English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

रतन नावाचा तरुण ______ साधारण जीवनशैली ______ अडगळीतील वस्तू _____ कल्पनाशक्तीचा वापर ______ जोडणी ______ शेतीसाठी उपयुक्त यंत्रनिर्मिती ______ उपयोग ______

Advertisements
Advertisements

Question

खालील कथालेखन करा.

रतन नावाचा तरुण ______ साधारण जीवनशैली ______ अडगळीतील वस्तू _____ कल्पनाशक्तीचा वापर ______ जोडणी ______ शेतीसाठी उपयुक्त यंत्रनिर्मिती ______ उपयोग ______ राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त.

Long Answer
Advertisements

Solution

कल्पकता: यशाचे रहस्य

रतन नावाचा एक तरुण होता. तो आपल्या कुटुंबासह माणगांव या गावात राहात होता. त्याचे वडिल पूर्वी गाडी दुरुस्त करण्याचे काम करत. वयोमानाप्रमाणे ते थकले होते. त्यांनी ते काम बंद केले होते. रतनला शेती करण्याची आवड होती; मात्र हालाखीची परिस्थिती असल्यामुळे त्याच्या मनाप्रमाणे आधुनिक शेती त्याला करता येत नव्हती. नवी यंत्रे विकत घेण्यासाठी लागणारे भांडवल त्याच्याकडे नव्हते.

रतन हा लहानपणापासूनच बुद्धिमान आणि धडपड्या वृत्तीचा होता. त्याची कल्पनाशक्ती अफाट होती. एकदा सहज विचार करत असताना त्याच्या डोक्यात काहीतरी चमकले. तो उठला व अडगळीच्या खोलीत गेला. तेथे त्याच्या वडिलांचे काही सामान पडलेले होते. त्या वस्तूंमधून त्याने काही वस्तू उचलल्या. त्याची जोडणी केली. दहा दिवस तो या वस्तूंची उलटसुलट जोडणी करत होता. प्रयत्न फसत होते; पण तो तितक्याच जोमाने पुन्हा सुरुवात करत होता. शेवटी आपल्या कल्पनाशक्तीचा मदतीने त्याने आपल्या शेतीसाठी एक उपयोगी यंत्र बनवले.

रतनने बनवलेल्या यंत्राच्या मदतीने शेतीसाठी पाणी देणे सोपे झाले होते. पाणी खेचणाऱ्या पंपाला हे यंत्र बसवल्यानंतर एका ठरावीक काळानंतर पंप आपोआप बंद होत होता. त्यामुळे, शेतीला आवश्यक तेवढेच पाणी मिळू लागले. शिवाय, वीजबचत आणि पाणीबचतही होऊ लागली. त्याच्या या यंत्राची प्रसिद्धी पाहता पाहता सर्वत्र पसरली. रतनच्या या कल्पक शोधाबद्दल त्याला राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार प्राप्त झाला. सारेच त्याचे कौतुक करत होते. आपल्याकडे असलेल्या कल्पकतेचा उपयोग केला, तर यश नक्कीच मिळते, हा धडा त्याने साऱ्या तरुणांसमोर घालून दिला.

तात्पर्य: ज्ञानाच्या मदतीने अशक्य गोष्टी सुध्दा शक्य होतात.

shaalaa.com
कथालेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 20.3: उपयोजित लेखन - कथालेखन

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi Standard 10 Maharashtra State Board
Chapter 20.3 उपयोजित लेखन
कथालेखन | Q आ. २.
SCERT Maharashtra Marathi Kumarbharti (Second Language) [English] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 16.3 उपयोजित लेखन
कथालेखन २ | Q आ. २.

RELATED QUESTIONS

खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा.

मैत्री  → दप्तर  → गृहपाठ  → रस्ता

खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा.

आंतरशालेय क्रीडास्पर्धा – धावण्याची स्पर्धा – शाळेतर्फे वरदचा सहभाग – वरद उत्तम धावपटू – सराव – उत्तम धावपटू तनयशी स्पर्धा – प्रत्यक्ष स्पर्धा – चुरशीची स्पर्धा – अचानक तनयचा पाय मुरगळणे – स्पर्धा सोडून वरदचे मदतीला धावणे – स्पर्धा हरूनही वरदचे कौतुक –


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

लक्ष्मण नावाचा तरुण----कैदेत----गावप्रमुखाचे कैदखान्याचे निरीक्षण करणे----लक्ष्मणची सुटकेसाठीची विनंती----सुटका व आर्थिक मदत----लक्ष्मण पक्षी घेऊन बाजारात----सर्व पक्षी पिंजऱ्यासहित विकत घेणे----पक्षी विक्रेत्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह----पक्ष्यांची पिंजऱ्यातून मुक्तता----मुक्ततेचा आनंद----बोध.


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

गरीब शेतकरी ______ कोरडवाहू जमीन ______ कठोर परिश्रम ______ शेतीत नवनवीन प्रयोग ______ उत्पन्नात भरभराट ______ यशस्विता ______ आनंद ______ इतरांना मार्गदर्शन ______ राष्ट्रीय पुरस्कार ______ बोध.


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

जंगलातील वृक्ष ______ चिमणीचे जोडपे ______ गुण्यागोविंदाने राहाणे ______ हत्तीचा धुमाकूळ पिले मारणे ______ चिमणा-चिमणीचा आक्रोश ______ सुतार पक्ष्याचा सल्ला व प्रेरणा ______ हत्तीची समजूत ______ बोध.


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

मार्च २०२० ______ परीक्षा कालावधी ______ विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी ______ कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव ______ सामाजिक परिस्थिती ______ विद्यार्थ्यांची निराशा ______ निकाल ______ बोध.


खालील कथालेखन करा.

महेंद्र नावाचा विद्यार्थी ______ हलाखीची परिस्थिती ______ रानात रोपट्यांचा शेंडा तुटलेला पाहाणे ______ मनात विचार ______ आत्मज्योत जागृत होणे ______ प्रयत्नांची पराकाष्ठा ______ यशस्विता ______ लेखक म्हणून प्रसिद्धी.


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

आदिवासी समाजात असणाऱ्या राजू नावाच्या मुलाला शिक्षणाची आवड असल्याने तो रानावनात झाडांच्या खोडांवर जमिनीवर अक्षरे गिरवायला शिकला. त्याची ती शिक्षणाची ओढ पाहून आई-वडिलांना आश्चर्य वाटत असे. असेच एकदा क्षेत्रभेटीसाठी सुहास नावाचे गुरुजी विद्यार्थ्यांना घेऊन त्या भागात आले. त्यांनी राजूची अभिलाषा ओळखली आणि त्याच्या आई-वडिलांची परवानगी घेऊन राजूला आपल्या शाळेत दाखल केले आणि...


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

नंदुरबारच्या खर्डी या आदिवासी गावात रिंकी नावाची मुलगी दगड-मातीतून धावायची. सात भावंडांमध्ये पाचव्या नंबरची मुलगी होती. घरी कोरडवाहू शेती होती. त्यामुळे, तिच्या आई-वडिलांना इतरांच्या शेतात काम करणे व उन्हाळयाच्या दिवसात मजुरीसाठी गावाबाहेर पडावे लागायचे. सर्व भावंडे मात्र घरीच असायची. यातच मोठ्या भावाला पळण्याचे वेड असल्याने तो पळण्यात तरबेज झाला. पुढे जाऊन त्याने स्पर्धेत भाग घेतला. या धावण्याच्या वेडामुळेच पुढे जाऊन त्याला वनरक्षक होण्याचं भाग्य लाभलं. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन रिंकीसुद्धा धावू लागली आणि...


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

एका गावात रामकृष्ण आणि शेवंता नावाचं सामान्य परिस्थितीतील कुटुंब राहत होतं. त्यांना राकेश व प्रांजल नावाची दोन अपत्ये हाती. राकेश आणि प्रांजल दोघेही हुशार आणि आज्ञाधारक होती. अचानक सहा वर्षांची असतानाच प्रांजलची दृष्टी गेली. आईवडिलांना धक्का बसला; पण ते डगमगले नाहीत. त्यांनी तिचा शिक्षणाकडे असलेला ओढा, तिची जिद्द आणि चिकाटी पाहून तिला अंध मुलांच्या शाळेत घातले. तिची अभ्यासातील हुशारी, शिकण्याचा वेग, चिकाटी आणि मेहनत घेण्याची अभिलाषा पाहून शिक्षकांनीही तिची सर्वतोपरी मदत केली आणि पुढे ती...


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

एकीचे बळ


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

कष्टाची गोड फळे


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

प्रामाणिकपणाचे फळ


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

बुद्धी आणि ताकदीचा मेळ


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

कोल्ह्याला द्राक्ष आंबट


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

विज्ञानाची कास धरा


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

पर्यावरणाचे रक्षण काळाची गरज


खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा:

एक गरीब मुलगा – शाळेची फी भरण्यास पैसे नसणे – सकाळी पेपर टाकण्याचे काम – वाटेत पैशाचे पाकीट मिळणे – प्रामाणिकपणे पोलिस स्टेशनवर नेऊन देणे – पाकिटाच्या मालकास आनंद – बक्षीस.


खालील अपूर्ण कथा वाचा. तुमचा विचार व कल्पकतेने ती कथा पूर्ण करा.

(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची आवश्यकता नाही.) 

तळेगाव गावात गोविंद नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याची थोडीफार शेती होती व शेतीसाठी दोन बैलही त्याच्यापाशी होते. एक ढवळ्या व दुसरा पवळ्या अशी त्यांची नावे होती. त्यांची चांगली मैत्री होती. शेतात काम करायला ते एकत्र जात व एकत्रच परत येत पण एके दिवशी ________

खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.

आटपाट नगर - वृद्ध शेतकरी - आंब्याची रोपे - बागेत काम - राजा हिंडत बागेत - राजाची चौकशी - रोपे लावून फळे केव्हा - शेतकऱ्याचे उत्तर ऐकून राजाला आश्चर्य - शेतकऱ्याला बक्षीस.


खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट पूर्ण करा.

हट्टी राजकन्या त्याला अर्धे राज्य मिळते
`↓` `↑`
राज्यकन्येची अट शेतकऱ्याचा मुलगा येतो
`↓` `↑`
न संपणारी गोष्ट सांगणे बरेच जण प्रयत्न करतात
`↓` `↑`
राज्यात दवंडी अर्धे राज्य

दिलेल्या कथेचा शेवट वाचा व त्याच्या आधारे कथेची सुरुवात लिहा.

........................................................................................................................
........................................................................................................................
........................................................................................................................
................ शेतकरीण आणलेल्या पाण्याचा थेंब नि थेंब जपायची, उपयोगात आणायची. बादलीभर पाण्यात भाजी धुऊन घ्यायची. त्याच पाण्याने घासलेल्या भांड्यांची पहिली राख धुऊन टाकायची, खरकटी भांडी विसळायची, मळकट हात धुवायची, मग बादलीतले पाणी वाफ्यात ओतायची. वाफ्यातल्या भाज्या, फुलझाडे बहरून यायची. हिरवी माया फुलली, भोळ्याभाबड्या शेतकरणीने चतुरपणाने पाण्याचा थेंब नि थेंब जपला होता.


खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचाराने व कल्पनेने कथा पूर्ण करा.

आज शाळेमध्येखो खोच्या संघाचे आंतरशालेय सामने सुरू होणार होते. सकाळी ७ वाजताच शाळेचा सर्व संघ मैदानावर हजर होता. सर्वांच्याच मनात उत्सुकता, उत्साह, चैतन्य संचारले होते. सलीम आमच्या संघाचा कर्णधार मात्र अजून यायचा होता. आम्ही सर्वजण त्याची आतुरतेने वाट पाहत होतो. सलीम अजून का येत नाही म्हणून चिंतीतही होतो. पंचांनी दोन्ही संघांना मैदानात पाचारण केले. संघात कुजबुज सुरू झाली आणि तेवढ्यात धापा टाकत सलीम मैदानावर आला आणि...

तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या व कथेचे तात्पर्य लिहा.


तुम्ही कथा तयार करताना व लिहिताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या याची यादी करा.


पुढील मुद्दयांवरुन कथालेखन करा.

मुद्दे - एक राजा - त्याची प्रजा आळशी होती - त्यांना उद्योगी बनवण्यासाठी राजा युक्ती करतो - रस्त्यात मधोमध दगड ठेवतो - त्यांच्याखाली - सोन्याची नाणी असलेली पिशवी - अनेक लोक जातात, पण दगड उचलत नाहीत - एक गरीब माणूस तो उचलतो - पिशवीतील नाणी त्याला मिळतात - लोकांना हे कळते - लोक उद्योगी बनतात -


खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.

एक कोल्हा - भूक लागते - द्राक्षांची बाग - खाण्याची इच्छा - द्राक्षांचा वेल उंच - उड्या मारतो - थकतो - आंबट द्राक्षे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×