HSC Arts (Marathi Medium)
Academic Year: 2025-2026
Date & Time: 4th March 2026, 3:00 pm
Duration: 3h
Advertisements
सूचनाः
- सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
- उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
- प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पृष्ठावर करावा.
दिलेल्या परिस्थितीत शास्त्रीय माहितीची कोणत्याही काळात व कोणत्याही ठिकाणी प्रचिती घेता येण्याला ______ म्हणतात.
वस्तुनिष्ठता
पद्धतशीर विश्लेषण
पडताळा
Chapter:
मानवी डोक्याच्या कवटीच्या आकाराचे मापन करून बुद्धिमत्ता ठरवता येते असे मत ______ यांनी मांडले.
सर फ्रान्सिस गाल्टन
रेमंड कॅटेल
आल्फ्रेड बीने
Chapter:
संवेदनाची संघटन तत्त्वे ______ यांनी स्पष्ट केली.
पॅव्हलॉव्ह
टोलमन
वर्दायमर
Chapter:
स्किझोफ्रेनिया हा शब्दप्रयोग ______ यांनी सर्वप्रथम वापरला.
अल्बर्ट एलिस
युजेन ब्लूलर
जॉन ट्रॅव्हिस
Chapter:
अस्थिरता, आव्हान व प्रतिकूलता या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेला ______ लवचिकता म्हणतात.
मानसिक
शारीरिक
सामाजिक
Chapter:
खालील ‘अ’ व ‘ब’ गटांतील शब्दांच्या योग्य जोड्या लावा:
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) कार्ल रॉजर्स | (१) २०१३ |
| (ब) समवयस्कांचा गट | (२) वेळेचे भान नसणे |
| (क) घशाला कोरड पडणे | (३) स्व-नियंत्रणाचा अभ्यास |
| (ड) आय.सी.डी. ११ | (४) भावना अनुभवातील शरीरांतर्गत बदल |
| (इ) इंटरनेटचा अतिवापर | (५) २०१९ |
| (६) व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणारा घटक |
Chapter:
खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ ते लिहा:
मानसशास्त्राचा मुख्य उद्देश मानवी वर्तनामागील कारणे समजून घेणे होय.
Chapter:
खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ ते लिहा:
इतरांना नाउमेद करणे हे उच्च सामाजिक बुद्धिमत्तेचे एक लक्षण आहे.
Chapter:
खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ ते लिहा:
थायरॉक्सिन स्त्राव अति-निर्माण झाल्यास व्यक्ती भावनिकदृष्ट्या अस्थिर होते.
Chapter:
खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ ते लिहा:
शॅक्टर आणि सिंगर यांनी भावनेचा द्विघटक सिद्धांत मांडला.
Chapter:
खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ ते लिहा:
तदनुभूती वाढवणे शक्य नसते.
Chapter:
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
प्रयुक्त म्हणजे काय?
Chapter:
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
‘मानसिक वय’ ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?
Chapter:
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
कोणत्या प्रकारचा गुण विशेष व्यक्तीचे संपूर्ण जीवन व्यापून टाकतो?
Chapter:
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
समस्या परिहारातील पहिली पायरी कोणती?
Chapter:
Advertisements
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
नि:पक्षपातीपणे श्रवण (ऐकणे) म्हणजे काय?
Chapter:
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
लवचिकतेचे महत्त्व तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Chapter:
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
उच्च भावनिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यवतीची लक्षणे स्पष्ट करा.
Chapter:
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
अवधान दोलनाचे स्वरूप दैनंदिन जीवनातील उदाहरणाच्या आधारे स्पष्ट करा.
Chapter:
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
व्यक्ती भावनिक गैरवर्तनाला बळी पडण्याची शक्यता केव्हा असते ते तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Chapter:
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
छिन्नमनस्कतेची कोणतीही दोन धनात्मक लक्षणे स्पष्ट करा.
Chapter:
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
चिंता विकृती निर्माण होण्याची कोणतेही दोन कारणे स्पष्ट करा.
Chapter:
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
दीर्घकालीन आनंद निर्माण करणारे कोणतेही दोन घटक स्पष्ट करा.
Chapter:
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिप लिहा.
प्रायोगिक पद्धत
Chapter:
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिप लिहा.
‘साधक अभिसंधान’ अध्ययन पद्धत
Chapter:
खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:
प्लुटचिक यांचे भावनाचक्र
Chapter: [5] भावना
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिप लिहा.
भयगंड
Chapter:
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिप लिहा.
मानसिक आरोग्य प्रथमोपचारातील स्वमदत योजना
Chapter:
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
वृत्तेतिहास पद्धत
Chapter: [1] मानसशास्त्र : एक विज्ञानशाखा
खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दांत उत्तर लिहा.
मातृभाषेचे ज्ञान जेवढे अधिक तेवढी परकीय भाषा शिकण्याची गती अधिक हे ऋचाने संशोधनाद्वारे सिद्ध केले. तर मातृभाषेचे ज्ञान व परकीय भाषा शिकण्याची गती यात कोणता सहसंबंध असावा?
Chapter:
खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दांत उत्तर लिहा.
सुमित इतरांशी बोलणे टाळतो, मित्र-मैत्रिणींसोबत सहलीला जाण्याऐवजी तो एकट्याने पुस्तक वाचणे पसंत करतो तर कार्ल यूंगच्या व्यक्तिमत्त्व सिद्धांतामधील सुमितचा व्यक्तित्व प्रकार कोणता?
Chapter:
Advertisements
खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दांत उत्तर लिहा.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे दिले जाणारे वाहन नोंदणी क्रमांक सहा अंकांपेक्षा मोठे नसतात. तर प्रादेशिक परिवहन नोंदणी कार्यालयाची वाहन नोंदणी क्रमांक प्रणाली अवधानाच्या कोणत्या अंगावर आधारित आहे?
Chapter:
खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दांत उत्तर लिहा.
सृष्टी स्व-आदर व आत्मविश्वास वाढविण्यासाठी नियमित सकस व संतुलित आहाराचे सेवन करते. तर भावनिक सुदृढता वाढविण्यासाठी सृष्टीने कोणत्या तंत्राचा अवलंब केला?
Chapter:
खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दांत उत्तर लिहा.
स्वतःच्या शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे जाणवूनही संदेश शरीर कमावण्याच्या हट्टापायी अति कसरत करतो. तर हा व्यसनाचा प्रकार कोणता?
Chapter:
खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दांत उत्तर लिहा.
कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मातकरून अतुलने पुन्हा जोमाने आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. तर अतुलने कोणत्या प्रकारची लवचिकता दर्शविली?
Chapter:
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
आशावाद म्हणजे काय?
Chapter: [8] सकारात्मक मानसशास्त्र
खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा.
निरीक्षण पद्धत
Chapter:
खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा.
कृत्रिम बुद्धिमत्ता
Chapter:
खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा.
व्यक्तिमत्त्व
Chapter:
खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा.
कार्यात्मक बिघाड - मानसिक विकृतीचा एक निकष
Chapter:
खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा.
संस्कृती-मानसिक प्रथमोपचारातील अडथळा
Chapter:
खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा.
सजग ध्यान
Chapter:
खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा:
सर्जनशील विचारातील विविध अवस्था स्पष्ट करा-
मुद्दे:
- पूर्वतयारी
- उबवण
- प्रदीपन
- पडताळणी
Chapter:
खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा.
पॉल अर्कमन यांनी सांगितलेल्या प्राथमिक भावना स्पष्ट करा.
- सुख (आनंद)
- दुःख
- राग
- भीती
Chapter: [5] भावना
खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा.
आघात पश्चात तणाव विकृतीचे स्वरूप स्पष्ट करा.
- अर्थ
- धक्का अवस्था (शॉक स्टेज)
- सूचना अवस्था (सजेस्टिबल स्टेज)
- पुनर्प्राप्ती अवस्था (रिकव्हरी स्टेज)
Chapter: [6] मानसिक विकृती
पुढील प्रश्नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा.
बुद्धिमापन चाचण्यांचे विविध प्रकार फायद्यांसह स्पष्ट करा.
Chapter:
पुढील प्रश्नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा.
बुद्धिमापन चाचण्यांचे विविध प्रकार तोट्यासह स्पष्ट करा.
Chapter:
पुढील प्रश्नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा.
व्यक्तिमत्त्व-मापनाच्या विविध पद्धती स्पष्ट करा.
Chapter:
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Psychology [मानसशास्त्र] with solutions 2025 - 2026
Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2026 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Psychology [मानसशास्त्र], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].
How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Psychology [मानसशास्त्र] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.