English

सार्वजनिक खर्चाचे प्रकार/वर्गीकरण स्पष्ट करा. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

सार्वजनिक खर्चाचे प्रकार/वर्गीकरण स्पष्ट करा.

Explain
Advertisements

Solution

  1. महसुली खर्च: महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे शासकीय खात्यांवर आणि विविध सेवांवर केला जातो. हा खर्च नियमितपणे उद्भवतो. उदा., शासनाचा प्रशासकीय खर्च, शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ते, निवृत्ती वेतन, वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्यांचा खर्च इत्यादी.
  2. भांडवली खर्च: भांडवली खर्च म्हणजे देशाच्या वृद्धी व विकासासाठी नव्याने केला जाणारा खर्च होय. उदा., विविध विकास प्रकल्पांतील मोठ्या गुंतवणूका, शासकीय कर्जाची परतफेड, राज्य शासन व शासकीय कंपन्यांना दिलेले कर्ज इत्यादी भांडवली खर्चाची उदाहरणे आहेत.
  3. विकासात्मक खर्च: विकासात्मक खर्च हा उत्पादक स्वरूपाचा असतो. ज्या खर्चामुळे रोजगार निर्मिती, उत्पादन वाढ, किंमतस्थैर्य इत्यादी बदल घडून वाढ होते. त्याला विकासात्मक खर्च असे म्हणतात. उदा., आरोग्य शिक्षण, औद्योगिक विकास, सामाजिक कल्याण, संशोधन आणि विकास यांवरील खर्च इत्यादी.
  4. विकासेतर खर्च: शासनाच्या ज्या खर्चामुळे देशात कोणताही प्रत्यक्ष उत्पादक परिणाम होत नाही, त्याला विकासेतर किंवा बिगर विकास खर्च असे म्हणतात. उदा., प्रशासकीय खर्च, युद्ध खर्च इत्यादी हे खर्च अनुत्पादक स्वरुपाचे असतात.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×