English

सूहृद मंडळ, नाशिक.- आयोजित - बालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ दि. - 10 डिसेंबर वेळ - सकाळी 10.00 प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्तेसूहृद मंडळ, नाशिक.

Advertisements
Advertisements

Question

सूहृद मंडळ, नाशिक.
- आयोजित -
बालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ
दि. - 10 डिसेंबर वेळ - सकाळी 10.00
प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्ते
सूहृद मंडळ, नाशिक.

वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.

Writing Skills
Advertisements

Solution

अविस्मरणीय पारितोषिक वितरण समारंभ

          सूहृद मंडळ, नाशिक यांनी आयोजित केलेल्या बालकुमार चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. 10 डिसेंबर रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाला जाण्याचा योग माझ्या मैत्रिणीमुळे आला; कारण तिला या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय रजनी गुप्ते येणार हे समजल्यावर मी खूपच खूश झाले; कारण त्यांची चित्रकला मला खूपच आवडते. आम्ही जवळपास 9.30 च्या सुमारास सभागृहात पोहोचलो. कार्यक्रम बरोबर 10 वाजता सुरू झाला. त्यावेळी सभागृह पूर्णपणे भरलेले होते. मी प्रेक्षकांमध्ये बसले होते, तर माइया मैत्रिणीसह इतर विजेत्या स्पर्धकांची आसनव्यवस्था वेगळी होती.

           सभागृहातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. कोणी स्वत: जिंकले होते किंवा आपल्या मित्र-मैत्रिणीचा अथवा नातेवाईकांचा विजय साजरा करत होते. प्रमुख पाहुण्या माननीय रजनी गुप्ते यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. निवेदकाने आपल्या मिश्किल निवेदनशैलीने संपूर्ण कार्यक्रमात बहार आणली. बालकुमार चित्रकला स्पर्धेतील विविध चित्रांचे प्रदर्शन यावेळी समोरील पडद्यावर करण्यात आले. विजेत्या स्पर्धेकांचे नाव जाहिर होताच टाळ्यांच्या कडकडाट होत होता. माझ्या मैत्रिणीचे नाव प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी जाहिर होताच माझ्या अंगावर आनंदाचे शहारे आले. टाळ्यांच्या कडकडाटात तिने पुढे जाऊन पारितोषिक स्वीकारले; त्यावेळी अभिमानाने मला धन्य धन्य वाटले.

          प्रमुख पाहुण्या माननीय रजनी गुप्ते यांनी आपल्या भाषणात सर्वच स्पर्धेकांचे कौतुक केले. माझ्या मैत्रिणीचे कौतुक करताना त्या म्हणाल्या, ‘चित्रकला ही दैवी देणगी असली तरी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि सततचा सराव यामुळे तुम्ही जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवू शकता. त्यादृष्टीने आपल्या भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी योग्य सरावावर भर दया.’ माझी मैत्रीण खाली आल्यावर मी तिला कडकडून मिठी मारली. दोघींच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. अतिशय आनंद देणारा हा पारितोषिक वितरण सोहळा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय समारंभ ठरला.

shaalaa.com
निबंध लेखन
  Is there an error in this question or solution?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

RELATED QUESTIONS

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.


‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.

विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

मी रेडिओ बोलतोय


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

हुंडा-एक सामाजिक समस्या


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

सैनिकाचे मनोगत


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

पेट्रोल संपले तर


अश्वमेध सभागृह

– दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या –

– कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन –

दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8

प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे

35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या

वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी.

वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


खालील मुद्‌द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.


वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.


मी पक्षी झाले तर.....

चौकटीतील मुद्‌द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.


'माझा आवडता लेखक/कवी' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

क्रीडांगण बोलू लागले तर...... या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×