हिंदी

फरक स्पष्ट करा. इच्छा आणि मागणी - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

इच्छा आणि मागणी

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

अ. क्र. इच्छा  मागणी
१. इच्छा म्हणजे एखादी वस्तू हवीहवीशी वाटणे होय. मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदी करण्याची तयारी आणि खरेदीशक्तीचे (पैसे देण्याची क्षमता) पाठबळ असते.
२. इच्छा हा मागणीचा एक भाग आहे. मागणीमध्ये इच्छेचा समावेश होतो.
३. इच्छा ही कालखंडाशी संबंधित नसते. मागणी ही नेहमी विशिष्ट कालखंडाशी संबंधित असते.
४. इच्छा आणि किंमत यांचा कोणताही संबंध नसतो. मागणी आणि किंमत यांच्यात व्यस्त संबंध असतो.
५. इच्छा व्यक्त करण्यासाठी वेळ आणि किंमत यांचा संदर्भ असण्याची गरज नसते. मागणी व्यक्त करण्यासाठी वेळ आणि किंमत यांचा संदर्भ असणे आवश्यक असते.
६. उदाहरणार्थ: एखाद्या गरीब व्यक्तीची स्वित्झर्लंडला सहलीसाठी जाण्याची इच्छा. उदाहरणार्थ: एखाद्या श्रीमंत व्यक्तीची महागडी मोटार (उदा. ‘ऑडी’ कार) खरेदी करण्याची मागणी.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×