English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

खालील मुद्द्यांवरून गोष्ट तयार करा. मुद्दे: शाळेत जाणारा कष्टाळू – प्रामाणिक मुलगा – वाईट मित्रांची संगत – शिक्षकांना काळजी – मुलाला घेऊन बाजारात फेरफटका

Advertisements
Advertisements

Question

खालील मुद्द्यांवरून गोष्ट तयार करा.

मुद्दे: शाळेत जाणारा कष्टाळू – प्रामाणिक मुलगा – वाईट मित्रांची संगत – शिक्षकांना काळजी – मुलाला घेऊन बाजारात फेरफटका – उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी – एक खराब झालेला आंबा – दोन दिवसांनी पाहणी – नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब – संदेश –

Writing Skills
Advertisements

Solution

संगतीचा परिणाम

एका गावात राहुल नावाचा मुलगा राहत होता. राहुल हा गरीब परिस्थितीतून कष्ट करून आपले शिक्षण पूर्ण करणारा असा एक कष्टाळू व प्रामाणिक मुलगा होता. शाळेचे शिक्षण पूर्ण करीत असतानाच तो जसा वेळ मिळेल तसा आपल्या आईवडिलांना ही कामात मदत करीत असे जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह सुरळीत होण्यास मदत मिळू शकेल. अभ्यासाची आवड आणि त्याला कष्टाची साथ यामुळे राहुल आपल्या वर्गात नेहमीच प्रथम क्रमांक मिळवत असे. त्याची ही अभ्यासाची जिद्द पाहून त्याच्या शिक्षकांनाही त्याचा नेहमी अभिमान वाटत असे.

राहुलचे लक्ष नेहमी शाळा आणि त्याचे घर यावरच असायचे. बाकीची मुले दंगा, मस्ती करायची परंतु तो तसे काहीही करत नसे. त्याला त्याच्या घरच्या आर्थिक परिस्थितीची पूर्णपणे कल्पना होती व चांगले शिक्षण घेऊन त्याला त्याच्या कुटूंबाला हातभार लावायचा होता हे तो कधीच विसरत नसे.

एके दिवशी त्याच्या शाळेतील काही वाईट मुलांनी त्याला आपल्याबरोबर आपल्या संगतीत ओढले आणि न कळतपणे राहुल त्या वाईट मुलांच्या संगतीत सामील होऊ लागला. राहुलच्या वागण्या बोलण्यातील फरक त्याच्या शिक्षकांच्या लगेच लक्षात आला आणि त्यांना या गोष्टीचे फारच वाईट वाटले.

शाळेतील एवढा प्रामाणिक व कष्टाळू मुलगा असा वाईट संगतीला लागून वाया जाऊ नये म्हणून त्याचे शिक्षक एक दिवस एक युक्ती करतात. एके दिवशी वर्गशिक्षक राहुलला स्वतःसोबत बाजारात येण्यासाठी सांगतात. आपल्या शिक्षकांना आपल्या मदतीची गरज आहे असे समजून राहुल त्यांच्यासोबत बाजारात जातो. शिक्षक एका आंब्याच्या दुकानात जाऊ चांगल्या प्रतीचे आंबे विकत घेतात.

राहुल आणि शिक्षक स्वतः चांगले-चांगले आंबे निवडून ते आपल्या टोपलीत घेतात. चांगले आंबे विकत घेतल्यानंतर शिक्षक अजून फक्त एक वेगळा आंबा घेतात जो पूर्णपणे नासलेला असतो. आणि तो आंबा चांगल्या प्रतीच्या आंब्याच्या मध्ये ठेवतात. राहुलला काहीही कळत नाही की शिक्षक नासका आंबा का घेत आहेत. तो जेव्हा त्यांना विचारतो तेव्हा ते त्याला दोन दिवसांनी पुन्हा हे आंबे आपण पुन्हा बघूया असे म्हणून ती टोपली एका बाजूला ठेवतात.

ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी राहुल आणि त्याचे शिक्षक ती आब्यांची टोपली बघतात तेव्हा चांगल्या प्रतीचे सर्व आंबे नासलेले असतात. राहुलला काहीही कळत नाही की जर एवढे चांगले आंबे आपण घेऊन पण फक्त दोनच दिवसात ते कसे काय नासू शकतात. त्यावर शिक्षक त्याला समजावतात की एक नासका आंबा इतर चांगल्या प्रतीच्या आंब्यांना ही नासवू शकतो. म्हणजेच वाईट संगत इतर चांगल्या मुलांना ही वाईट बनवू शकते. राहुलला आपली चूक लक्षात येते आणि तो शिक्षकांची माफी मागून पुन्हा वाईट संगतीत जाणार नाही याची त्यांना ग्वाही देतो.

संदेश/तात्पर्य - वाईट संगतीचे परिणाम वाईटच होतात.

shaalaa.com
कथालेखन
  Is there an error in this question or solution?
2018-2019 (March) Set 1

RELATED QUESTIONS

खालील अपूर्ण कथा पूर्ण करा.

दिवस कधी मावळला ते कळलेच नाही त्या दिवशी! पाहुण्यांनी घर भरून गेलं होतं. आजीच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण होत होती. सर्वजण या निमित्ताने एकत्र आलेले पाहून आजी तृप्त झाली होती. एकमेकांशी रक्ताने व मनाने जोडलेल्या तीन पिढ्या एकत्र जमल्या होत्या. दिवसभराच्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी हास्यविनोदात, मनमोकळ्या गप्पांत सारेजण दंग होते आणि अगदी अचानक या गप्पांत एक अनोळखी आवाज ऐकू आला. ‘जिजी...मी आलो ग!’ खूप वर्षांनी आजीने हा आवाज ऐकला आणि ....

खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा.

आंतरशालेय क्रीडास्पर्धा – धावण्याची स्पर्धा – शाळेतर्फे वरदचा सहभाग – वरद उत्तम धावपटू – सराव – उत्तम धावपटू तनयशी स्पर्धा – प्रत्यक्ष स्पर्धा – चुरशीची स्पर्धा – अचानक तनयचा पाय मुरगळणे – स्पर्धा सोडून वरदचे मदतीला धावणे – स्पर्धा हरूनही वरदचे कौतुक –


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

लक्ष्मण नावाचा तरुण----कैदेत----गावप्रमुखाचे कैदखान्याचे निरीक्षण करणे----लक्ष्मणची सुटकेसाठीची विनंती----सुटका व आर्थिक मदत----लक्ष्मण पक्षी घेऊन बाजारात----सर्व पक्षी पिंजऱ्यासहित विकत घेणे----पक्षी विक्रेत्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह----पक्ष्यांची पिंजऱ्यातून मुक्तता----मुक्ततेचा आनंद----बोध.


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

गरीब शेतकरी ______ कोरडवाहू जमीन ______ कठोर परिश्रम ______ शेतीत नवनवीन प्रयोग ______ उत्पन्नात भरभराट ______ यशस्विता ______ आनंद ______ इतरांना मार्गदर्शन ______ राष्ट्रीय पुरस्कार ______ बोध.


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

जंगलातील वृक्ष ______ चिमणीचे जोडपे ______ गुण्यागोविंदाने राहाणे ______ हत्तीचा धुमाकूळ पिले मारणे ______ चिमणा-चिमणीचा आक्रोश ______ सुतार पक्ष्याचा सल्ला व प्रेरणा ______ हत्तीची समजूत ______ बोध.


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

मार्च २०२० ______ परीक्षा कालावधी ______ विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी ______ कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव ______ सामाजिक परिस्थिती ______ विद्यार्थ्यांची निराशा ______ निकाल ______ बोध.


खालील कथालेखन करा.

महेंद्र नावाचा विद्यार्थी ______ हलाखीची परिस्थिती ______ रानात रोपट्यांचा शेंडा तुटलेला पाहाणे ______ मनात विचार ______ आत्मज्योत जागृत होणे ______ प्रयत्नांची पराकाष्ठा ______ यशस्विता ______ लेखक म्हणून प्रसिद्धी.


खालील कथालेखन करा.

रतन नावाचा तरुण ______ साधारण जीवनशैली ______ अडगळीतील वस्तू _____ कल्पनाशक्तीचा वापर ______ जोडणी ______ शेतीसाठी उपयुक्त यंत्रनिर्मिती ______ उपयोग ______ राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त.


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

आदिवासी समाजात असणाऱ्या राजू नावाच्या मुलाला शिक्षणाची आवड असल्याने तो रानावनात झाडांच्या खोडांवर जमिनीवर अक्षरे गिरवायला शिकला. त्याची ती शिक्षणाची ओढ पाहून आई-वडिलांना आश्चर्य वाटत असे. असेच एकदा क्षेत्रभेटीसाठी सुहास नावाचे गुरुजी विद्यार्थ्यांना घेऊन त्या भागात आले. त्यांनी राजूची अभिलाषा ओळखली आणि त्याच्या आई-वडिलांची परवानगी घेऊन राजूला आपल्या शाळेत दाखल केले आणि...


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

नंदुरबारच्या खर्डी या आदिवासी गावात रिंकी नावाची मुलगी दगड-मातीतून धावायची. सात भावंडांमध्ये पाचव्या नंबरची मुलगी होती. घरी कोरडवाहू शेती होती. त्यामुळे, तिच्या आई-वडिलांना इतरांच्या शेतात काम करणे व उन्हाळयाच्या दिवसात मजुरीसाठी गावाबाहेर पडावे लागायचे. सर्व भावंडे मात्र घरीच असायची. यातच मोठ्या भावाला पळण्याचे वेड असल्याने तो पळण्यात तरबेज झाला. पुढे जाऊन त्याने स्पर्धेत भाग घेतला. या धावण्याच्या वेडामुळेच पुढे जाऊन त्याला वनरक्षक होण्याचं भाग्य लाभलं. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन रिंकीसुद्धा धावू लागली आणि...


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

एकीचे बळ


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

बुद्धी आणि ताकदीचा मेळ


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

पळसाला पाने तीनच


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

कोल्ह्याला द्राक्ष आंबट


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

अति तिथं माती


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

विज्ञानाची कास धरा


खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा:

एक गरीब मुलगा – शाळेची फी भरण्यास पैसे नसणे – सकाळी पेपर टाकण्याचे काम – वाटेत पैशाचे पाकीट मिळणे – प्रामाणिकपणे पोलिस स्टेशनवर नेऊन देणे – पाकिटाच्या मालकास आनंद – बक्षीस.


खालील अपूर्ण कथा वाचा. तुमचा विचार व कल्पकतेने ती कथा पूर्ण करा.

(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची आवश्यकता नाही.) 

तळेगाव गावात गोविंद नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याची थोडीफार शेती होती व शेतीसाठी दोन बैलही त्याच्यापाशी होते. एक ढवळ्या व दुसरा पवळ्या अशी त्यांची नावे होती. त्यांची चांगली मैत्री होती. शेतात काम करायला ते एकत्र जात व एकत्रच परत येत पण एके दिवशी ________

खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.

आटपाट नगर - वृद्ध शेतकरी - आंब्याची रोपे - बागेत काम - राजा हिंडत बागेत - राजाची चौकशी - रोपे लावून फळे केव्हा - शेतकऱ्याचे उत्तर ऐकून राजाला आश्चर्य - शेतकऱ्याला बक्षीस.


खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट पूर्ण करा.

हट्टी राजकन्या त्याला अर्धे राज्य मिळते
`↓` `↑`
राज्यकन्येची अट शेतकऱ्याचा मुलगा येतो
`↓` `↑`
न संपणारी गोष्ट सांगणे बरेच जण प्रयत्न करतात
`↓` `↑`
राज्यात दवंडी अर्धे राज्य

खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.

मुद्दे: अनाथ मुलगा – रोज सकाळी वर्तमानपत्राचे वाटप – दुपारी शाळेत – रस्त्यात एक पाकीट मिळते – वर्गशिक्षकांकडे देणे – पाकिटावरील पत्यावरून योग्य व्यक्तिपर्यंत पोहोचवणे – मालकाला आनंद – शाबासकी – मुलाला बक्षीस व त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे.


खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा.

(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.)

पाडळी गावातील सखू आपल्या रानातला भाजीपाला घेऊन बाजाराला गेली. शेतातल्या कोवळ्या, ताज्या भाज्या विकताना दिवस कधी संपला तिला कळलेच नाही. अजूनही थोडी भाजी शिल्लक होती. भाव कमी करून तिने ती विकली व सर्व साहित्य गोळा करून लगबगीने घराकडे निघाली. अर्ध्यारस्त्यात जाईपर्यंत काळोख दाटून आला. एक हुरहूर तिच्या मनात दाटून आली; पण नेटाने ती चालत होती. पावले भरभर उचलत होती. एवढ्यात तिला काळोखात सायकलचा आवाज आला. ती थबकली आणि ......................


दिलेल्या कथेचा शेवट वाचा व त्याच्या आधारे कथेची सुरुवात लिहा.

........................................................................................................................
........................................................................................................................
........................................................................................................................
................ शेतकरीण आणलेल्या पाण्याचा थेंब नि थेंब जपायची, उपयोगात आणायची. बादलीभर पाण्यात भाजी धुऊन घ्यायची. त्याच पाण्याने घासलेल्या भांड्यांची पहिली राख धुऊन टाकायची, खरकटी भांडी विसळायची, मळकट हात धुवायची, मग बादलीतले पाणी वाफ्यात ओतायची. वाफ्यातल्या भाज्या, फुलझाडे बहरून यायची. हिरवी माया फुलली, भोळ्याभाबड्या शेतकरणीने चतुरपणाने पाण्याचा थेंब नि थेंब जपला होता.


खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचाराने व कल्पनेने कथा पूर्ण करा.

आज शाळेमध्येखो खोच्या संघाचे आंतरशालेय सामने सुरू होणार होते. सकाळी ७ वाजताच शाळेचा सर्व संघ मैदानावर हजर होता. सर्वांच्याच मनात उत्सुकता, उत्साह, चैतन्य संचारले होते. सलीम आमच्या संघाचा कर्णधार मात्र अजून यायचा होता. आम्ही सर्वजण त्याची आतुरतेने वाट पाहत होतो. सलीम अजून का येत नाही म्हणून चिंतीतही होतो. पंचांनी दोन्ही संघांना मैदानात पाचारण केले. संघात कुजबुज सुरू झाली आणि तेवढ्यात धापा टाकत सलीम मैदानावर आला आणि...

तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या व कथेचे तात्पर्य लिहा.


तुम्ही कथा तयार करताना व लिहिताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या याची यादी करा.


खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.

प्रकाश आणि अन्वर जीवश्चकंठश्च मित्र. एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे, एकत्र डबा खाणारे सच्चे सोबती. दिवाळीची सुट्टी लागली आणि अन्वर आईबरोबर गावाला गेला. आता सुट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणार नव्हते. दिवाळीची सुट्टी संपायला दोन दिवस होते. प्रकाशला अन्वरच्या भेटीची ओढ लागली होती. सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रकाशने दप्तर काढले. पुस्तकात त्याला अन्वरने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. त्याने उत्सुकतेने चिठ्ठी वाचायला घेतली आणि.....
  • तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या.
  • कथा तयार करताना व लिहिताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या? ते लिहा.

पुढील मुद्दयांवरुन कथालेखन करा.

मुद्दे - एक राजा - त्याची प्रजा आळशी होती - त्यांना उद्योगी बनवण्यासाठी राजा युक्ती करतो - रस्त्यात मधोमध दगड ठेवतो - त्यांच्याखाली - सोन्याची नाणी असलेली पिशवी - अनेक लोक जातात, पण दगड उचलत नाहीत - एक गरीब माणूस तो उचलतो - पिशवीतील नाणी त्याला मिळतात - लोकांना हे कळते - लोक उद्योगी बनतात -


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×