Advertisements
Advertisements
Questions
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
माझे आवडते शिक्षक
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
व्यक्तिचित्रणात्मक निबंध
माझे आवडते शिक्षक
Advertisements
Solution
माझे आवडते शिक्षक
आज ५ सप्टेंबर शिक्षक दिन, मला माझे आवडते शिक्षक आठवयाला लागले तर सरळ शालेय जीवनातील शिक्षकच असणार, माझ्या शालेय जीवनात प्रत्येक शिक्षकाचे आचार, विचार, रंग, ढंग आणि स्वभाव वेगळा होते. काहींबरोबर सूर जुळतात, काहींना खास टोपणनावं ठेवली जातात काहींबरोबर खास आकर्षणांमुळे आठवणी रुजलेल्या असतात, काही फक्त खास सवयीमुळे ओळखले जातात. जसे काळाच पेन वापरायचं, प्रत्येक उत्ताला चौकट, ‘ऐ मुर्खा काययेतं तुला ..... !’, ‘सगळं बरोबर! अशा सगळ्या वळणावळणांनी शालेय जीवनाचा प्रवास सुरू राहतो. तरी एखादे असे शिक्षक असतात जे व्यक्तिमत्वाने प्रभाव सोडतात आणि ते प्रत्येकापेक्षा अतिशय वेगळे असतात! असे हे माझे आवडते शिक्षकांचे नाव श्री. तुकाराम रामजी पाटील आहे. आम्ही प्रेमाने ‘पाटील सर’ म्हणायचो, गणित विषयात तज्ज्ञ, त्यांची गव्हाळ रंगांची, उंच, भव्य, रुबाबदार आणि सुदृढ़ मूर्ती दृष्टीला पडताच नकळतच माझे हात जोडले जातात. माझ्या आयुष्यात त्यांच खास स्थान आहे. परीक्षेत चांगले गुण मिळवले तर घरी यायचे आणि माझ्या आई-वडिलांना माझे कौतुक सांगायचे.
पाटील सर! स्वभावाने अत्यंत प्रेमळ, सतत मदतीला तयार, दयाळू स्वभाव, कर्तव्यनिष्ठता आणि साधी राहणी हे यांचे अद्वितीय मिश्रण होते. एकच असे सर होते ज्यांना टोपणनावें जरी पडली असली तरी एकदाही त्यांची थपण झाली नाही. विद्यार्थांना नेहमी मदत करण्याची वृत्ती, विषयावर शिकवण्याची हातोटी. शिकवणीबद्दल सरांचा जबाब नाही. गणित शिकवताना इतक्या तन्मयतेने शिकवायचे की आम्ही विद्यार्थी अक्षरश: असा विचार करायचो की त्यांच्या पाया पडायला पाहिजे. विद्यार्थांच्या मनात सन्मानाचा भाव, आदर्शवाद असे त्यांचे वर्तन होते.
कामाशी काम आणि बाकी केवळ साधेपणा. विषयाच्या शिकवणीबरोबर शिस्तपणा पण शिकवायचे. जीवनात शिस्तीने वागायचं असे ते नेहमी म्हणायचे. मला अस वाटतं की एखादी थप्पड जर लगावली असती तर ती मला जीवनात योग्य असती.
पाटील सरांच्या चेहऱ्यावर केवळ करुणा व कृतज्ञताच होती, अभिमान दिसलाच नाही. सरांच्याबद्दल प्रेम व आदराची भावना जोपासून ठेवली आहे. त्याची नुस्ती आठवणी माझ्या मनाला बाल्य देणाऱ्या आणि व्यथित करणाऱ्या सारखं होत.
सरांच्या जीवनाचा साधेपणा आणि करुणामय गरिबी. त्यांनी जे संस्कार त्यांच्या वागण्यातून आम्हाला दिले याचा माझ्या जीवनात फार मोठा स्थान आहे. ते आठवले की खरच कसेसे वाटते. मनावर कोरले गेले ते पाटील सरच! सरांच्या गेल्याची बातमी जेव्हा मला एका वर्गमित्रामार्फत कळली तेव्हा ‘हो का!’ असे म्हणून मी विचारांच्या नादात निघून गेलो. मला फार फार वाईट वाटले. त्यांच्या मुलाबरोबरच त्यांना अग्नी देण्याचे पुण्य मलाही मिळाले असते तर?
गुरू हा सुखाचा सागरू। गुरू हा प्रेमाचा आगरू।
गुरू हा धैर्यांचा डोंगरू। कदाकाळीं डळमळीना।
RELATED QUESTIONS
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
व्यक्तिचित्रणात्मक निबंध
माझा आवडता कलावंत.
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
आत्मवृत्तात्मक निबंध
मी सह्याद्री बोलतोय
खालील विषयांवर निबंध लेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
सूर्य मावळला नाही तर...
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.
'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

|
आदर्श विद्यालय, कोल्हापूर दि. 27 फेब्रुवारी, सं. 10 वाजता
विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी. |
वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.

वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी पाहिलेला अविस्मरणीय सामना
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी शाळेची घंटा बोलतेय
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
सूर्य उगवला नाही तर ........
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

|
केल्याने देशाटन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे ‘गिर्यारोहण कॅम्प’ विशेष ‘गौरव’ सोहळा |
![]() |
वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.
विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:

खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
अंधश्रद्धांचे थैमान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
मी रेडिओ बोलतोय
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फॅशनचे वेड
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
हुंडा-एक सामाजिक समस्या
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
सैनिकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
आरोग्य हीच संपत्ती
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
आमची अविस्मरणीय सहल
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
पेट्रोल संपले तर
चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.

‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
माझा आवडता खेळाडू
खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.

खालीलपैकी विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा :
'निसर्ग माझा सखा'
|
साधना विद्यालय, धुळे |
वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करू प्रसंगलेखन करा.

