Advertisements
Advertisements
Question
11, 8, 5, 2,... या अंकगणिती श्रेढीत - 151 ही संख्या कितवे पद असेल?
Advertisements
Solution
दिलेली अंकगणिती श्रेढी: 11, 8, 5, 2,....
येथे, a = 11, d = 8 - 11 = - 3
वरील अंकगणिती श्रेढीतील n वे पद - 151 मानले
तर, tn = - 151
आता, tn = a + (n - 1)d
∴ - 151 = 11 + (n - 1)(- 3)
∴ - 151 = 11 - 3n + 3
∴ - 151 = 14 - 3n
∴ 3n = 14 + 151
∴ 3n = 165
∴ n = `165/3`
∴ n = 55
∴ दिलेल्या अंकगणिती श्रेढीत - 151 ही संख्या 55 वे पद आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खाली दिलेल्या अंकगणिती श्रेढीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा.
3, 6, 9, 12,...
येथे, t1 = `square`, t2 = `square`, t3 = `square`, t4 = `square`,...
t2 - t1 = `square`
t3 - t2 = `square`
∴ d = `square`
खालील अंकगणिती श्रेढीचे 27 वे पद काढा.
9, 4, -1, -6, -11,...
एका अंकगणिती श्रेढीचे 17 वे पद 10 व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे, तर सामान्य फरक काढा.
15, 10, 5,… या अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या 10 पदांची बेरीज _________ आहे.
जर एका अंकगणिती श्रेढीच्या तिसऱ्या व आठव्या पदांची बेरीज ७ असेल आणि सातव्या व 14 व्या पदांची बेरीज - 3 असेल, तर 10 वे पद काढा.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
पहिली दोन पदे –3 आणि 4 असणाऱ्या अंकगणिती श्रेढीचा d = ?
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
9, 15, 21, 27 अंकगणिती श्रेढीमध्ये t3 = ?
24, 17, 10, 3......... ही क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे का? असल्यास तिचे सामान्यपद (tn) काढा.
12, 16, 20, 24......... या अंकगणिती श्रेढीचे 25 वे पद काढा.
एका अंकगणिती श्रेढीमध्ये S41 = 4510 असेल, तर t21 ची किंमत काढा.
