English

Marathi Set 4 2024-2025 English Medium Class 10 Question Paper Solution

Advertisements
Marathi [Set 4]
Marks: 80 CBSE
English Medium

Academic Year: 2024-2025
Date & Time: 27th February 2025, 10:30 am
Duration: 3h
Advertisements

सर्वसाधारण सूचना: 

  1. ही प्रश्‍नपत्रिका 4 विभागात विभागलेली आहे.
  2. प्रश्‍नत्रिकेमध्ये एकूण 8 प्रश्‍न आहेत.
  3. विभाग A/अ मध्ये 2 प्रश्‍न आहेत. प्रश्‍न क्र. 1 ते 2
  4. विभाग B/ब मध्ये 2 प्रश्‍न आहेत. प्रश्‍न क्र. 3 ते 4
  5. विभाग C/क मध्ये 3 प्रश्‍न आहेत. प्रश्‍न क्र. 5 ते 7
  6. विभाग D/ड मध्ये 1 प्रश्‍न आहेत. प्रश्‍न क्र. 8
  7. दिलेल्या निर्देशानुसार प्रश्‍नांची उत्तरे लिहा.
  8. उत्तर लिहिण्यापूर्वी उत्तरपुस्तिकेत प्रश्‍न क्रमांक लिहा.

विभाग - ‘अ’: वाचन व आकलन (15 गुण)
[8]1.

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

वृक्ष जे त्यागाच्या भावनेने स्वतः उन्हात उभे राहतात, पण इतरांना सावली देतात; ज्यांची फळे-फुलेही दुसर्‍यांसाठीच असतात, असे त्यागमय जीवन जगणारे वृक्ष एखाद्या सत्पुरुषासारखेच भासतात. सामान्य माणूसही नेहमीच्या दगदगीपासून दूर जाण्यासाठी, हवापालटासाठी थंड हवेच्या ठिकाणी, निसर्गाच्या सान्निध्यातच जातो. अशा या उपकारकर्त्या वृक्षांचा आज ऱ्हास होताना दिसत आहे. मानवाने बेसुमार जंगलतोड करून वैराण वाळवंटे निर्माण केली आहेत. ‘मानवाचे पाऊल नि वाळवंटाची चाहूल’ अशी म्हण आहे, ती अगदीच त्याने सार्थ केली आहे. जळणासाठी आणि घरे बांधण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली. त्यामुळे उष्णता वाढली. पावसाचे प्रमाण कमी झाले; दुष्काळाचे प्रमाण वाढले; जमिनीची धूप होऊन ती नापीक झाली. परिणामी हवेच्या प्रदूषणासारख्या समस्यांना मानवाला तोंड द्यावे लागले. जंगलात माणूस जितकी कमीत कमी लुडबूड करेल तितके आपले चक्र दुरुस्त करण्याची निसर्गाला संधी मिळेल. जंगलतोड तर थांबली पहिजेच; पण त्याचबरोबर नवीन झाडेही लावली गेली पाहिजेत, जंगले वाढवली पाहिजेत. या सर्व गोष्टींचा विचार करून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि सर्व लोकांना जंगलाचे महत्त्व समाजावून सांगण्यासाठी प्रयत्न करणे फार महत्त्वाचे आहे.
  1. दिलेला गद्य उतारा वाचून विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे पर्यायांमधून निवडा. (कोणतेही 3) 3
    1. वृक्षांची फळे-फुले कोणासाठी असतात?
      1. इतरांसाठी
      2. दुसऱ्यांसाठी
      3. स्वतःसाठी
      4. प्राण्यांसाठी
    2. मानवाने जंगलतोड करून काय निर्माण केले?
      1. हवेचे प्रदूषण
      2. कमी पाऊस
      3. वैराण वाळवंटे
      4. नापीक जमीन
    3. वृक्ष त्यागाच्या भावनेने कोठे उभे राहतात?
      1. उन्हात
      2. पावसात
      3. वाऱ्यात
      4. सावलीत
    4. पावसाचे प्रमाण कमी होण्यामागील मुख्य कारण कोणते?
      1. वाढती उष्णता
      2. नापीक जमीन
      3. वाढता दुष्काळ
      4. बेसुमार जंगलतोड
  2. दिलेल्या गद्य उताऱ्याच्या आधारे पुढील प्रश्‍नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही 3) 3
    1. निसर्गाला चक्र दुरुस्त करण्याची संधी केव्हा मिळेल?
    2. त्यागमय जीवन जगणाऱ्या वृक्षाला लेखकाने कोणती उपमा दिली आहे?
    3. बेसुमार वृक्षतोडीमागील कोणती कारणे वरील उताऱ्यात आली आहेत?
    4. गद्य उताऱ्यानुसार कोणत्या गोष्टींसाठी मानवाने प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे?
  3. दिलेल्या गद्य उताऱ्याच्या आधारे पुढील प्रश्‍नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही 1) 2
    1. ‘वृक्ष हा उपकारकर्ता’, कसा ते सांगा.
    2. बेसुमार वृक्षतोडीमुळे मानवाला कोणकोणते दुष्परिणाम भोगावे लागत आहेत, स्पष्ट करा.
Concept: undefined - undefined
Chapter:
[7]2.

खालील दिलेली कविता काळजीपूर्वक वाचा व विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यांत राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे
खिशाकडे हात जाताच, हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा

- कवी कुसुमाग्रज

  1. दिलेली कविता वाचून विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे दिलेल्या पर्यायांमधून निवडा. (कोणतेही 3) 3
    1. पूरग्रस्त तरुणाचा काय मोडून पडला आहे?
      1. संसार
      2. पाय
      3. लढा
      4. कणा
    2. घरट्यात पाहुणी म्हणून कोण आली होती?
      1. मुलगी
      2. गंगामाई
      3. पाऊस
      4. गुरुजी
    3. आलेल्या परिस्थितीला तरुण कोणाला सोबत घेऊन लढतो आहे?
      1. आईला
      2. कारभारणीला
      3. आजीला
      4. बहिणीला
    4. कवी व कवितेतील पूरग्रस्त तरुण यांच्यात कोणते नाते असावे?
      1. वडील-मुलगा
      2. नातू-आजोबा
      3. शेजारी-शेजारी
      4. शिक्षक-विद्यार्थी
  2. दिलेल्या कवितेच्या आधारे पुढील प्रश्‍नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही 4) 4
    1. प्रसाद म्हणून पाहुणीने पूरग्रस्त तरुणाला काय दिले?
    2. तरुण हसत हसत केव्हा उठला?
    3. पूरग्रस्त तरुणाने कोणती गोष्ट स्पष्टपणे नाकारली?
    4. गंगामाई चार भिंतीत कोणाप्रमाणे नाचून गेली?
    5. कवितेत कवीने कोणत्या ऋतूचे वर्णन केले आहे?
Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग - ‘ब’: व्याकरण (20 गुण)
सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 4)
[1]3. (a) (i)

खालील पर्यायांतून सामान्य नामाचा योग्य पर्याय निवडा.

समुद्र 

राग

राधिका

मुसळधार

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (a) (ii)

पुढे दिलेली कोणती विधाने बरोबर आहेत?

  1. क्रियापद म्हणजे वाक्याच्या शेवटीच येणारे पद.
  2. क्रियापद म्हणजे वाक्यातील कृतिदर्शक शब्द.
  3. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थपूर्ण करणारा शब्द.
  4. क्रियापद हे वाक्यातील कर्त्यानुसार बदलते.

विधान a - b बरोबर c - d चूक

विधान a - b - c बरोबर d चूक

विधान b - c - d बरोबर a चूक

विधान c - d बरोबर a - b चूक

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (a) (iii)

खालीलपैकी गटात न बसणारे वाक्य कोणते?

  1. अबब! केवढी उंच इमारत ही! 
  2. खाल्लीस का माती तू?
  3. अरे देवा! चुकलं की तुझं गणित! 
  4. अय्या! कित्ती छान आहे तुझ्या साडीचा रंग!
Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (a) (iv)

पुढील वाक्यात रिकाम्या जागी योग्य क्रियाविशेषण अव्ययाचा वापर करा.

नदीच्या ______ एक भलेमोठे अरण्य होते.

पाठीमागे 

पलीकडे

इकडे 

खाली

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (a) (v)

वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

देवाची प्रार्थना मनापासून करावी.

उभयान्वयी अव्यय

सर्वनाम

शब्दयोगी अव्यय

विशेषण

Concept: undefined - undefined
Chapter:
सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 3)
[1]3. (b) (i)

शिक्षण पूर्व झाल्यावर लगेचच नोकरी मिळेल. (वाक्याचा काळ ओळखा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (b) (ii)

हरवलेल्या माणसांच्या आठवणींनी मन सैरभैर झाले. (भविष्यकालीन वाक्य तयार करा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (b) (iii)

पावसाळ्यात रहदारीचा खोळंबा होईल. (वर्तमानकालीन वाक्य तयार करा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (b) (iv)

पोटभर जेवल्यावर महेशला बरे वाटते. (भूतकालीन वाक्य तयार करा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 3)
[1]3. (c) (i)

औषधे घेतल्यावर चिरागला बरे वाटले का? (वाक्याचा प्रकार ओळखा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (c) (ii)

कुशलला दिलेली शिक्षा मान्य नाही. (विधानार्थी होकारार्थी वाक्य तयार करा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (c) (iii)

सर्वांनी सूचनांचे पालन करावे. (आज्ञार्थी वाक्य तयार करा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (c) (iv)

तुझे अक्षर खूप अशुद्ध आहे. (उद्‌गारार्थी वाक्य तयार करा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 2)
[1]3. (d) (i)

खालीलपैकी निश्‍चितपणे एकवचनी शब्द कोणता, ते ओळखा.

कान 

प्राणी

खांब 

चिंच

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (d) (ii)

महामारीमुळे देऊळ बंद होते. (अधोरेखित शब्दाच्या वचनामध्ये बदल करून वाक्य पुन्हा लिहा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (d) (iii)

‘इमारत’ - या शब्दाचे वचन बदलून लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 2)
[1]4. (a) (i)

पुढीलपैकी भिन्नलिंगी शब्दाचा योग्य पर्याय निवडा.

पत्रा 

पाकीट

छत

पाखरू

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4. (a) (ii)

लिंगविचारानुसार गटात न बसणारा शब्द कोणता?

कागद 

डोंगर

गाडी 

रस्ता

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4. (a) (iii)

पुढीलपैकी नपुंसकलिंगी शब्दाचा पर्याय निवडा.

टाकी 

कपाट

साबण 

बांगडी

Concept: undefined - undefined
Chapter:
सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 2)
[1]4. (b) (i)

खालीलपैकी समानार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती?

शाल = सभ्य

उपास = आहार

दास = सेवक

नवल = हैराण

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4. (b) (ii)

खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?

कामगार 

कौशल्य

कसब 

निपुणता

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4. (b) (iii)

खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?

द्रव्य 

धन

संपत्ती 

घनदाट

Concept: undefined - undefined
Chapter:
सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 2)
[1]4. (c) (i)

खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती?

दूर × लांब 

शेवट × सांगता

जमा × खर्च

स्तुती × प्रशंसा

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[1]4. (c) (ii)

‘काळोख’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढील पर्यायांतून ओळखा.

प्रकाश 

प्रधान

अंधार 

तिमिर

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4. (c) (iii)

‘दास’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढील पर्यायांतून ओळखा.

दासी 

मालक

सेवक 

गुरू

Concept: undefined - undefined
Chapter:
सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 2)
[1]4. (d) (i)

खालीलपैकी समास प्रकारांच्या गटात न बसणारा शब्द कोणता?

मायलेक 

पाच-पन्नास

सप्तर्षी 

अडचण

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4. (d) (ii)

ज्या सामासिक पदाचे पहिले पद संख्यावाचक असून ते महत्त्वाचे असते, त्यास ______ समास असे म्हणतात.

समाहार द्वंद्व समास

वैकल्पिक द्वंद्व समास

अव्ययीभाव समास 

द्विगू समास

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4. (d) (iii)

‘बेफिकीर’ या शब्दाचा समास पुढीलपैकी कोणता?

अव्ययीभाव समास 

इतरेतर द्वंद्व समास

द्विगू समास

समाहार द्वंद्व समास

Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग - ‘क’ पाठ्यपुस्तकावर आधारित (30 गुण)
पुढील प्रश्‍नांची केवळ एका वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही 3)
[1]5. (a) (i)

पुढील प्रश्‍नाचे केवळ एका वाक्यात उत्तर लिहा. 

अभिषेकच्या बाबांनी कोणत्या गोष्टीबद्दल त्यांची मळमळ व्यक्त केली?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (a) (ii)

पुढील प्रश्‍नाचे केवळ एका वाक्यात उत्तर लिहा. 

कुटुंबाच्या कोणत्या कृतीने पंतांच्या वजनक्षय संकल्पाला सुरुंग लागला?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (a) (iii)

पुढील प्रश्‍नाचे केवळ एका वाक्यात उत्तर लिहा. 

कवितेचं गाण्यात केव्हा रूपांतर होते?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (a) (iv)

पुढील प्रश्‍नाचे केवळ एका वाक्यात उत्तर लिहा. 

लेखक रा. ग. जाधव रोज संध्याकाळी फिरावयास कोठे जात असत?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (a) (v)

पुढील प्रश्‍नाचे केवळ एका वाक्यात उत्तर लिहा. 

निरंजन वार लावून का जेवायचा?

Concept: undefined - undefined
Chapter:
खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य पुन्हा लिहा. (कोणतेही 3)
[1]5. (b) (i)

आकाश मेघरहित ______ नितळाईने नटले होते.

काळ्या

निळ्या

हिरव्या

जांभळ्या

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (b) (ii)

डाव्या बाजूस रुळाखाली पडलेल्या भल्यामोठ्या ______ कडे त्याचं लक्ष गेले.

दगडा

खड्ड्या

भगदाडा

छिद्रा

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (b) (iii)

त्यावेळची हायस्कूलची प्रवेश फी ______ रुपये होती.

पंचवीस

एकतीस

एक्कावन्न

एकवीस

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (b) (iv)

पुन्हा ______ करिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो.

दाखवण्या

व्यायामा

चालण्या

दिसण्या

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (b) (v)

तुमच्यासारख्या ______ मित्रांमुळे माझं मनोरंजनही होईल.

गुणी

निःस्वार्थी

चतुर

परोपकारी

Concept: undefined - undefined
Chapter:
खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्‍नाचे 40 ते 50 शब्दांत उत्तर लिहा. (कोणतेही 1)
[3]5. (c) (i)

खालील प्रश्‍नाचे 40 ते 50 शब्दांत उत्तर लिहा.

‘खरा नागरिक’ या पाठाच्या आधारे खऱ्या नागरिकाची वैशिष्ट्ये सांगा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]5. (c) (ii)

खालील प्रश्‍नाचे 40 ते 50 शब्दांत उत्तर लिहा.

‘रंग साहित्याचे’ या पाठाच्या आधारे ‘नाटक’ या साहित्यप्रकाराचा परिचय करून द्या.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]5. (c) (iii)

खालील प्रश्‍नाचे 40 ते 50 शब्दांत उत्तर लिहा.

गोजिरी, गुलाबी पावलं असूनही पावडे काकांच्या पावलांचे ठसे ॲपवर काळी का उमटली, स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (d) (i)

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यातील योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

(उसंत न लाभणे, बरबाद होणे, हातभार लावणे, आक्षेप नोंदवणे, गोडी लावणे)

सेतूबंधनात खारूताईने श्रीरामांना मदत केली.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (d) (ii)

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यातील योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

(उसंत न लाभणे, बरबाद होणे, हातभार लावणे, आक्षेप नोंदवणे, गोडी लावणे)

दिवाळीत आईला कामातून अजिबात वेळ मिळत नाही.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (d) (iii)

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यातील योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

(उसंत न लाभणे, बरबाद होणे, हातभार लावणे, आक्षेप नोंदवणे, गोडी लावणे)

ब्रिटिशांनी अत्यावश्यक वस्तूंवर कर लावल्यावर भारतीय नेत्यांनी त्यावर हरकत घेतली.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (d) (iv)

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यातील योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

(उसंत न लाभणे, बरबाद होणे, हातभार लावणे, आक्षेप नोंदवणे, गोडी लावणे)

हसतखेळत गणित शिकवून जोशी सरांनी मुलांमध्ये गणिताची आवड निर्माण केली.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (d) (v)

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यातील योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

(उसंत न लाभणे, बरबाद होणे, हातभार लावणे, आक्षेप नोंदवणे, गोडी लावणे)

अतिवृष्टीमुळे सगळी पिके वाया गेली.

Concept: undefined - undefined
Chapter:
पुढील प्रश्‍नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही 4)
[1]6. (a) (i)

पुढील प्रश्‍नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

वणवा कोठे लागला आहे?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]6. (a) (ii)

पुढील प्रश्‍नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

कवी सुर्वे यांची कोणती गोष्ट दारिद्रयाकडे गहाण पडली आहे?

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[1]6. (a) (iii)

पुढील प्रश्‍नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

देशवासियांच्या मुठीत कोणती गोष्ट नाही?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]6. (a) (iv)

पुढील प्रश्‍नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

फुलामुलांतून कोण हसत आहे?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]6. (a) (v)

पुढील प्रश्‍नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

संत नामदेव कोणाचे अंकित दास आहेत?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]6. (a) (vi)

पुढील प्रश्‍नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

कवी सुर्वे यांचे वाट पाहण्यात किती दिवस गेले?

Concept: undefined - undefined
Chapter:
खालील वाक्यांतील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य पुन्हा लिहा. (कोणतेही 4)
[1]6. (b) (i)

______ असे तुला एकच औक्षण.

देशवासियांचे 

जनतेचे

देशसेवकांचे 

दीनदुबळ्यांचे

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]6. (b) (ii)

शेतामधुनी पिकवू ______.

मोती 

धान्य

अन्न 

पीक

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]6. (b) (iii)

माता धांवें ______.

दयाळू 

कनवाळू

मायाळू 

कृपाळू

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]6. (b) (iv)

हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर ______.

उन्हाळे 

पावसाळे

हिवाळे 

ढग काळे

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]6. (b) (v)

जीव ओवाळावा तरी जीव किती हा ______.

कमाल 

महान

लहान 

सान

Concept: undefined - undefined
Chapter:
खालीलपैकी कोणत्याही एका काव्यपंक्तीचे संदर्भासह स्पष्टीकरण करा. (कोणतेही 1)
[3]6. (c) (i)

खालील काव्यपंक्तीचे संदर्भासह स्पष्टीकरण करा.

‘घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार’

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]6. (c) (ii)

खालील काव्यपंक्तीचे संदर्भासह स्पष्टीकरण करा.

‘झोतभट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले’

Concept: undefined - undefined
Chapter:
पुढील प्रश्‍नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही 3)
[1]7. (a) (i)

पुढील प्रश्‍नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

‘दिवाळी’ हा शब्द कोणत्या संस्कृत शब्दावरून आला आहे?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]7. (a) (ii)

पुढील प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहा.

भारतातील अणुसंशोधनाचा पाया कोणी घातला?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]7. (a) (iii)

पुढील प्रश्‍नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कोणता ठराव मंजूर करण्यात आला?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]7. (a) (iv)

पुढील प्रश्‍नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

डॉ. काकोडकर जेव्हा ट्रेनिंग स्कूलला गेले, तेव्हा ती संस्था सुरू होऊन किती वर्षे झाली होती?

Concept: undefined - undefined
Chapter:
पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्‍नाचे 40 ते 50 शब्दांत उत्तर लिहा. (कोणतेही 1)
[2]7. (b) (i)

‘स्काय इज द लिमिट’ ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे ‘मोठे होत असलेल्या मुलांनो’ या पाठाच्या आधारे लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]7. (b) (ii) (1)

पुढील प्रश्‍नाचे 40 ते 50 शब्दांत उत्तर लिहा. 

‘व्युत्पत्ती’ म्हणजे काय?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]7. (b) (ii) (2)

पुढील प्रश्‍नाचे 40 ते 50 शब्दांत उत्तर लिहा. 

व्युत्पत्ती कोशाचे स्वरूप स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग - ‘ड’: लेखन (15 गुण)
खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 120 ते 150 शब्दांत निबंध लिहा.
[6]8. (a) (i)

खालील विषयावर 120 ते 150 शब्दांत निबंध लिहा.

युद्धभूमीवर धारातीर्थी पडू लागलेल्या सैनिकाचे मनोगत -

मुद्दे - बालपण सुखात - सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न - योग्य प्रशिक्षण - सेवेसाठी बांग्लादेश सीमेवर रुजू - शत्रूचे भारतीय हद्दीत अतिक्रमण - जोरदार युद्ध - मरणासन्न अवस्था - भारतमातेसाठी प्राणार्पण करण्याची वेळ - भारतमातेची अजून सेवा करू शकतनाही, याचा खेद - जयहिंद.

Concept: undefined - undefined
Chapter:
[6]8. (a) (ii)

खालील विषयावर 120 ते 150 शब्दांत निबंध लिहा.

परीक्षा रद्द झाल्या तर....

मुद्दे - शालेय जीवनातील सुखद क्षण - मैत्री, दंगामस्ती आनंद - अभ्यासात आवड मात्र परीक्षा नको - रद्द झाल्यास तणावरहीत अभ्यास - उत्तीर्ण - अनुत्तीर्ण ताणच नाही - पण याचे दुष्परिणाम - परीक्षांचे महत्त्व - परीक्षा तर हव्यात, मग त्या कशा?

Concept: undefined - undefined
Chapter:
[6]8. (a) (iii)

खालील विषयावर 120 ते 150 शब्दांत निबंध लिहा.

मी अनुभवलेला पावसाळ्यातील एक दिवस

मुद्दे - तीव्र उन्हाळा - सर्व जण पावसाची वाट बघतात - एक दिवशी दुपारी अचानक सोसाट्याचा वारा - विजांचा कडकडाट - जोरदार पाऊस - मातीचा वास - आनंददायी वातावरण - लहान मुलांचे पावसात भिजणे - नोकरदारांची घरी परतण्यासाठी धावपळ - शेतकऱ्यांचा आनंद - पाऊस उघडताच पक्षांचा किलबिलाट - वातावरणातील चैतन्य.

Concept: undefined - undefined
Chapter:
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कोणतीहा एक कथा लिहून समर्पक शीर्षक व अर्थपूर्ण तात्पर्य लिहा.
[5]8. (b) (i)

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा लिहून समर्पक शीर्षक व अर्थपूर्ण तात्पर्य लिहा.

मुद्दे - चुणचुणीत मुलगा - रेल्वे फाटकाजवळ झोपडी - अभ्यासाची आवड - रात्री दिव्याखाली अभ्यास - अचानक मोठा आवाज - धावत जाऊन पाहणे - पावसामुळे रेल्वेरूळ खचणे - प्रसंगावधान - पटकन अंगातील शर्ट काढून रेल्वेच्या दिशेने धाव - अनर्थ टळणे - रेल्वे खात्याकडून कौतुक - राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार - तात्पर्य.

Concept: undefined - undefined
Chapter:
किंवा
[5]8. (b) (ii)

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा लिहून समर्पक शीर्षक व अर्थपूर्ण तात्पर्य लिहा.

भले मोठे जलाशय - आजूबाजूला घनदाट जंगल - जलाशयात अनेक मगरी - झाडांवरील माकडांशी मैत्री - माकडाचे काळीज खाण्याची इच्छा - गोड बोलून माकडाला फसवणे - माकड अतिहुशार - काळीज झाडालाच टांगलेले - युक्ती फळली - मगर निराश - तात्पर्य.

Concept: undefined - undefined
Chapter:
खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर पत्र लिहा. (लिफाफा आवश्यक)
[4]8. (c) (i)

खालील विषयावर पत्र लिहा. (लिफाफा आवश्यक)

समीर/सानवी साने राहणार आकाश पॅरडाईज, राजवाडा मार्ग, मुंबई-10 येथून त्यांच्या विभागात अनियमित व कमी वीजपुरवठा होत असल्याची तक्रार मुंबई महानगरपालिका, वीजपुरवठा विभाग ‘क’ यांना पत्राद्वारे कळवत आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]8. (c) (ii)

खालील विषयावर पत्र लिहा. (लिफाफा आवश्यक)

विहान/विनीता सातपुते, आदर्श महाविद्यालय, पवनानगर, शिंदेवाडी, जि. सातारा येथून शाळेत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवश्यक असलेल्या सजावटीच्या साहित्याची मागणी करणारे पत्र विविधा व्हरायटीज, रविवार पेठ, सावतामाळी चौक, सातारा यांना लिहीत आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:

Other Solutions




































Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

CBSE previous year question papers Class 10 Marathi with solutions 2024 - 2025

     CBSE Class 10 Marathi question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our CBSE Class 10 Marathi question paper 2025 serve as a catalyst to prepare for your Marathi board examination.
     Previous year Question paper for CBSE Class 10 Marathi-2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Marathi, you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of CBSE Class 10.

How CBSE Class 10 Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×