English

घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा.

Explain
Advertisements

Solution

  1. सिद्धांताचे विधान: घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत असा सांगतो की, (इतर परिस्थिती कायम असताना) एखाद्या वस्तूच्या उपभोगिलेल्या नगांच्या संख्येत वाढ होत गेल्यास, त्या वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता घटत जाते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, जसजसा वस्तूंचा उपभोग वाढत जातो, तसतशी त्या वस्तूच्या पुढील नगांपासून मिळणारी सीमांत उपयोगिता कमी-कमी होत जाते.
  2. व्याख्या: प्रा. अल्फ्रेड मार्शल यांच्या मते, “इतर परिस्थिती स्थिर असताना, व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत जाते.”
  3. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत एका तक्त्याच्या आणि आकृतीच्या मदतीने स्पष्ट करता येतो.
    ‘x’ ची नगसंख्या एकूण उपयोगिता सीमांत उपयोगिता
    १० १०
    १८ ०८
    २४ ०६
    २८ ०४
    ३० ०२
    ३०
    २८ −२
  4. तक्ता असे दर्शवितो की, जशी वस्तूच्या नगांची संख्या वाढते, तशी एकूण उपयोगिता वाढत जाते. ५ व्या आणि ६ व्या नगाच्या वेळी ती महत्तम (जास्तीत जास्त) होते आणि स्थिर राहते, परंतु ७ व्या नगाच्या वेळी एकूण उपयोगिता ३० वरून २८ पर्यंत घटते.
  5. सीमांत उपयोगिता ही एकूण उपयोगितेवरून काढता येते. असे दिसून येते की, सीमांत उपयोगिता सतत घटत आहे. ती शून्य होते आणि त्यानंतर ॠण होते.
  6. जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते, तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य असते आणि जेव्हा एकूण उपयोगिता घटू लागते, तेव्हा सीमांत उपयोगिता ॠण होते.
  7. वरील आकृतीमध्ये, ‘क्ष’ अक्ष वस्तूचे नग दर्शवतो आणि ‘य’ अक्ष सीमांत उपयोगिता दर्शवतो. तक्त्यातील विविध बिंदू आलेखावर रेखाटले आहेत. हे बिंदू जोडल्यास आपल्याला जो वक्र मिळतो, त्याला ‘सीमांत उपयोगिता वक्र’ असे म्हणतात.
  8. हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली सरकणारा असतो. तो ‘क्ष’ अक्षाला स्पर्श करतो आणि पुढे ॠण होतो. आकृतीवरून असे दिसून येते की, जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम (जास्तीत जास्त) असते, तेव्हा वस्तूच्या ६ व्या नगाला सीमांत उपयोगिता शून्य होते. हा समाधानाचा सर्वोत्‍तम बिंदू (तृप्तीचा बिंदू) आहे, म्हणजेच येथे गरज पूर्णपणे भागलेली असते आणि तिची तीव्रता शून्य होते. वस्तूच्या ७ व्या नगाच्या वेळी, एकूण उपयोगिता घटू लागते आणि सीमांत उपयोगिता ॠण होते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×