Advertisements
Advertisements
Question
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
सूर्य उगवला नाही तर ........
Advertisements
Solution
सूर्य उगवला नाही तर ........
एके दिवशी रात्री मला अचानक झोपेतून जाग आली. मला वाटले सकाळ झाली असावी म्हणून मी खिडकी उघडून पाहिली तर काय बाहेर पूर्ण काळोख होता. मी पुन्हा निपचित पडून राहिलो पण झोप मात्र लागता लागणा. त्यामुळे मी खिडकीच्या बाहेर पाहत असताना अचानक माझ्या मनात प्रश्न पडला की जर सूर्य उगवला नाही तर? मी विचार करू लागलो. जर सूर्य उगवला नाही तर खूप मज्जा येईल. सकाळी लवकर उठावे लागणार नाही. मनसोक्तपणे गादीवर लोळत पडता येईल. झाडावरच्या पक्ष्यांची झोप संपेल, पण अंधार असल्यामुळे ते उडू शकणार नाहीत. रोजच्या सारखा कोंबडा आरवणार नाही, गोठ्यातील गुरेवासरे हंबरणार नाहीत. सगळीकडे अंधारच अंधार राहील. सगळीकडचे चैतन्यच जणू हरवून जाईल.
सूर्य उगवला नाही तर... दिवसच नाही. कोणालाही कोणतेही काम करायला उत्साह वाटणार नाही. दुकाने उघडणार नाहीत. बाजार भरणार नाहीत. खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार नाहीत. सूर्य उगवला नाही तर हळूहळू उष्णता कमी होईल आणि थंडी वाढत जाईल, प्रथम त्या थंडीची मजा वाटेल, पण काही वेळाने मात्र कुडकुडायला होईल. आकाशात सूर्य नसल्यामुळे रस्त्याने जाणाऱ्यांना ऊनही लागणार नाही आणि त्यांचे पायही भाजणार नाहीत. असे काही फायदे झाले तरी फार काळ सूर्य उगवलाच नाही, तर सारे निसर्गचक्रच कोलमडून पडेल. झाडे, पाने, फुले, फळे फुलणार नाहीत. शेतातील धान्य कसे पिकणार? सूर्य नाही म्हणजे पाण्याची वाफ कशी होणार? मग पाऊस तरी कसा पडणार? इतक्यात माझ्या डोळ्यांवर सूर्याची किरणे पडली सगळीकडे आनंदाचा कल्लोळ उठला ‘सूर्य उगवला, सूर्य उगवला!’
खरेच सूर्य नसला तर पाऊस सुद्धा पडणार नाही. वनस्पती नष्ट होणार म्हणून अन्न मिळणार नाही. पाणी मिळणार नाही. मग आपण जगणार कसे? फक्त माणूसच नव्हे तर प्राणी ही मरून जातील. पृथ्वीवर फक्त दगड उरतील! नको नको ही कल्पनासुद्धा नको सूर्य हा हवाच.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
व्यक्तिचित्रणात्मक निबंध
माझा आवडता कलावंत.
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
आत्मवृत्तात्मक निबंध
मी सह्याद्री बोलतोय
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.
खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

‘निसर्ग माझा गुरु’ या विषयावर तुमचे विचार मांडा.

खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.

वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी पाहिलेला अविस्मरणीय सामना
‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
|
केल्याने देशाटन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे ‘गिर्यारोहण कॅम्प’ विशेष ‘गौरव’ सोहळा |
![]() |
वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.
विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!

खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग
खालील मुद्द्यांच्या आधारे महापुरात अडकलेल्याच्या एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा:

‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
अंधश्रद्धांचे थैमान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
मी रेडिओ बोलतोय
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
हुंडा-एक सामाजिक समस्या
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
सैनिकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
आरोग्य हीच संपत्ती
चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी फळा बोलतोय
वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.
“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.
वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.

वरील कार्यक्रमास तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.

