English

श्री. मधुसूदन यांच्या संत्राबागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या, उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. जर संत्राबागेत एकूण 150 झाडे असतील,

Advertisements
Advertisements

Question

श्री. मधुसूदन यांच्या संत्राबागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या, उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. जर संत्राबागेत एकूण 150 झाडे असतील, तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती? खालील प्रवाहआकृतीच्या आधारे उदाहरण सोडवा.

Sum
Advertisements

Solution

  1. उभ्या रांगेतील झाडे x आहेत.
  2. आडव्या रांगेतील झाडे = x + 5
  3. एकूण झाडे = `x  xx (x + 5)`
  4. दिलेल्या अटीनुसार, झाडांची एकूण संख्या 150 आहे.
    x(x + 5) = 150
    ∴ x2 + 5x = 150
    ∴ x2 + 5x - 150 = 0
  5. x2 + 15x - 10x - 150 = 0
    ∴ x(x + 15) - 10(x + 15) = 0`..[(-150= 15;-10),(15 xx -10 = - 150),(15 - 10 = 5)]`
    ∴ (x + 15)(x - 10) = 0
    जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते, या गुणधर्माच्या
    उपयोजनाने,
    ∴ x + 15 = 0   किंवा   x - 10 = 0
    ∴ x = - 15   किंवा   x = 10
    परंतु, झाडांची संख्या ऋण असू शकत नाही.
    x = 10
  6. उभ्या रांगेतील झाडांची संख्या 10 आहे.
  7. आडव्या रांगेतील झाडे = x + 5 = 10 + 5 = 15
    ∴ आडव्या रांगेतील झाडांची संख्या 15 आहे.
shaalaa.com
वर्गसमीकरणाचे उपयोजन
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: वर्गसमीकरणे - सरावसंच 2.6 [Page 52]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 वर्गसमीकरणे
सरावसंच 2.6 | Q 3. | Page 52

RELATED QUESTIONS

प्रगतीच्या 2 वर्षांपूर्वीच्या आणि 3 वर्षांनंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा.


दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा.


एका नदीत, बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किमी जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीकला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किमी असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा.


460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून बाकी 1 येते, तर भागाकार व भाजक किती?


समलंब मध्ये `square`ABCD मध्ये AB || CD असून त्याचे क्षेत्रफळ 33 चौसेमी आहे, तर आकृतीतील दिलेल्या माहितीवरून चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी खालील कृती पूर्ण करून काढा.

उकल:

`square`ABCD समलंब चौकोन आहे. AB || CD

`"A"(square "ABCD") = 1/2 xx ("AB" + "CD") xx square`

∴ `33 = 1/2(x + 2x + 1) xx square`

∴ `square` = (3x + 1) × `square`

∴ 3x+ `square` - `square` = 0

∴ 3x (____) + 10 (____) = 0 

∴ (3x + 10)(_____) = 0

∴ (3x + 10) = 0  किंवा  `square` = 0

∴ x = `- 10/3` किंवा x = `square`

परंतु, लांबी ऋण नसते.

∴ `x ne (- 10)/3`   ∴  x = `square`

AB = ______, CD = ______, AD = BC = _______


रंजनाला वाढदिवसानिमित्त 540 संत्री काही विद्यार्थ्यांना समान वाटायची आहेत. जर 30 विद्यार्थी जास्त असते, तर प्रत्येकाला 3 संत्री कमी मिळाली असती, तर विद्यार्थ्यांची संख्या काढा.


खालील शाब्दिक उदाहरण सोडवण्यासाठी कृती पूर्ण करा.

दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा.

कृती: पहिली सम नैसर्गिक संख्या x मानू.

दुसरी क्रमागत सम नैसर्गिक संख्या = (______)

दिलेल्या अटीनुसार,

x2 + (x + 2)2 = 244 

x2 + x2 + 4x + 4 – (______) = 0

2x2 + 4x – 240 = 0

x2 + 2x – 120 = 0

x2 + (______) – (______) – 120 = 0

x (x + 12) – (______) (x + 12) = 0 

(x + 12) (x – 10) = 0

x = (______) / x = 10

परंतु, नैसर्गिक संख्या ऋण नसते, म्हणून x = -12 शक्य नाही.

म्हणून, पहिली नैसर्गिक संख्या x = 10 असेल.

म्हणून, दुसरी नैसर्गिक संख्या = x + 2 = 10 + 2 = 12 असेल.


460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 9 पटीपेक्षा 2 ने अधिक येत असून बाकी 5 येते, तर भागाकार व भाजक किती?


पाच क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 1455 आहे, तर त्या संख्या शोधा.


एक टाकी दोन नळाच्या साहाय्याने 6 तासात पूर्ण भरते. ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 5 तास जास्त लागतात तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×