मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा: सर्जनशील विचारातील विविध अवस्था स्पष्ट करा- मुद्दे: (i) पूर्वतयारी (ii) उबवण (iii) प्रदीपन (iv) पडताळणी - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा:

सर्जनशील विचारातील विविध अवस्था स्पष्ट करा-

मुद्दे:

  1. पूर्वतयारी
  2. उबवण
  3. प्रदीपन
  4. पडताळणी
स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  1. पूर्वतयारी: सर्जनशील विचारांच्या या अवस्थेत समस्या जाणून घेऊन ती नाविन्यपूर्ण पद्धतीने सोडवण्यासाठी त्यासंदर्भातील माहिती गोळा केली जाते. सर्जनशील विचार अचानक निर्माण होत नाहीत. समस्या नाविन्यपूर्ण पद्धतीने सोडवण्यासाठी अनेक उपाय वापरून पाहिले जातात व सोडून दिले जातात. या अवस्थेत कोणतीही लक्षणीय प्रगती दिसून येत नाही.
  2. उबवण: पूर्वतयारीनंतर व्यक्ती समस्या सोडवण्यास सुरुवात करतो, परंतु तिला नाविन्यपूर्ण उपाय सापडतोच असे नाही. या सुरुवातीच्या अपयशामुळे उबवण अवस्था निर्माण होते. या अवस्थेत व्यक्ती इतकी निराश होते की ती हार मानण्याचा विचार करते. त्यानंतर ती व्यक्ती समस्येकडे दुर्लक्ष करते आणि समस्येशी संबंधित नसलेल्या इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. ही अवस्था व्यक्तीला समस्येविषयी जाणीवपुर्वक विचार न करताही समस्या हाताळण्यास साहाय्य करते. हा कालावधी निष्फळ असल्याचे वाटत असले तरी, या कालावधीनंतर अचानक नाविन्यपूर्ण उपाय मिळतो.
  3. प्रदिपण: उबवणीनंतर, अचानक प्रकाश चमकावा, त्याप्रमाणे नाविन्यपूर्ण उपाय व्यक्तीच्या डोळ्यांसमोर येतो आणि त्यामुळे व्यक्ती खूप उत्साहित होते. नाविन्यपूर्ण कल्पनेचे विस्कळीत वाटणारे भाग किंवा असंबंधित तुकडे चपखलपणे एकत्र येतात व मिळालेला उपाय हा जवळजवळ बरोबर असतो. समस्येवर नाविन्यपूर्ण उपाय शोधल्याचे समजल्यामुळे व्यक्ती या अवस्थेत अत्यानंदित होते.
  4. पडताळणी: मागील अवस्थेतील अत्यानंदानंतर जो नाविन्यपूर्ण उपाय/कल्पना सुचली आहे त्याची पडताळणी घेणे आवश्यक असते. बऱ्याचवेळा नाविन्यपूर्ण उपायात केवळ काही किरकोळ बदल अपेक्षित असतात. परंतु क्वचितप्रसंगी पूर्वतयारी ते पडताळणी ही प्रक्रिया आयुष्यभरासाठी सुरु राहते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×