Advertisements
Advertisements
Questions
‘स्काय इज द लिमिट’ ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे ‘मोठे होत असलेल्या मुलांनो’ या पाठाच्या आधारे लिहा.
पुढील प्रश्नाचे 40 ते 50 शब्दांत उत्तर लिहा.
‘स्काय इज द लिमिट’ अशी परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते?
Advertisements
Solution 1
लेखक ‘भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर’ च्या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेत असताना तेथे त्यांच्यासह सुमारे शंभर मुले-मुली दाखल झाल्या होत्या. एवढ्या मोठ्या संख्येने प्रशिक्षणासाठी नेमलेल्या सर्वांना पुरेल एवढे काम बार्कमध्ये आहे का, असा प्रश्न प्रशिक्षणार्थींना पडला होता. त्यावेळी डॉ. होमी भाभा यांनी त्यांना “तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. आपण काय काम करायचे ते आपणच ठरवले पाहिजे. बॉसने आपल्याला सांगितलं असेल तेवढंच काम करायचं आणि काही सांगितलं नसेल तेव्हा आपल्याला कामच नाही असं समजायचं, ही चुकीची गोष्ट आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे.’’ असे मोलाचे मार्गदर्शन केले. लेखकाने त्यांनी दिलेल्या या सूचनेचे तंतोतंत पालन केले आणि त्यानंतर आपले काम आपणच शोधल्यास ‘स्काय इज द लिमिट’ अशी परिस्थिती खरोखरच निर्माण होत असल्याचा अनुभव घेतला. म्हणजेच, एखादे काम करताना वरिष्ठ सांगतील तेवढे आणि तेवढेच न करता आपण स्वतःच्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. स्वत: जबाबदारी घेऊन, स्वप्रेरणेने अधिकाधिक कष्ट घेऊन ते काम पूर्ण केले पाहिजे. आपण स्वत:च स्वत:ला घडवले, ऊर्जा मिळवली, स्वत:चे मार्ग स्वत:च शोधले, की ‘स्काय इज द लिमिट’ अशी परिस्थिती निर्माण होते.
Solution 2
डॉ. अनिल काकोडकर यांच्या ‘मोठे होत असलेल्या मुलांनो’ या पाठानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचे काम स्वतः शोधते आणि ते पूर्ण करण्याची पूर्ण जबाबदारी स्वतः घेते, तेव्हा ‘स्काय इज द लिमिट’ अशी परिस्थिती निर्माण होते. दुसऱ्याने सांगितलेल्या कामापुरते मर्यादित न राहता, आपण स्वतःहून नवनवीन गोष्टी निर्माण केल्या पाहिजेत.
जेव्हा आपण स्वतःची क्षमता ओळखतो आणि कामात पूर्णपणे झोकून देतो, तेव्हा प्रगतीच्या वाटा आपोआप खुल्या होतात. स्वतःचे मार्ग स्वतः शोधल्यामुळे यशाला कोणतीही मर्यादा राहत नाही आणि आपण अमर्याद प्रगती करू शकतो, हाच यामागचा मुख्य विचार आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
टिपा लिहा.
बार्क
टिपा लिहा.
डॉ. होमी भाभा
‘स्काय इस द लिमिट’ ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा.
मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हांस वाटते?
‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा.
‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिमाणकारक असते,' हे विधान ‘मोठे होत असलेल्या मुलांनो...’ या पाठाधारे स्पष्ट करा.
डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे करा.
लेखकाचा बार्कमधील अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
डॉक्टर होमी भाभा यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
वैज्ञानिक व विद्यार्थी यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
- टीप लिहा: व्युत्पत्ती कोशाचे कार्य.
- 'स्काय इज द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे 'मोठे होत असलेल्या मुलांनो' या पाठाच्या आधारे लिहा.
- 'थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॉक्टस!' या विधानाची यथार्थता स्पष्ट करा.
