Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
इच्छा आणि मागणी
फरक स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
| अ. क्र. | इच्छा | मागणी |
| १. | इच्छा म्हणजे एखादी वस्तू हवीहवीशी वाटणे होय. | मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदी करण्याची तयारी आणि खरेदीशक्तीचे (पैसे देण्याची क्षमता) पाठबळ असते. |
| २. | इच्छा हा मागणीचा एक भाग आहे. | मागणीमध्ये इच्छेचा समावेश होतो. |
| ३. | इच्छा ही कालखंडाशी संबंधित नसते. | मागणी ही नेहमी विशिष्ट कालखंडाशी संबंधित असते. |
| ४. | इच्छा आणि किंमत यांचा कोणताही संबंध नसतो. | मागणी आणि किंमत यांच्यात व्यस्त संबंध असतो. |
| ५. | इच्छा व्यक्त करण्यासाठी वेळ आणि किंमत यांचा संदर्भ असण्याची गरज नसते. | मागणी व्यक्त करण्यासाठी वेळ आणि किंमत यांचा संदर्भ असणे आवश्यक असते. |
| ६. | उदाहरणार्थ: एखाद्या गरीब व्यक्तीची स्वित्झर्लंडला सहलीसाठी जाण्याची इच्छा. | उदाहरणार्थ: एखाद्या श्रीमंत व्यक्तीची महागडी मोटार (उदा. ‘ऑडी’ कार) खरेदी करण्याची मागणी. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
