस्तूंची खरेदी आणि विक्री होय. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या पलीकडे (दोन किंवा अधिक देशांत) केली जाणारी वस्तूंची खरेदी आणि विक्री होय.
२. देशांचा सहभाग यात केवळ एकाच देशाचा समावेश असतो. यात किमान दोन किंवा अधिक देशांचा समावेश असतो.
३. चलन सर्व व्यवहार केवळ स्वदेशी चलनातच केले जातात. व्यवहार परस्पर संमतीने ठरवलेल्या परकीय चलनात केले जातात.
४. जोखीम यात जोखमीचे प्रमाण कमी असते. यात जोखमीचे प्रमाण जास्त असते. उदा. वाहतुकीतील जोखीम, परकीय चलनातील चढ-उतार, मागणीतील बदल इत्यादी
५. सरकारी निर्बंध काही मोजक्या वस्तू वगळता, या व्यापारावर जास्त सरकारी निर्बंध नसतात. या व्यापारावर सरकारचे कडक नियंत्रण असते आणि व्यवहारापूर्वी सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक असते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×